Tuesday, November 19, 2024

 वृत्त क्र. 1123

किनवट मतदारसंघातील अडचणीसाठी

निवडणूक निरीक्षक शैलेंद्र कुमार यांच्याशी संपर्क साधा

नांदेड दि. 19 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या मतदान प्रक्रीयेसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक सामान्य म्हणून शैलेंद्र कुमार (भा.प्र.से) यांची नियुक्ती केली आहे. किनवट मतदारसंघातील उमेदवारांना व त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना मतदानासंदर्भात काही अडीअडचणी असल्यास प्रत्यक्ष भेटू शकता किंवा त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधु शकता, असे किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांनी कळविले आहे.

निवडणूक निरीक्षक सामान्य म्हणून शैलेंद्रकुमार यांचा ऑब्झर्व्हर कोड जी-३५६०२ हा असून भ्रमणध्वनी क्र. ७४९९१२७२६५ असा आहे. मा. निवडणूक निरीक्षक हे 20 नोव्हेंबर 2024 रोजीच्या मतदानाच्या दिवशी तसेच मतदानानंतर छाननी 21 नोव्हेंबर 2024 रोजीच्या कालावधीत निवडणूक निरीक्षक कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोकुंदा ता. किनवट येथे उपलबध राहणार आहे. ज्या उमेदवारांना व त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीना मतदान संदर्भात काही अडीअडचणी असल्यास प्रत्यक्ष भेटू शकता किंवा त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता असे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1210 लोकसभा उमेदवारांची आज खर्चाच्या पुनर्मेमेळाची बैठक नांदेड दि. 18 डिसेंबर :- लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवार...