Friday, October 25, 2024

  वृत्त क्र. 979

सोमवार-मंगळवार फक्त दिवस

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी


शनिवारी अर्जासाठी सार्वजनिक सुटी

 

नांदेड दि. 25 ऑक्टोबर :- लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. उद्या शनिवार व परवा रविवारी शासकीय सुट्यांचे दिवस आहेत. त्यामुळे उद्या शनिवारी अर्ज दाखल केले जाणार नाहीत. त्यामुळे सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर व मंगळवार 29 ऑक्टोबर या दोन दिवसातच उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत.


भारत निवडणूक आयोगाने यासंदर्भात यापूर्वीच विशेष आदेश काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 1951 च्या प्रतिनिधित्व कायदा अंतर्गत निवडणूक काळात येणाऱ्या सुट्यांमध्ये दुसरा व चौथ्या शनिवारी अर्ज न स्विकारण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या शनिवारी दिनांक 26 ऑक्टोबरला कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही. नांदेड जिल्हा प्रशासनाने देखील ही सूचना जारी केली आहे.


त्यामुळे लोकसभा पोटनिवडणूक व जिल्यातील नऊ विधानसभेसाठी शनिवारी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवारांकडे सोमवार व मंगळवार हे दोन दिवस असून त्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी यावेळेतच अर्ज स्विकारले जाणार आहेत. सर्व इच्छूक उमेदवारांनी ही बाब लक्षात घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...