Wednesday, July 12, 2017

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड, दि. 12 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 13 जुलै 2017 रोजी मुंबई येथुन नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. शासकीय वाहनाने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.

000000
जीएसटीबाबत मदत केंद्राची स्थापना;
सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 12 :- वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदाबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी येथील राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयातील मदत केंद्राद्वारे शंकाचे निरसन करुन मार्गदर्शन करण्यात येत आहे. संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड विभागाचे राज्यकर सहआयुक्त मा. म. कोकणे यांनी केले आहे.
वस्तू व सेवाकर कायदाबाबत (जीएसटी) माहिती देण्यासाठी वस्तू व सेवाकर कार्यालयात मदत केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. या केंद्रात राज्यकर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मदत केंद्राची माहिती राज्यकर विभागाच्या संकेतस्थळावर व 02462-231977 या दुरध्वनी क्रमांकासह उपलब्ध करण्यात आली आहे. या केंद्रात व्यापाऱ्यांना वस्तू व सेवाकर कायदाबाबत येणाऱ्या अडचणीचे निराकरण केले जात आहे. व्यापाऱ्यांना वस्तू व सेवाकर कायदात एनरोलमेंट व नोंदणी अर्ज नि:शुल्क भरुन देण्यात येत आहे. 
            भारत सरकारने 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवाकर कायदयाची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानुसार राज्यातील कर गोळा करण्याची जबाबदारी राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. राज्य वस्तू व सेवाकर कार्यालय नांदेड यांच्यावतीने वस्तू व सेवाकर कायदाबाबत विविध कार्यक्रमांद्वारे जिल्ह्यात जनजागृती व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
            राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयाच्यावतीने वस्तू व सेवाकर कायदांतर्गत नोंदणीसाठी दोन राज्यकर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधीत अधिकारी यांना नांदेड विभागातील नवीन नोंदणी अर्ज मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन जीएसटी नोंदणी क्रमांक देण्यात येत आहेत. नोंदणी अर्ज www.gst.gov.in या संकेतस्थळावर दाखल करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये वस्तू व सेवाकर कायदानुसार नोंदणी घेण्याची वार्षिक उलाढाल मर्यादा 20 लाख इतकी निर्धारीत करण्यात आली आहे. नवीन नोंदणी अर्ज केंद्रीय कर विभाग व राज्यकर विभाग यामध्ये विभागून येत आहेत. जीएसटीत पात्र अनोंदणी व्यापाऱ्यांनी त्वरीत नोंदणी अर्ज करावेत. व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय 16 अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जीएसटी कायदाच्या अंमलबजावणीचा व्यापारावर होणाऱ्या परिणामाचा व विविध वस्तुंच्या विक्री दरात होणाऱ्या बदलांचे सर्वेक्षण करीत आहेत. व्यापाऱ्यांनी व ग्राहकांनी राज्यकर अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन नांदेड विभागाचे राज्यकर सहआयुक्त मा. म. कोकणे यांनी केले आहे.

0000000
अकरावी व्यवसायिक प्रशिक्षण
अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु
नांदेड दि. 12 :- येथील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र संचलित इयत्ता 11 वी व्यवसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना (एचएससी व्होकेशनल) प्रवेश सुरु असल्याचे मुख्याध्यापक शासकीय तंत्र प्रशाला केंद्र नांदेड यांनी कळविले आहे.
या प्रशाला केंद्रात चालवण्यात येणाऱ्या  व्यवसाय अभ्यासक्रमात ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी यांचा समावेश असून प्रत्येकी 25 प्रवेश क्षमता असणाऱ्या या अभ्यासक्रमांना दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजीसाठी शासकीय व निमशासकीय क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून स्वयंचलीत दुचाकी, चारचाकी वाहनाचे दुरुस्ती केंद्र सुरु करता येते. ऑटो फिटर, असेंब्ली शॉपमध्ये, निरीक्षक, कारखान्यात विविध पदावर कामे करता येतात. ऑटो डिलर, ऑटो स्पेअर पार्ट, सेल्समन, व्हेईकल, सर्वेअर, ड्रायव्हर, शिल्प निदेशक इत्यादी. टायर पंक्चर दुरुस्ती, पार्ट दुरुस्ती, सर्व्हिसींग सेंटर, वेल्डींग, लेथ मशीन ऑपरेटर इत्यादी व्यवसाय करता येतात. एसटीमध्ये अप्रेंटिशीप लागू.
इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी शासकीय व निमशासकीय क्षेत्रात विविध संधी उपलब्ध. घरगुती उपकरणाची दुरुस्तीची कामे करता येतात. मोटार रिवायंडिंगजी कामे करता येतात. सेल्समन, विद्युत उपकरणाची डिलरशीप, एजन्सी इत्यादी  ठेकेदारी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था सुशिक्षीत बेरोजगार म्हणून 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत विना निविदा कामे देण्याची व्यवस्था, स्वयंरोजगार कार्यालयात व्होकेशनल टेक्निशीयन म्हणून नोंदणीकॉम्प्युटर टेक्नॉलॉजी शासकीय व निमशासकीय क्षेत्रात विविध संधी उपलब्ध. संगणक हाताळण्याचे सविस्तर प्रशिक्षण.
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. मर्यादित जागा असल्यामुळे दहावीचा निकाल लागताच आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेशीत विद्यार्थ्यांना पोस्ट योजनेखाली कमवा व शिका या कार्यक्रमात सहभागी होता येते. विद्यार्थ्यांनी ओजेटी या योजनेखाली औद्योगिक आस्थापनाकडे विशेष प्रशिक्षणासाठी दरवर्षी एक महिन्यासाठी पाठविल्या जाते. लोकसेवा केंद्राच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना संस्थेच्या मदतीने सहकारी संस्थेची नोंदणी करता येते. ज्यामध्ये काम मिळाल्यावर सुरक्षा अनामत भरण्यापासून सूट मिळते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसायाचे टुलकीटस् व पुस्तके मोफत देण्यात येतील. तांत्रिक बेरोजगारांची सोसायटी स्थापन करुन शासनाकडून अनुदान मिळविता येते. सर्व व्यवसायांना शिकाऊ उमेदवारी लागू असून त्याअंतर्गत एक ते दोन वर्षापासून 2 हजार 100 ते 2 हजार 400 प्रती महिना मानधन, ईबीसी सवलत लागू.
तज्ज्ञ शिक्षक वर्ग, परिपूर्ण यंत्रसामुग्री, कार्यशाळा, ग्रंथालय सुविधा, प्रशिक्षणाच्या कामात संगणकाचा वापर करण्यात येतो. व्यवसाय मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळविण्यासाठी उपयुक्त सल्ला दिला जातो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बीए, बीकॉम, बीसीए प्रथम वर्ष तसेच पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षास प्रवेशासाठी पात्र. इयत्ता बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी. अधिक माहितीसाठी इच्छूकांनी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड (दूरध्वनी 02462-259139) येथे संपर्क साधावा

0000000
मतदानापासून पात्र मतदार वंचित राहू नये
- अनुराधा ढालकरी
नांदेड दि. 12 :- मतदानापासून एक ही पात्र मतदार वंचित राहू नये असे आयोगाचे धोरण आहे. त्यासाठी तरुण पात्र मतदार, महिला मतदार तसेच वंचित मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले.  
जिल्हा व तालुका प्रशासन निवडणूक विभागाच्यावतीने तरुण व पात्र मतदार नोंदणी अभियान महाविद्यालयामार्फत राबविले जात आहे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार भावी मतदारांसाठी आंतरशालेय परिसंवादाचे माध्यमातून मतदार जागृती करण्यासाठी महिन्यातील हा दुसरा कार्यक्रम शासकीय तंत्रनिकेतन येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती ढालकरी यांनी मतदानाचे महत्व सांगितले. महाविद्यालय व भावी, तरुण मतदारांनी या चळवळीचा भाग व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.  
प्राचार्य श्री. पोपळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन केले. यावेळी मस्ती दोस्ती मतदान या फिल्म नंतर मतदान यंत्राची सुरक्षितता व विश्वासर्हता याबाबतची क्लीप दाखविण्यात आली. संगणक खेळ स्पर्धाही आयोजित केल्या गेली.
निवडणूक नायब तहसिलदार गजानन नांदगावकर, निवडणूक विभागाचे श्री. हंबर्डे व महाविद्यालयाचे नोडल अधिकारी श्री. कळसकर यांचेसह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी केले तर प्राचार्य श्री. पोपळे यांनी आभार मानले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
000000


जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समिती
(दिशा) ची 15 जुलै रोजी बैठक
          नांदेड, दि. 12 :- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) या समितीची बैठक शनिवार 15 जुलै 2017 रोजी  सकाळी 11 वा. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे. 
लोकसभा सदस्य तथा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यासाठी संबंधित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सदस्य , अधिकारी यांनी बैठकीस उपस्थित रहावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) नांदेड यांनी केले आहे. 

0000000
होमगार्डची सदस्य नोंदणी
 17 व 18 जुलैला पोलीस मुख्यालया
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यातील नांदेड, कंधार, बिलोली, भोकर, किनवट, मुखेड, देगलूर व हदगाव या पथकासाठी पुरुष-91 व महिला-181 होमगार्डची सदस्य नोंदणी सोमवार 17 जुलै  2018 व मंगळवार 18 जुलै 2017 रोजी सकाळी 7 वा. पासून पोलीस मुख्यालयाचे कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे होणार आहे.  उमेदवाराची निवड ही पुर्णपणे गुणवत्तेवर होणार असून उमेदवारांनी कोणत्याही अमिषास किंवा भुलपाथांना बळी पडू नाही, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.
होमगार्ड नाव नोंदणीसाठी निकष पुढील प्रमाणे आहेत. इयत्ता 10 वी उत्तीर्ण, वय- 20 ते 50 वर्षे, उंची- पुरुष 162 व महिला- 150 सेमी. छाती- न फुगवता 76 सेमी, फुगवुन 81 सेमी. पुरुष उमेदवारांना विहित वेळेत 1 हजार 600 मीटर तर महिला उमेदवारांना विहित वेळेत 800 मीटर धावणे बंधनकारक आहे. पुरुषांना 7.260 किलो ग्रॅम वजनाचा गोळा फेक व महिलांना 4 किलो ग्रॅम वजनाचा गोळा फेक बंधनकारक आहे. पुरुष , महिला उमेदवारास चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रकारात कमीतकमी 40 टक्के गुण अवश्यक राहतील.
नोंदणी प्रक्रियेचा मुळ अनुशेष पुढील प्रमाणे राहील. पथकाचे नाव (कंसात पुरुष) कंसाबाहेर महिला संख्या. नांदेड (35) 56, बिलोली- (7)27, मुखेड (5) 11, देगलूर- (16) 7, हदगाव (28) 25, तर महिलांसाठी कंधार- 23, भोकर-11, किनवट- 21. उमेदवारांनी नोंदणीसाठी सोबत इयत्ता 10 वी उत्तीर्ण असल्याचे मुळ प्रमाणपत्र तसेच कोणताही रहिवाशी पुरावा व तीन रंगीत पासपोर्ट छायाचित्रे आणणे आवश्यक आहे. या व्यतीरिक्त उमेदवारांनी आयटीआय प्रमाणपत्र, खेळामध्ये कमीतकमी जिल्हास्तरावर सहभाग घेतलेले प्रमाणपत्र, माजी सैनिक, एनसीसी बी/सी प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत असलेले प्रमाणपत्र, जडवाहन चालविण्याचा परवाना, तांत्रिक अर्हता गुण मिळविण्यासाठी सोबत आणावे. उमेदवारांनी मैदानी चाचणीच्या तयारीनिशी उपस्थित रहावे. काही अपरिहार्य कारणास्तव अडचण निर्माण झाल्यास नोंदणी कार्यक्रम रद्द करण्याचे अधिकार जिल्हा समादेशक यांना राहतील.
उमेदवारास नोंदणीसाठी स्वखर्चाने येणे-जाणे करावे लागेल. नोंदणीसाठी येताना शारिरीक चाचणीचे वेळी कोणताही अपघात घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगुन पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलूचपत प्रतिबंध कार्यालय नांदेड किंवा जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02462-254261 तसेच प्रशासकीय अधिकारी आर. डी. डाबेराव - 7798358691, प्रभारी केंद्र नायक नानासाहेब मोखडे- 9049816641 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.

000000
"स्वयम प्रकल्प" योजना किनवट ,
माहूर तालुक्यात राबविण्यात येणार  
नांदेड, दि. 12 :- राज्य शासनाने आदिवासी भागात परसातील कुक्कुट पालनाद्वारे अंगणवाड्यांमधील मुलांच्या आहारामधून अंडी पुरवठा करण्यासाठी व स्वयंरोजगार निर्मितीसाठी "स्वयंम प्रकल्प" किनवट व माहूर या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये राबविण्यात येणार आहे. "स्वयम प्रकल्प" संदर्भात अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती किनवट व माहूर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त तथा सदस्य सचिव स्वयम प्रकल्प यांनी केले आहे. 
या योजनेचे अंमलबजावणी क्षेत्र प्रकल्प कार्यालय एकात्मीक आदिवासी विकास विभाग यांच्याकडून निश्चित करुन एक मदर युनीट स्थापन करण्यात येणार आहे. मदर युनीटमार्फत  चार आठवड्याचे पक्षी निवडलेल्या लाभार्थ्यांना तीन टप्प्यात प्रती लाभार्थी 45 पक्षी प्रमाणे वाटप करण्यात येतील.
योजनेची जिल्हास्तरीय प्रकल्प समन्वयक समिती, मदर युनिटधारक व लाभार्थी निवड समिती शासनाने पुढील प्रमाणे गठीत केली आहे. अध्यक्ष- जिल्हाधिकारी, सहअध्यक्ष- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य- प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सहायक संचालक समाज कल्याण (राज्यस्तर), जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी (राज्यस्तर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) जि. प., जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. प., प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद), प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सदस्य सचिव- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे राहतील. तर तालुकास्तरीय प्रकल्प संनियंत्रण समिती पुढील प्रमाणे. अध्यक्ष- गटविकास अधिकारी, सदस्य- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) तालुकास्तरीय प्रतिनिधी, सदस्य सचिव- पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती हे राहतील.

000000
दहावी, बारावी परीक्षा केंद्रांच्या
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 12 :-  जिल्ह्यात बारावीच्या (उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) आठ परीक्षा केंद्र परिसरात 11 ते 28 जुलै 2017 या कालावधीत व दहावीच्या (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) 21 परीक्षा केंद्र  परिसरात 18 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  
या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. 

000000
रासायनिक खताच्या किंमती कमी
 नांदेड दि. 12 :- गुडस ॲड सर्व्हिस टॅक्स (GST) लागु होण्यापूर्वी रासायनिक खतावर 1 टक्के उत्पादन शुल्क (Excise Duty) 5 टक्के मुल्य आधारीत कर (VAT) लाग होता. दिनांक 1 जुलै 2017 पासून अनुदानीत रासायनिक खतावर सरसकट 5 टक्के  जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनुदानीत रासायनिक खताच्या किंमती 1 जुलै पासून कमी झाल्या आहेत.  याबाबत खत विक्रेत्यांना तसेच खत कंपनी प्रतिनिधी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारीत दर साठा भाव फलकावर प्रसिद्ध करण्याबाबत कळविण्यात आले आहे, सुधारीत खताचे दर पुढील प्रमाणे आहेत.
दिनांक 1 जूलै 2017 पासून रासायनिक खताचे नव दर
अ.क्र.
रासायनिक खताचे नाव
उत्पादक कंपनीचे नाव
दि. 1/7/2017 पासूनचे नविन दर
प्रती बॅग 50 किलो
1
10:26:26
झुआरी
1076
2
10:26:26
कोरोमंडल
1044
3
10:26:26
कृभको
1055
4
12:32:16
झुआरी
1082
5
14:35:14
कोरोमंडल
1122
6
15:15:15
आर.सी.एफ.
887
7
16:16:16
आय.पी.एल.
892
8
17:17:17
कोरोमंडल
946
9
24:24:00
कोरोमंडल
966
10
एम.ओ.पी.
झुआरी
579
11
एम.ओ.पी.
आय.पी.एल.
580
12
एम.ओ.पी.
कृभको
577.50
13
एम.ओ.पी.
कोरोमंडल
575
14
एस.एस.पी. (जी.)
झुआरी
400
15
डी.ए.पी.
आर.सी.एफ.
1076
16
डी.ए.पी.
झुआरी
1105
17
डी.ए.पी.
आय.पी.एल.
1086
18
डी.ए.पी.
कोरोमंडल
1081
19
डी.ए.पी.
कृभको
1076
20
युरीया
आर.सी.एफ.
295
21
युरीया
झुआरी
295
22
युरीया
आय.पी.एल.
295
23
युरीया
कोरोमंडल
295
24
युरीया
नागार्जूना
295
25
युरीया
कृभको
295
26
अमोनिअम सल्फेट
आय.पी.एल.
700
27
15:15:15:09
आय.पी.एल.
890
28
16:20:0:13
कोरोमंडल
821
29
20:20:0:13
आय.पी.एल.
865
30
20:20:0:13
कोरोमंडल
873
31
20:20:0:13
कृभको
850
किरकोळ, घाऊक खत विक्रेत्यांनी कमी झालेल्या दराबाबत ग्रेडनिहाय दर, दरफलकावर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना नवीन दराने खताची खरेदी करावी.  खरेदी पावतीवर शेतकरी विक्रेता या दोघांच्या स्वाक्षरी घेण्यात याव्यात शेतकऱ्यांनी खताच्या दराबाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल एस.एम.एस. द्वारे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 (02462) 230123 भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
सर्व खत विक्रेत्यांना GST साठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व खत विक्रेत्यांनी GST साठी नोंदणी करावी खतावरील जीएसटी बाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाने मदत दुरध्वनी क्रमांक दिलेला आहे. त्यांचा क्रंमाक 011-26106817 असा आहे. त्याचा वापर करुन खतावरील जीएसटी बाबत शंका असल्यास प्रश्न विचारुन शंकानिरसण करण्यात यावे. सदरचा मदत क्रमांक केंद्र शासनाने fert.nic.in या संकेत स्थळावर सुध्दा प्रशिध्द केलेला आहे. या व्यतिरिक्त केंद्र शासनाने सर्व साधारण जीएसटीबाबत येणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी  दुरध्वनी क्रमांक 011-23094160, 011- 23094161, 011- 23094162, 011- 23094168, 011- 23094169 वर मदत केंद्रे म्हणून जाहीर केले आहेत.  
000000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...