Wednesday, January 29, 2025

  वृत्त क्रमांक 128

माजी सैनिकांची ऑनलाईन नोंदणी आता अनिवार्य

नांदेड दि. 29 :- महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्व डाटा डिजिटलायझेशन, संगणकीकरण करण्याचे काम सुरु आहे. https://.mahasainik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर 31 मार्च 2025 च्या पूर्वी रजिस्ट्रेशन करून अर्ज भरून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे जमा करावा. जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबितांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जर हे रजिस्ट्रेशन केले नाही तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या सुविधा मिळतात त्या मिळणार नाहीत. यासाठी माजी सैनिकांना शुल्क म्हणून 100 रुपये लागणार आहे. माजी सैनिक विधवांना व अवलंबितांना शुल्क माफ आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क करावा, असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले.

0000

 वृत्त क्रमांक  127

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा 

नांदेड दि. 29 जानेवारी :- राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे गुरूवार 30 जानेवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरुवार 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. इंदायणी निवास येथून नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आगमन व जीवनसाधना गौरव पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थिती. दुपारी 12 वा. लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस ऑनलाईन उपस्थिती. दुपारी 1 वा. नांदेड येथून अहमदपूर तालुक्यातील गंगाहिप्परगाकडे प्रयाण करतील. 

0000

 वृत्त क्रमांक 126

दिव्यांग शाळेतील मुला-मुलींसाठी

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन    

नांदेड दि. 29 जानेवारी :- जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळांमधील दिव्यांग मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धाचे 3 फेब्रुवारी रोजी नांदेड पोलीस परेड ग्राऊंड येथे तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 4 फेब्रुवारी रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे करण्यात आले आहे. 

स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित, विनाअनुदानित आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित अंध,अस्थिव्यंग,मतिमंद व मुकबधिर प्रवर्गाच्या विशेष शाळा, कार्यशाळांमधील दिव्यांग मुले-मुली यांच्यामधील दिव्यांगत्वानुरूप तथा दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार या स्पर्धा घेतल्या जातील. स्पर्धामध्ये 850 दिव्यांग मुले-मुली आणि संबधित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 4 फेब्रुवारी रोजी दिव्यांग मुले-मुलींच्या सुप्तगुणांना वावमिळावा या उद्देशाने सांस्कृतिक स्पर्धा कुसूम सभागृह नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे. 

आयोजित क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धामध्ये दिव्यांग मुले-मुली व दिव्यांग व्यक्ती, लोकप्रतिनिधी, अधिकार-कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. याबाबत दिव्यांग मुले-मुली, उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची कार्यक्रमप्रसंगी नियोजनाबाबत विविध समिती गठित करण्यात आली होती. त्या समिती सदस्यांची नियोजनाबाबत एकत्रित बैठक नुकतीच कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला वै.सा.का. कैलास मोरे यांच्यासह सर्व शाळेतील मुख्याध्यापक, सर्व समिती प्रमुख, सदस्य उपस्थित होते.

000000

 वृत्त क्रमांक 125 

नांदेडमध्ये तृतीयपंथी समुदायासाठी

दोन दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

 

नांदेड दि. 29 जानेवारी :- CYDA संस्था आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी बांधव आणि भगिनींसाठी दोन दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश तृतीयपंथी समुदायाला स्वावलंबी बनवणेउद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आणि आर्थिक साक्षरता प्रदान करणे हा होता.

 

या प्रशिक्षणात सुमारे 37 तृतीयपंथी बांधव आणि भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि विविध व्यवसाय कौशल्ये आत्मसात केली. कार्यशाळेत व्यवसायाची योग्य कल्पना कशी निवडावीव्यवसायाची वाढ कशी साधावीबचतीचे महत्त्ववित्तीय साक्षरताडिजिटल साक्षरता तसेच व्यवसायासाठी शासकीय योजनांचा कसा लाभ घ्यावा याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

 

सहभागी तृतीयपंथीयांनी या प्रशिक्षणाचा उत्कृष्ट प्रतिसाद दिला. त्यांनी व्यवसाय प्रशिक्षणाचे फॉर्म भरून आपल्या व्यवसायाचे नियोजन केले आणि भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे तृतीयपंथी समुदायातील अनेक जणांना आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरणा मिळाली.

 

कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे तृतीयपंथी समुदायाला नवी संधी आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने मजबूत पाऊल उचलण्याची संधी प्राप्त झाली.

 

सामाजिक समावेश आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असूनभविष्यातही तृतीयपंथी समुदायाच्या सशक्तीकरणासाठी असे उपक्रम राबवले जावेतअशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

0000

 वृत्त क्रमांक 124 

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा   

 

नांदेड दि. 29 जानेवारी :- राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणीपुरवठा आणि स्वच्छताऊर्जामहिला व बालविकाससार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर उद्या गुरूवार 30 जानेवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

गुरूवार 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी वा. परभणी येथून बिलोली तालुक्यातील सगरोळीकडे प्रयाण. सकाळी 11 वा. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आगमन व आयोजित महिला मेळाव्यास उपस्थिती. दुपारी वा. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा.  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आगमन व पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सायं 4.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व राखीव. सायं 5.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाक्याजवळ नांदेडकडे प्रयाण. सायं. वा. ए. के. संभाजी मंगल कार्यालय नांदेड येथे डॉ. सचिन उमरेकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सोयीनुसार शुभंकरोती फाउंडेशन पावडेवाडी मसाई चौक आणि ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल जवळ फरांदेनगर पावडेवाडी रोड वाडी बु.कडे प्रयाण. सोयीनुसार ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाक्याजवळ नांदेड येथून नयनस्वप्न निवास जुना पेडगाव रोड परभणीकडे प्रयाण करतील.

0000  

 वृत्त क्रमांक  123 

विकसित भारताचे ध्येय साधण्यासाठी

भारताची नवउद्योजकांचा देश ही ओळख निर्माण करा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

·         स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाचा 27 वा दीक्षांत समारंभ थाटात 

नांदेड दि. 29 जानेवारी : देशातील अनेक नव-तरुणांनी स्टार्टअपद्वारे 1 लक्ष, 10 हजार कोटीहून अधिक किमतीचे उद्योग उभारले आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक क्षमता तर वाढतच आहेच. त्याशिवाय रोजगारही निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करून भारताच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. विद्यार्थ्यांनी विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योजक बनायला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षान्त समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष व पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रख्यात प्रा. भूषण पटवर्धन, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, डॉ. संतुक हंबर्डे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत पेशकार, नरेंद्र दादा चव्हाण, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एम. मोरे, इंजि.नारायण चौधरी, डॉ. संतराम मुंढे, हनमंत कंधारकर, डॉ. सुरेखा भोसले, सहसंचालक किरणकुमार बोंदर, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाला आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणारी विद्यार्थींनी परभणी येथील बी. रघुनाथ आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची कु. श्रद्धा हरहरे यांना नांदेड चान्सलर सुवर्ण पदकाने राज्यपालांनी सन्मानित केले. 

अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले,संशोधन आणि नाविन्य हे आपल्या केंद्रस्थानी असले पाहिजे. नेतृत्व गुण जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहण्यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. डिजिटल व्यसन ही वृद्ध आणि तरुण दोघांमध्येही वाढणारी समस्या आहे. मोबाईल फोन व इंटरनेट वापरात शिस्त पाळावी. तुमच्या आयुष्यातील स्क्रीन टाईम कमी करावा. विद्यार्थी जीवनात आव्हाने, अडथळे, अपयश येत असतात. याकडे संधी म्हणून पहावे. यश मिळायला उशीर होईल पण यश मिळणार नाही असे होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा गरज असेल तेव्हा आधार घ्या आणि स्वतःचे ध्येय पूर्ण करा. एकट्यासाठी जगू नका दुसऱ्यांसाठी जगा, समाजाला परत दिल्याशिवाय शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. शेवटी त्यांनी देशासाठी संपत्ती निर्माण करा, स्टार्टअप व उद्योजकांचा देश म्हणून देशाला नवी ओळख द्या आणि जीवनात यशस्वी व्हा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

या दीक्षान्त समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष  प्रा. भूषण पटवर्धन म्हणाले, विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस तुमच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. तुम्ही मिळवलेले ज्ञान हे विशेषाधिकार आणि जबाबदारी दोन्ही आहेत. तुमच्या पुढील जीवन प्रवासाने विद्यापीठाची अखंडता, उत्सुकता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे प्रतिबिंब दिसायला हवे. जगात पाऊल ठेवत असताना चांगल्या गोष्टी आत्मसात करा स्वतःला वाईट व्यसनापासून दूर ठेवा. हे जग तुमच्या तेजस्वीपणाची उत्सुकतेची आणि करुणेची वाट पाहत आहे. पुढे जाऊन सौर्हादाचा वारसा निर्माण कराल, अशी आशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर  यांनी प्रस्ताविकेद्वारे विद्यापीठाचा थोडक्यात अहवाल सादर केला. प्रमुख अतिथींचे दीक्षान्त मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आगमन झाले. प्रारंभी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला चंदनहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. पृथ्वीराज तौर व डॉ. योगिनी सातारकर यांनी केले.  

या दीक्षान्त समारंभामध्ये 51 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये फसीहा शेख अनुद शेख, प्रीती राजहंस, अक्षता शेळके, नंदिनी बिरादार, प्रतीक्षा टोम्पे, कोमल कापसे, तृप्ती कुलकर्णी, प्रियंका रेवते, सुजाता खटके, काजल मोरे, शिवानी कुलकर्णी, पवन चौधरी, श्रावणी गांधी, वैशाली कीर्तने, शैलेश भुतडा, कामाजी पुयड, व्हूवनेश्वर बुजारे, शिरीन फतिमा परकोटे, आकांक्षा करणे, शुभम मोतीपवळे, सोनाली हिवरे, सुमय्या खाटून, पवन चौधरी, सचिन बनाटे, साक्षी सूर्यवंशी, सरोजा लोळे, काजल मोरे, राजश्री जाधव, प्रियंका देशपांडे, कांचन आवलकोंडे, पृथ पाठक, पूजा गायकवाड, सुधीर सावंत, श्रेया शहाणे, श्रुती राजवाड, शझिया पठाण, अतुल समिंदरा, आकांक्षा करणे, हर्षिता भुतडा, ज्ञानेश्वरी जायभाये, शिवानी कुलकर्णी, शिवकांता पाटील या विद्यार्थ्यांचा समवेश आहे. 

दुपारच्या सत्रामध्ये 180 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र दीक्षान्त समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य यांच्यासह संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

0000













वृत्त क्रमांक  122

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 29 जानेवारी:- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे गुरूवार 30 जानेवारी 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरूवार 30 जानेवारी रोजी सकाळी 4.30 वा. छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10  वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबादकडे प्रयाण करतील. 

00000

 वृत्त क्रमांक  121

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे दीक्षांत समारंभासाठी आगमन 

नांदेड दि. २९ जानेवारी: राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांचे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नांदेड येथे आगमन झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभासाठी ते नांदेडला आले आहेत.

सकाळी साडेदहा वाजता त्यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार श्रीजया अशोक चव्हाण,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे आदी उपस्थित होते.

00000






नांदेड जिल्हा २०२४-२५ विकास आराखड्याची सद्यस्थिती. पुढील वर्षाच्या २०२५-२६च्या नियोजनाचा आराखडयासंदर्भातील पूरक माहिती. संदर्भासाठी. बातमी प...