वृत्त क्र. 391
रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या प्रयत्नानंतरही मतदान सुरळीतप्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू
नांदेड दि. २६ : लोकसभा मतदाना दरम्यान आज रामतीर्थ येथे झालेल्या ईव्हीएम तोडफोडीनंतर या ठिकाणच्या व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिटला बदलविण्यात आले. इव्हीएम फोडण्याच्या प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत झाले,अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. कंट्रोल युनिट वर कोणताही परिणाम झाला नसल्यामुळे आधी झालेल्या मतदानाला कोणताही धोका नाही. तसेच संपूर्ण सेट अर्थात व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट बदलण्यात आल्यामुळे नव्या यंत्रांसह तातडीने मतदानाला सुरुवात झाली. ज्या मतदाराने ही तोडफोड केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.