Friday, May 3, 2024

 वृत्त क्र. 405 

नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध

नांदेड दि. 3  - नांदेड जिल्ह्यात 4 ते 7 मे 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.

 

याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एकतर्फी आदेश 3 मे 2024 रोजी निर्गमीत केले आहे.

00000

 वृत्त क्र. 404 

लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 3 मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्रक्रियेदरम्‍यान नांदेड जिल्‍ह्यातील 88-लोहा विधानसभा मतदार संघामध्‍ये 7  मे  रोजी ज्‍याठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्‍याठिकाणा पासून  200 मीटर परिसरात पक्षकारांना मंडपे उभारण्‍यास, दुकाने चालू ठेवण्‍यास व मोबाईल, कॉडलेसफोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांचा वापर करण्‍यास, संबंधीत पक्षांच्‍या चिन्‍हांचे प्रदर्शन करण्‍यास तसेच सर्व प्रकारचे फेरीवाले, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास याद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध करण्‍यात आले आहे.   

 

नांदेड जिल्‍ह्यातील 88-लोहा या विधानसभा मतदार संघामध्‍ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया 2024 करीता हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्‍हणुन दिनाक 7  मे  2024 रोजी  मतदान सुरु झाल्‍यापासुन मतदान संपेपर्यंत अंमलात राहील.

00000

 वृत्त क्र. 403 

संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नियोजन करा जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश

 

नायगाव, बिलोलीत अधिकाऱ्यांसोबत आढावा


 गावागावातील जलसंधारणाच्या कामाला गती द्या


नांदेड दि. 3 : कालच्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज नायगाव व बिलोलीमध्ये तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संभाव्य टंचाईला लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दिले.

 

नायगाव, बिलोली येथील अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चाऱ्याची उपलब्धता, जलजीवन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची स्थिती, पुढील दीड महिन्यात प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे सुरू करण्याबाबतची अधिकाऱ्यांची आखणी, त्यांनी यासाठी केलेले नियोजनाचा आढावा घेतला.

 

जूनच्या मध्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे.तोपर्यंत सर्व यंत्रणेकडे दीड महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे झाली पाहिजे.परंपरागत जलसाठे गाळमुक्त करणे गरजेचे आहे. गाव तलाव, गावालगतचे नाले, जुने बंधारे याचे खोलीकरण रुंदीकरण विस्तारीकरण लोकसहभागातून होतील याकडे लक्ष देण्याची त्यांनी सांगितले नागरिकांनी देखील आपला जिल्हा हा पाणीटंचाईचा जिल्हा असून जलस्त्रोत वाढण्यासाठी या काळात लोकसहभागातून होणाऱ्या जलसंधारण कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

या बैठकीला नायगाव, बिलोली तालुक्याचे तहसीलदार ,तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, जलसंधारण व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंत्याची उपस्थिती होती. प्रलंबित कोणतीही कामे राहणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.

00000






 वृत्त क्र. 402 

लातूर लोकसभेसाठी ड्युटी लागलेल्या

कर्मचाऱ्यांसाठी 5 मे रोजीची बस व्यवस्था

 

 88-लोहा विधानसभा क्षेत्रासाठी सुविधा उपलब्ध

 

नांदेड दि. 3 मे : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान केंद्राध्‍यक्ष व मतदान ,अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कर्तव्‍यासाठी त्‍यांना नेमूण दिलेल्‍या 88-लोहा विधानसभा मतदार संघात जाण्‍यासाठी केलेल्‍या बसेसच्‍या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च, 2024 पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषीत केलेला आहे, 41-लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान दि. 7 मे रोजी पार पडणार आहे.सदरील निवडणुकीसाठी नियुक्‍त केलेल्‍या मतदान केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी,कर्मचारी यांना 88-लोहा विधानसभा मतदारसंघात घेऊन जाण्‍यासाठी प्रशासनाच्‍या वतीने वाहतूक व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. त्‍या संदर्भातील खालील प्रमाणे सूचना करण्यात आली आहे.

 

 ८3-किनवट, 84-हदगाव, 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगांव खै, 90-देगलूर आणि 91-मुखेड या विधानसभा मतदारसंघातून 41-लातुर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कामासाठी नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी यांना दिनांक 5 मे 2024 रोजी प्रशिक्षणासाठी 88-लोहा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत मतदान केंद्रावर जाण्‍यासाठी खालील प्रमाणे बसेसच्‍या विधानसभानिहाय थांबे निश्चित करण्‍यात आलेली आहे.

 

नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी यांनी 41-लातूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्‍य पार पाडण्‍यासाठी विविध विधानसभा मतदान संघातून 88-लोहा विधानसभा मतदारसंघात जाण्‍यासाठी दिनांक 5 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजता खालील ठिकाणी वेळेवर उपस्थित रहावे.

 

बस थांब्‍याचे ठिकाण

८३ किनवट ,शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था( I.T.I), गोकूंदा, किनवट

८४ हदगाव ,समाजकल्‍याण विभागाचे मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतीगृह,

बुध्‍दभुमी वसाहत, तामसा रोड, हदगाव.

८५ भोकर ,शासकिय मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, भोकर

८६ नांदेड उत्‍तर, व ८७ -नांदेड दक्षिण मुख्य‍ प्रशासकिय इमारत, तहसिल कार्यालय, नांदेड

८९ नायगांव खै ,शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था ( I.T.I), नायगांव खै.

९० देगलूर ,तहसिल कार्यालय, देगलूर

९१ मुखेड ,मुख्‍य प्रशासकिय इमारत, तहसिल कार्यालय, मुखेड.

 

तसेच दिनांक 7 मे 2024 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्‍यानंतर सबंधित मतदारसंघाच्‍या मतदान साहित्‍य स्विकृती केंद्रावरुन मतदान केद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी यांना परत येण्‍यासाठी सुध्‍दा बसेसची सुविध उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. यासाठी सबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात येत आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...