Saturday, March 6, 2021

 

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतचे 10 एप्रिलला आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 10 एप्रिल 2021 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप, व न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मो.अ.दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारतसंचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले असुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी शनिवार 10 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

कोरोनाची खबरदारी घेत

जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या सुचना

नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोविड-19 अर्थात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जागतिक महिला दिन साजरा करतांना काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेले आहेत. येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या निर्देशाचे पालन करीत हा महिला दिन साजरा करावा, असे स्पष्ट करुन जिल्हा प्रशासनाने विविध कार्यालयांना सूचित केले आहे. 

जागतिक महिला दिन हा केंद्र व राज्य शासनाने कोविड संदर्भात निर्गमित केलेल्या सुचनांच्या अधिन राहून तसेच जिल्ह्यात कोविड-19 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने सुरक्षा उपाययोजना संबंधी आवश्यक ती खबरदारी घेऊन सोमवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असेही निर्देश दिले आहेत. 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जागतिक महिला दिन साजरा करण्याबाबत शासन परित्रकाद्वारे सूचना निर्गमीत केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहलिसदार, जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प., जिल्हा महिला बालविकास अधिकारी जि.प., बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक जि. प., उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांना पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुचना निर्गमीत केली आहे.

शासन परिपत्रकातील दिलेल्या सुचनेप्रमाणे सोमवार 8 मार्च 2021 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद केले आहे.

0000

 

नांदेड जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू  

1 हजार 318 अहवालापैकी 1 हजार 160 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 6 :- शनिवार 6 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 150 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 73 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 77 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 92 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

 

आजच्या 1 हजार 318 अहवालापैकी 1 हजार 160 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 309 एवढी झाली असून यातील 22 हजार 704 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 785 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 23 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

शनिवार 6 मार्च 2021 रोजी सिद्धार्थनगर देगलूर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 605 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 61, किनवट कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 92 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.39 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 50, देगलूर तालुक्यात 4, कंधार 1, मुदखेड 2, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर 6, लोहा 3, मुखेड 1, उमरी 4 असे एकुण 73 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 48, अर्धापूर तालुक्यात 8, देगलूर 1, किनवट 7, मुखेड 2, औरंगाबाद 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 2, धर्माबाद 3, हिमायतनगर 2, पुसद 2 असे एकूण 77 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 785 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 49, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 61, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 47, किनवट कोविड रुग्णालयात 34, मुखेड कोविड रुग्णालय 9, हदगाव कोविड रुग्णालय 3, महसूल कोविड केअर सेंटर 59, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 282, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 147, खाजगी रुग्णालय 89 आहेत.

 

शनिवार 6 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 140, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 38 हजार 704

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 10 हजार 77

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 309

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 704

एकुण मृत्यू संख्या-605

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.39 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-179

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-785

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-23.

0000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...