Saturday, March 6, 2021

 

कोरोनाची खबरदारी घेत

जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या सुचना

नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोविड-19 अर्थात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जागतिक महिला दिन साजरा करतांना काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेले आहेत. येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या निर्देशाचे पालन करीत हा महिला दिन साजरा करावा, असे स्पष्ट करुन जिल्हा प्रशासनाने विविध कार्यालयांना सूचित केले आहे. 

जागतिक महिला दिन हा केंद्र व राज्य शासनाने कोविड संदर्भात निर्गमित केलेल्या सुचनांच्या अधिन राहून तसेच जिल्ह्यात कोविड-19 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने सुरक्षा उपाययोजना संबंधी आवश्यक ती खबरदारी घेऊन सोमवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असेही निर्देश दिले आहेत. 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जागतिक महिला दिन साजरा करण्याबाबत शासन परित्रकाद्वारे सूचना निर्गमीत केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहलिसदार, जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प., जिल्हा महिला बालविकास अधिकारी जि.प., बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक जि. प., उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांना पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुचना निर्गमीत केली आहे.

शासन परिपत्रकातील दिलेल्या सुचनेप्रमाणे सोमवार 8 मार्च 2021 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...