Tuesday, July 4, 2017

उज्ज्वल नांदेड अंतर्गत
एमपीएससी टॉपर्सचे आज मार्गदर्शन
नांदेड दि. 4 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वल नांदेड अभियानांतर्गत बुधवार 5 जुलै 2017 रोजी दुपारी 3 वा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
 जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपजिल्हाधिकारी या पदासाठी महाराष्ट्रातून प्रथम आलेले भूषण अहिरे, व्दितीय आलेले श्रीकांत गायकवाड, पोलिस उपअधिक्षक सुदर्शन पाटील, अश्विनी शेंडगे, सोनाली कदम तहसीलदार श्रीकांत निळे पाटील मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे  या सर्वांचे मार्गदर्शन   त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी लाभणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख,अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी मान्यवरांचे हस्ते या सर्व टॉपर्संचा सत्कार होणार आहे. या मार्गदर्शनशिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.

000000
वृक्षरोपणासह संगोपनाची जबाबदारी घ्यावी
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 4 :- जीवनात वृक्षाचे मोठे महत्व असून सर्वांनी वृक्षारोपणासह वृक्ष संगोपनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
          
  चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नांदेड तहसिल कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नांदेड उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयाच्यावतीने सामुहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांनी सुमारे दोनशे वृक्षांची लागवड केली.  
            यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार (पुरवठा) विजय चव्हाण, नायब तहसिलदार (निवडणुक) स्नेहलता स्वामी व गजानन नांदगावकर, नायब तहसिलदार (महसूल) मुगाजी काकडे व विजय पाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी के. वाय. शेख, मंडळ अधिकारी, महसूल व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
            पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकांने वृक्षाची लागवड करुन इतरांनाही वृक्षलागवडीसाठी प्रेरीत करावे, असे आवाहन करुन श्री. डोंगरे यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे विविध समस्या निर्माण होतात. त्यासाठी प्रत्येकांनी झाडे लावून ते जगवण्याचा संकल्प केला पाहिजे, असे सांगितले.
नांदेड तहसिल परिसरात वड, पिंपळ, लिंब, अशोका, जांभुळ, कदबा, कोनोक्राप्स, महागुनी, सप्तपर्णी आदी प्रजातीचे वृक्षांची लागवड करण्यात आली. सामाजिक वनिकरण विभागाकडून या वृक्षांची रोपे देण्यात आली. नांदेड तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने 2 हजार वृक्ष लागवड करण्‍यात येणार आहे. त्‍याकरीता तालक्‍यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेमार्फत प्रत्‍येक गावांमध्‍ये वृक्षारोपण करणार आहेत.

000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...