सामोपचाराने मिटविलेल्या वादात केव्हाही अधिक सकारात्मकता
Wednesday, September 28, 2022
नांदेड जिल्ह्यात 160 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित
2 लाख 87 हजार 858 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण
नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 160 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. बुधवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन आज रोजी 38 हजार 675 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 2 लाख 87 हजार 858 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.
लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 42 गावे लम्पी बाधित आहेत. या 42 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 19 हजार 957 एवढे आहे. यातील 160 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 270 एवढी आहे. एकुण गावे 312 झाली आहेत. या बाधित 42 गावांच्या 5 किमी परिघातील 312 गावातील (बाधित 42 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 87 हजार 980 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 10 एवढी झाली आहे. उपलब्ध लस मात्रा 3 लाख 78 हजार एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
000000
लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 3 ऑक्टोंबर 2022 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबं
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी नांदेड यांनी कळविले आहे.
00000
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.70 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात बुधवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 3.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 1041.70 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात बुधवार 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 8 (1029.80), बिलोली-1.60 (1042.10), मुखेड- 2.20 (948.90), कंधार-0.10 (900.50), लोहा-0.40 (908.90), हदगाव-1.10 (925.10), भोकर-00 (1155.50), देगलूर-6.10 (864.80), किनवट-5.90 (1262.90), मुदखेड- 00 (1175.40), हिमायतनगर-00 (1282.70), माहूर- 00 (1117.60), धर्माबाद- 13.10 (1313.30), उमरी- 1.60(1206.10), अर्धापूर- 9.70 (951.90), नायगाव-7.90(916.70) मिलीमीटर आहे.
0000
वृत्त क्र. 93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...