Friday, October 25, 2024

वृत्त क्र. 981

वृत्त क्र. 980

आज नागार्जुना पब्लिक स्कुल येथे दक्षिण मतदार संघाच्यावतीने प्रथम प्रशिक्षण

  वृत्त क्र. 979

सोमवार-मंगळवार फक्त दिवस

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी


शनिवारी अर्जासाठी सार्वजनिक सुटी

 

नांदेड दि. 25 ऑक्टोबर :- लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. उद्या शनिवार व परवा रविवारी शासकीय सुट्यांचे दिवस आहेत. त्यामुळे उद्या शनिवारी अर्ज दाखल केले जाणार नाहीत. त्यामुळे सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर व मंगळवार 29 ऑक्टोबर या दोन दिवसातच उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत.


भारत निवडणूक आयोगाने यासंदर्भात यापूर्वीच विशेष आदेश काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 1951 च्या प्रतिनिधित्व कायदा अंतर्गत निवडणूक काळात येणाऱ्या सुट्यांमध्ये दुसरा व चौथ्या शनिवारी अर्ज न स्विकारण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या शनिवारी दिनांक 26 ऑक्टोबरला कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही. नांदेड जिल्हा प्रशासनाने देखील ही सूचना जारी केली आहे.


त्यामुळे लोकसभा पोटनिवडणूक व जिल्यातील नऊ विधानसभेसाठी शनिवारी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवारांकडे सोमवार व मंगळवार हे दोन दिवस असून त्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी यावेळेतच अर्ज स्विकारले जाणार आहेत. सर्व इच्छूक उमेदवारांनी ही बाब लक्षात घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000

 वृत्त क्र. 978

मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड दि. 25 : मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.) व परिसरात आज 25 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 14:43 वा व 15:13 वा दोन वेळा भुगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली.

अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपसदृश्य हादऱ्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर अनुक्रमे 1.5 व 0.7 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून 12 किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हाप्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
०००००

वृत्त क्र. 977

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपमार्फत विविध जनजागृती कार्यक्रम 

मनपा आयुक्ताकडून जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा

 

नांदेड,25 - आगामी लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 86- नांदेड उत्तर आणि 87- नांदेड दक्षिण मतदारसंघांमध्ये व्यापक जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे.

 

यानिमित्त आज नांदेड वाघाळा महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा घेण्यात आला.

 

यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती कार्यक्रमाची चर्चा करण्यात आली. मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर्स) च्या माध्यमातून घरोघरी भेट देऊन मतदारांपर्यंत पोहोचणेसार्वजनिक ठिकाणी पथनाट्यमतदान शपथमहिला बचत गटांचे मेळावेविविध व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करणेतसेच ऑटोरिक्षातून जागृती संदेश प्रसारित करणे या उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी सांगितले.

 

 महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट आणि ध्वनीक्षेपक रिक्षांचे उद्घाटन डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मी मतदान करणार या स्वाक्षरी मोहिम फलकाचे अनावरण करण्यात आले. यात अनेकांनी सहभाग घेतला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सहमती दर्शवली. तसेच येत्या दिवाळीमध्येही स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

 

या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदमउपायुक्त अजितपालसिंघ संधूशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरीजिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आडेप्रा. डॉ. घनश्याम येळणेअधीक्षक एस.आर. पोकळेबालासाहेब कच्छवेहनुमंत राठोडसारिका आचमेकविता जोशीसंजय भालकेसुनील मुत्तेपवारसाईराज  मदिराजआशा घुलेमाणिक भोसलेशिवराज पवारमुकुंद अनासपुरेगणेश कस्तुरेअनिल कांबळे यांच्यासह 86- नांदेड उत्तर मतदार संघ व 87- नांदेड दक्षिण मतदार संघाचे स्वीप कक्षाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

00000






वृत्त क्र. 976

नांदेड विधानसभा मतदार संघात धडक कारवाई

आतापर्यंत 24 लाखांचा ऐवज जप्त

 

नांदेडदि. 25 ऑक्टोंबर :- नांदेड जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत 24 लक्ष रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने पुढील काही दिवस आणखी सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने फिरते पथक व स्थिर निगराणी पथक तैनात केली आहेत.

 

या पथकामार्फत  काळात पैशाची देवाण-घेवाणभेट वस्तु वाटप,रोख रक्कम,अंमली पदार्थदारु विक्री व वाहतूक अशा घटनावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. या पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येवून एकूण 24 लाख 4 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

यात भोकर 1 लाख 70 हजार 30 रुपयेदेगलूर 2 लाख 77 हजार 650हदगाव 26 हजार 900किनवट 1 लाख 71 हजार 725लोहा 44 हजार 100मुखेड 71 हजार 140नायगाव 3 लाख 10 हजार 980नांदेड उत्तर 12 लाख 35 हजार 380नांदेड दक्षिण 97 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 ०००००

वृत्त क्र. 975

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय मगसी व्हिजिल ॲपवर तक्रार करा

100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

 

नांदेडदि. 25 ऑक्टोंबर :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदारनागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

 

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवारप्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पणकाहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सी व्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. सी व्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठीवापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणेउल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिलस्थानवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे. वैशिष्ट्ये सी व्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

 

वापर कसा करायचा एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सी व्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांकपत्तामतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा. अचूक कृती व देखरेख या ॲप्लिकेशनचा वापर करूननिवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सी व्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्षनिवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृतीदेखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते. लाईव्ह फोटोव्हिडिओ या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटोव्हीडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथकस्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

 

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच निवडणूक यंत्रणा तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल. डाटा सुरक्षा या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

 

नांदेड विधानसभा मतदार संघात आतापर्यत सी-व्हीजील ॲपवर एकूण 32 तक्रारी दाखल झाल्या असून यापैकी 11 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेततर 21 तक्रार बेदखल होत्या. तरी नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-व्हीजील ॲपवर नोंदवाव्यात तसेच 1950 टोल फ्री क्रमांकावर ही तक्रार नोंदविता येईल.

00000

 


गेल्या तीन दिवस चाललेल्या बुद्धिबळ राज्यस्तर स्पर्धेच्या समारोपापूर्वी स्पर्धकांच्या रंगलेल्या फेरी

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...