Tuesday, November 19, 2024
वृत्त क्र. 1125
सीआयएसएफच्या मार्फत जिल्ह्यामध्ये कडक तपासणी सुरु
एफएसटी आणि एसएसटी पथकावरही निगराणी ठेवणार
नांदेड दि. 19 नोव्हेंबर: निर्भय व पारदर्शी वातावरणात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची तुकडी जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात नाकाबंदी सुरु असून कडेकोट तपासणी केली जात आहे. जिल्ह्यामध्ये फिरते तपासणी पथक (एफएसटी) व स्थिर तपासणी पथक (एसएसटी) पथकाची तपासणी मोहिम सुरु आहे.
जिल्ह्यात सध्या एफएसटी पथक 27 तर एसएसटी 32 अशी एकूण 59 पथके कार्यरत आहेत. या उपलब्ध यंत्रणेवरती सीआयएसएफचे नियंत्रण असणार आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात तपासणी केली जात असून नागरिकांनी याला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 20 नोव्हेंबरच्या मतदानाला लक्षात घेवून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ झाली असून नागरिकांनी 50 हजारापेक्षा जास्त रोख रक्कम विनापरवानगी बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र. 1124
निवडणूक निरीक्षकांची राहणार मतदारसंघात उपस्थिती
अनेक मतदार केंद्राना आज भेटी देणार
नांदेड दि. 19 ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक उद्या मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा व विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. मतदान केंद्रावरील सोयी-सुविधा व नागरिकांच्या मतदान प्रक्रियेचे निरीक्षणनही ते करणार आहेत. मतदारांनी आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रारी असेल तर त्यांच्या जाहिर करण्यात आलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84- हदगाव या विधानसभा क्षेत्रासाठी आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7499127265 आहे. तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8483990380 आहे तर 87-नांदेड दक्षिण- व 88-लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) यांचा 8237960955 संपर्क क्रमांक आहे. तर 89-नायगाव, 90-देगलूर व 91-मुखेड मतदारसंघासाठी रण विजय यादव (भाप्रसे) यांचा 7385842084 संपर्क क्रमांक आहे.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत हे नांदेड येथे कार्यरत आहेत. त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे. आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस) नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी आहे. यांचा संपर्क क्र. 8483845220 आहे.
0000
वृत्त क्र. 1123
किनवट मतदारसंघातील अडचणीसाठी
निवडणूक निरीक्षक शैलेंद्र कुमार यांच्याशी संपर्क साधा
नांदेड दि. 19 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या मतदान प्रक्रीयेसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक सामान्य म्हणून शैलेंद्र कुमार (भा.प्र.से) यांची नियुक्ती केली आहे. किनवट मतदारसंघातील उमेदवारांना व त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना मतदानासंदर्भात काही अडीअडचणी असल्यास प्रत्यक्ष भेटू शकता किंवा त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधु शकता, असे किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांनी कळविले आहे.
निवडणूक निरीक्षक सामान्य म्हणून शैलेंद्रकुमार यांचा ऑब्झर्व्हर कोड जी-३५६०२ हा असून भ्रमणध्वनी क्र. ७४९९१२७२६५ असा आहे. मा. निवडणूक निरीक्षक हे 20 नोव्हेंबर 2024 रोजीच्या मतदानाच्या दिवशी तसेच मतदानानंतर छाननी 21 नोव्हेंबर 2024 रोजीच्या कालावधीत निवडणूक निरीक्षक कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोकुंदा ता. किनवट येथे उपलबध राहणार आहे. ज्या उमेदवारांना व त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीना मतदान संदर्भात काही अडीअडचणी असल्यास प्रत्यक्ष भेटू शकता किंवा त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता असे कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 1122
प्रत्येक मतदारसंघात महिला, दिव्यांग व तरुणांचे बुथ मतदाराच्या स्वागतासाठी सज्ज
नांदेड, दि. 19 नोव्हेंबर : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मतदाराना मतदान करण्याठी प्रोत्साहन मिळावे, तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नवनवीन संकल्पना राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात काही मतदान केंद्रावर महिलांनी चालविलेले (पिंक सेंटर), दिव्यांगानी चालविलेले केंद्र (पीडब्ल्यूडी), तरुणांनी चाविलेले मतदान केंद्र (यंग केंद्र )उभारले आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रीयेत भाग घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघात जिल्हा परिषद केंद्रीय प्रा. शाळा, माहूर, हदगाव मतदार संघात विवेकानंद हायस्कुल, भोकर मतदारसंघात जिल्हा परिषद मुलींची शाळा, बारड, नांदेड उत्तरमध्ये ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, वाडी बु. , नांदेड दक्षिणमध्ये गुजराथी हायस्कुल, वजीराबाद, लोहा मतदारसंघात जिल्हा परिषद हायस्कूल 141, नायगाव मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव, देगलूर मध्ये जि. प. शाळा भटगल्ली, मुखेड मतदारसंघात गुरुदेव विद्यामंदीर याठिकाणी पिंक केंद्र अर्थात पूर्णत: महिलांनी चालविलेले केंद्र उभारण्यात आले आहे.
तर किनवट मतदारसंघात सिध्दार्थ नगर प्राध्यापक कॉलनी गोकुंदा येथे, हदगाव मधील जि.प. हायस्कुल पार्ट नं. 85, भोकर पंचायत समितीमध्ये पंचायत समिती कार्यालय, उत्तर नांदेडमध्ये पोतदार इंटरनॅशनल स्कूल वाडी बु, दक्षिण नांदेड मध्ये गुजराथी हायस्कुल वजीराबाद पार्ट नं. 63, लोहा मतदारसंघात जि.प. हायस्कुल 136 , नायगाव मतदारसंघात नायगाव जि.प. शाळा, नरसी, देगलूर मतदारसंघात जि.प. हायस्कुल लोहगाव, मुखेड मतदारसंघात जि.प. हायस्कुल सावरगाव येथे पीडब्लु केंद्र अर्थात दिव्यांगानी चालविले केंद्र उभारले गेले आहे.
याशिवाय किनवट मतदारसंघात अंगणवाडी केंद्र वाघदरी, हदगावमध्ये जि.प. शाळा कौठा, भोकर मध्ये मौलाना अब्दूल कलाम आझाद हायस्कुल, मुदखेड, 86-नांदेड उत्तर मध्ये नांदेड फार्मसी शामनगर, नांदेड दक्षिण मध्ये गुजराथी हायस्कूल वजीराबाद, लोहामध्ये जि.प. हायस्कूल लोहा, नायगाव मध्ये जि.प. शाळा कृष्णूर, नायगाव मध्ये जि.प. शाळा अल्लापुर, देगलूरमध्ये जि. प. शाळा जाबं बु. याठिकाणी यंग बुथ निर्माण केले आहे. याठिकाणी सर्व कर्मचारी 40 वर्षाखालील आहेत. याशिवाय 539 पर्दानसिन केंद्र आहेत. 5 संवेदनशिल केंद्र आहेत. तर जिल्ह्यामध्ये यावर्षी 1 हजार 679 सैनिकासाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 3088 मतदान केंद्रापैकी 2517 मतदान केंद्र सर्वसामान्य आहेत. तर अन्य केंद्र वैशिष्यपूर्ण आहेत.
00000
वृत्त क्र. 1121
लोकसभेसाठी 19 लाख तर विधानसभेसाठी 27 लाखांच्यावर मतदार
6 विधानसभा क्षेत्रात एकदा बोटाला शाई दोनदा मतदान करता येणार
नांदेड , दि. 19 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यामध्ये 25 वर्षानंतर प्रथमच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक एकत्रित होत आहे. त्यामुळे 9 विधानसभा मतदारसंघासाठी 27 लाखावर मतदार मतदान करणार आहेत. तर लोकसभेसाठी 6 मतदारसंघात 19 लाखांच्यावर मतदार मतदान करणार आहेत. 6 विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना एकदाच बोटाला शाई लावून दोन वेळा मतदान करता येणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा व मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
लोकसभेसाठी 9 लाख 78 हजार 234 पुरुष तर 9 लाख 30 हजार 158 महिला, तृतीयपंथी 154 असे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदार 2 हजार 82 केंद्रावर आपला मतदानाचा हक्क् बजावतील. तर विधानसभेसाठी 14 लाख 30 हजार 365 पुरुष तर 13 लाख 57 हजार 410 महिला तर 172 तृतीयपंथी असे एकूण 27 लाख 87 हजार 947 मतदान नऊ विधानसभा मतदार संघासाठी मतदान करतील.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिन्स
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 2082 मतदान केंद्रावर मतदान होणार असून लोकसभेच्या 6 मतदार संघासाठी यात एकूण 4 हजार 997 बॅलेट युनिट तर 2 हजार 496 कंट्रोल युनिट तर 2 हजार 704 व्हीव्हीपॅट असणार आहेत. 9 विधानसभा मतदारसंघात एकूण 3 हजार 88 मतदार केंद्र स्थापन केले असून यात 83-किनवट मतदारसंघासाठी 811 बॅलेट युनिट, 414 कंट्रोल युनिट तर 447 व्हीव्हीपॅट देण्यात आले आहेत. हदगाव मतदारसंघासाठी 826 बँलेट तर 421 कंट्रोल, व्हीव्हीपॅट 455 वितरीत केले आहेत. ८५-भोकरसाठी बँलेट 843, कंट्रोल 429, व्हीव्हीपॅट 464 वितरीत करण्यात आले आहेत. 86-नांदेड उत्तर साठी बँलेट 1309, कंट्रोल 447, व्हीव्हीपॅट 483 ईव्हीएम वितरीत केले आहेत. 87-नांदेड दक्षिणसाठी बॅलेट 765, कंट्रोल 390, व्हीव्हीपॅट 421 आणि 88-लोहा मतदारसंघात बँलेट 422, कंट्रोल 422, व्हीव्हीपॅट 456 ईव्हीएम वितरीत केले आहेत. 89 नायगाव साठी बँलेट 438, कंट्रोल 438, व्हीव्हीपॅट 473 तर 90 देगलूर साठी बँलेट 439, कंट्रोल 439, व्हीव्हीपॅट 474 मशिन्स दिले आहेत. 91 मुखेड मतदारसंघासाठी 457 बँलेट, कंट्रोल 457, व्हीव्हीपॅट 493 असे एकूण 6 हजार 310 बँलेट युनिट, 3 हजार 857 कंट्रोल युनिट व 4 हजार 166 व्हीव्हीपॅट युनिट दिले आहेत.
74 हजारावर नव मतदार बजावणार मतदानाचा हक्क
18 ते 19 या वयोगटातील 44 हजार 290 पुरुष तर 30 हजार 396 महिला मतदार तर 6 तृतीयपंथी आपला मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावतील. तर 20 ते 29 या वयोगटातील 6 लाख 32 हजार 964 मतदार तर 30 ते 39 या वयोगटातील 6 लाख 61 हजार 786 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तसेच 40 ते 49 या वयोगटातील 6 लाख 18 हजार 119 मतदार असून 50 ते 59 वयोगटातील 3 लाख 82 हजार 32 मतदार मतदान करतील. 60 ते 69 या वयोगटातील 23 लाख 175 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. तर 70 ते 79 या वयोगटात एकूण 11 लाख 9 हजार 141 मतदार असून 80 ते 89 या वयोगटातील एकूण 55 हजार 687 मतदार मतदान करतील. 90 ते 99 या वयोगटात 12 हजार 42 तर 100 ते 109 या वयोगटात 1 हजार 304 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 110 ते 119 या वयोगटातील 2 तर 120 वयाच्या वरचे 3 जेष्ठ मतदार आहेत.
टक्केवारीसाठी व्होटर टर्नआऊट ॲपचा वापर करा
मतदानाच्या संदर्भात आकडेवारी व किती मतदान झाले याबाबत सर्व सामान्यामध्ये उत्सुकता असते त्यासर्वानी व्होटरटर्नआऊट ॲप डाऊनलोड करावे यावर माहिती ठराविक वेळेनंतर अपलोड होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने पोलींग पाटर्याचे संगणकीकृत प्रणालीद्वारे ट्रॅकिंग केले जाणार आहे. चक्रीका असे या प्रणालीचे नाव आहे. याशिवाय या निवडणुकीत जिल्ह्याच्या व प्रत्येक निवडणूक केंद्राच्या मुख्यालयात कंट्रोल रूम स्थापन केले आहे.
याशिवाय आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी जिल्हाप्रशासनाने लिंक जारी केली असून https://deonanded.in/ps.php या लिंकवर आपले मतदान केंद्र शोधता येणार आहे.
0000
वृत्त क्र. 1120
आज मतदान ! 19 लोकसभा तर 165 विधानसभा उमेदवारांचे भविष्य ठरणार
· मतदान साहित्यांसह पोलींग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना
· राष्ट्रीय कर्तव्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची लगबग
· मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
· मतदान ओळखपत्रांसह इतर बारा ओळखपत्रे पुरावे म्हणून ग्राह्य
नांदेड दि. 19 नोव्हेंबर : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी एकूण 15 हजार 886 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज शासकीय तंत्रनिकेतन येथे 87 नांदेड दक्षिण व 86 नांदेड उत्तर मतदार संघासाठी तर विधानसभा निहाय ठिकाणावरुन नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासनातर्फे मतदान साहित्य हस्तांतरीत करुन दुपारपर्यत मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले.
सकाळी 7 पासून राष्ट्रीय कर्तव्यासाठी सज्ज असलेले झोनल अधिकारी, मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांची शासकीय तंत्रनिकेतन येथे मतदान साहित्य हस्तगत करण्याची लगबग सुरु होती. मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपले आदेश, मतदान केंद्राबाबत माहिती, ओळखपत्र हस्तगत करुन मतदान केंद्राचा मार्ग, आपल्या गटातील अधिकारी कर्मचारी कोण आहेत याबाबतची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लगबग दिसुन आली. मतदानासाठी सज्ज असलेल्या व राष्ट्रीय कर्तव्यासाठी तत्पर असलेल्या अधिकारी कर्मचा-यामध्ये एक अनोखा उत्साह दिसून आला. आज सर्व कर्मचारी मतदान साहित्य हस्तगत करुन त्या साहित्यांची तपासणी करुन मतदान केंद्राकडे रवाना झाले. तत्पुर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकारी स्ट्रॅाग रुममधून आज इव्हिएम मशिन बाहेर काढून पोलिंग पार्ट्यांना हस्तांतरीत करण्यात आल्या. दुपारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पोलींग पाटर्याना त्यांच्या बसमध्ये जावून शुभेच्छा दिल्या. आज 5 नंतर टप्याटप्याने पोलिंग पार्ट्या बुथवर रात्री उशिरापर्यत पोहोचतील.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान एकूण 3 हजार 88 मतदान केंद्रावर होत आहे. यासाठी 15 हजारावर प्रशिक्षित कर्मचारी तर जवळपास 8 हजार सुरक्षा व पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड मतदार संघासाठी 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट असून हे उदिष्टपूर्ती करण्यासाठी मतदारांनी मोठया प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे. मतदारांनी मतदान यादीत नाव असेल तर मतदान ओळखपत्रासह इतर 12 ओळखपत्रे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य 12 ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य - जिल्हाधिकारी
मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल, अशी माहिती, जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांनी ही माहिती दिली. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र आहे, असे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. मतदार ओळखपत्र नसणाऱ्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.
00000
प्रशासन #सज्ज ! पोलिंग पाटर्या मतदान केंद्राकडे रवाना होणे सुरु : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजता पासून निवडणूक #कर्मचारी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकत्रित आले होते. अंतीम प्रशिक्षणानंतर #पोलिंग पाटर्या मतदान केंद्राकडे #साहित्य घेऊन #रवाना झाल्या.
प्रशासन सज्ज ! पोलिंग पाटर्या मतदान केंद्राकडे रवाना होणे सुरु : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजता पासून निवडणूक कर्मचारी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकत्रित आले होते. अंतीम प्रशिक्षणानंतर पोलिंग पाटर्या मतदान केंद्राकडे साहित्य घेऊन रवाना झाल्या.
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...