Tuesday, November 6, 2018


महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
            नांदेड, दि. 6 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शनिवार 10 नोव्हेंबर 2018 रोजी वसंत खेडी (नविन वालतूर) जि. यवतमाळ येथून शासकीय वाहनाने दुपारी 4 वा. सचिन नाईक परशराम नाईक तांडा ता. किनवट येथे आगमन व राखीव.
            रविवार 11 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 वा. शासकीय वाहनाने माहूर देवस्थानकडे प्रयाण. सकाळी 9 वा. रेणुकामाता देवस्थान माहूर येथे आगमन व विश्वस्त मंडळासमवेत चर्चा. सकाळी 10 वा. शासकीय वाहनाने किनवट शहराकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह किनवट येथे आगमन व राखीव. दुपारी 11.15 वा. शासकीय वाहनाने शाहि वंदना मंगल कार्यालय किनवटकडे प्रयाण. दुपारी 11.40 वा. माहूर व किनवट तालुक्यातील बंजारा समाज बांधवा समवेत बैठक. स्थळ- शाहि वंदना मंगल कार्यालय किनवट. दुपारी 2 वा. शासकीय वाहनाने हिमायतनगरकडे प्रयाण. दुपारी 3 वा. हिमायतनगर येथे आगमन व बंजारा समाज बांधवा समवेत बैठक स्थळ- श्री परमेश्वर मंदिर संस्थान हिमायतनगर. सायं. 5.30 वा. शासकीय वाहनाने परशराम नाईक तांडा ता. किनवटकडे प्रयाण. रात्री 7.30 वा. श्री सचिन नाईक परशराम नाईक तांडा ता. किनवट येथे आगमन व राखीव.
            सोमवार 12 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 9 वा. शासकीय वाहनाने ढाणकी ता. उमरखेडकडे प्रयाण. महागाव येथून शासकीय वाहनाने दुपारी 2.30 वा.शासकीय विश्रामगृह हदगाव येथे आगमन व हदगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवा समवेत बैठक. दुपारी 3.30 वा. शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 5 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 5.10 वा. बंजारा समाज बांधव यांचे समवेत बैठकीकरीता उपस्थित. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेडचे सभागृह. रात्री 7 नंतर राखीव.
            मंगळवार 13 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 9 वा. शासकीय वाहनाने विश्रामगृह येथून नांदेड विमानतळकडे प्रयाण. सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.50 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000000



ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा
            नांदेड, दि. 6 :- राज्याचे ग्रामविकास, महिला व बाल विकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            बुधवार 7 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 2.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.20 वा. वाहनाने परळी वै. जि. बीडकडे प्रयाण करतील.
00000


कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन
                                                   श्री सचिंद्र प्रताप सिंह
                                                   आयुक्त कृषि, महाराष्ट्र राज्य
सद्यस्थितीत कपाशीचे पीक बोंडे पक्वता व वेचणीच्या अवस्थेत आहे. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान 290 ते 320 सें. व रात्रीचे तापमान 110 ते 14 0 सें. तर दिवसाची आर्दता 71 ते 80 टक्के तर रात्रीची आर्दता 26 ते 35 टक्के अत्यंत पोषक आहे. यावर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या  आठवडयापासुन ते आक्टोबरच्या तिसर्‍या आठवडयापर्यंत सरासरी दिवसाचे तापमान 350 सें. असल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. परंतु आता यापुढे तापमान जसे जसे कमी होत जाईल व हे तापमान वरील तापमानाच्या श्रेणीमधे (टप्यामधे) येईल तशी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात वाढ होईल.
गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी नियमित सर्वेक्षण करून फेरोमोन सापळयामधील पतंग दर आठवडयाने मोजून नष्ट करावे. शेतामधे लावलेल्या सापळयामधील कामगंध वडया (ल्युर) वेस्टनावरील सुचनेनुसार बदलाव्यात व प्रत्येक  शेतकरी बंधुनी एकरी कमीत कमी आठ फेरामोन सापळे लावून सापाळ्यात अडकलेले पतंग नष्ट करण्याची मोहीम राबवावी.
तसेच प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी  20 झाडे निवडावीत,  निवडलेल्या झाडावरील मध्यम आकाराचे, मध्यम पक्व झालेले व बाहेरून किडके नसलेले एक बोंड अशी 20 बोंडे तोडून त्यामधील जीवंत अळयांची संख्या मोजून, त्यामध्ये जर दोन किडकी बोंडे किंवा दोन पांढरी/ गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे समजून झाडावर पुरेशी हिरवी बोंडे असल्यासच शेतकरी बंधूनी खालीलप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी व आवशकता भासल्यास परत 12 ते 15 दिवसाचे अतंराने (आर्थिक नुकसान संकेत पातळीवर आधारित) दुसरी फवारणी करावी. प्रत्येक फवारणीमधे वेगवेगळे रासायनिक किटकनाशके वापरावे.
सदयस्थितीत बागाईत कपाशीवर प्रादुर्भावास नुकतीच सुरूवात झालेल्या क्षेत्रावर ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 30 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्याच्या वर आहे अशा ठिकाणी मिश्र किटकनाशकांची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामधे ट्रायझाफॉस 35 टक्के + डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरेट्रेनिलीप्रोल 9.3 टक्के + लॅंब्डासायहॅलोथी्रन 4.6 टक्के 5 मिली किंवा इंडॉक्झीकार्ब 14.5 टक्के + अॅसीटामाप्रीड 7.7 टक्के 10 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के  20 मिली.
           कोरडवाहू पिकाची स्थिती, पाण्याचा ताण व पिकाचा उर्वरित कालावधी लक्षात घेवुनच फवारणीचा निर्णय घ्यावयाचा आहे. जेथे ओलीताची सोय आहे त्यांनी हलके पाणी देऊनच फवारणी करावी. फवारणी करणेपुर्वी उमललेल्या बोंडातील कापूस वेचूनच फवारणी करावी. शेतकरी बंधुनी कोणत्याही परिस्थितीत कपाशीची फरदड घेऊ नये. सर्वसाधारण तीन ते चार वेचण्या झाल्याबरोबर कपाशीचे पीक काढून टाकावे.
कापुस साठवणुक व संकलन केंद्रे, जिनींग मिल्स ई. ठिकाणी सुध्दा कापूस यावयास सुरूवात झाली आहे. तिथे आतापासुनच साफ सफाई मोहीम राबवुन परिसरामधील कापूस जिनींग नंतर चाळणीवरच्या अळया, कोश व खराब कापूस ई. ची वेळोवळी त्वरीत विल्हेवाट लावावी व  त्या परिसरात प्रत्येकी 15 ते 20 फेरोमोन सापळे लावावेत तसेच प्रकाश सापळेद्वारे अडकलेले पतंग वेळोवळी नष्ट करणे गरजेचे आहे.
00000


प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे राबवावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
क्षयरोग आजारावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने येत्या 12 ते 24 नोव्हेंबर 2018 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते जिल्हयात विविध भागात जाऊन प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेत सहभागी होऊन गृहभेटी देणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात समन्वय समितीच्या बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच.आर.गुंटूरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे छातीरोग विभाग प्रमुख डॉ. विजय कापसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. के. आर. शेळके, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार आदि उपस्थित राहुन चर्चेत सहभाग नोंदविला.
दर दोन मिनीटात तीन क्षयरुग्ण उपचारा अभावी मृत्यू पावतो.  ज्या रुग्णास दोन आठवडे व त्यापेक्षा जास्त दिवसांचा खोकला, रात्रीचा येणारा हलकासा ताप, वजन घटणे, भुक मंदावणे अशी लक्षणे असणाऱ्या संशयीत क्षयरुग्णांचे दोन बेडका नमुने तपासणार असुन याशिवाय यांचे एक्स-रे व गरज भासल्यास जीन एक्सपर्ट मशिनीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेस रुग्ण व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जुन 2018 मध्ये प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा पहिला टप्पा जिल्हयात यशस्वीपणे पार पडला होता. या दुसऱ्या टप्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हयात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्याचे नियोजन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे, अशी माहिती नांदेडचे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी दिली आहे.  
000000


कापूस, तूर पिकासाठी कृषि संदेश
            नांदेड, दि. 6 :- नांदेड जिल्हयात कापुस / तुर  पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतक-यांन पुढीलप्रमाणे  किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे .
कापूस- कामगंध सापळयातील लुर बदलावे आणि सायपरमेथ्रीन 3 टक्के + इंडोक्झाकार्ब 10 टक्के एस. सी 5 मिली प्रति 10 पाण्यात फवारावे.
तुर : - शेंगा पोखरणा-या अळीसाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. तसेच इमामेक्टीन बेंझोएट 5 एस. जी 5 ग्रॅम  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. गुंडाळलेली पाने अळीसहीत नष्ट़ करावीत. असे आवाहन  नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000


राष्ट्रीय शिक्षक दिवस
11 नोव्हेंबरला साजरा करावा
            नांदेड, दि. 6 :-  देशभरात 11 नोव्हेंबर हा मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिवस "राष्ट्रीय शिक्षक दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिवस साजरा करण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
00000


लोहा नगरपरिषद निवडणूक काळात
आयोगाच्या सूचनांचे पालन करावे
- जिल्हाधिकारी डोंगरे
            नांदेड, दि. 6 :- लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक काळात आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आयोगाने दिलेल्या सूचना व निर्देशाचे सर्वतोपरी पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
            लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2018 च्या संनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे दालनात काल (दि. 5) घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.  
            बैठकीस उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सरवदे, सा.बां. उपविभागीय अभियंता जी. व्ही. गुरले, अग्रणी बँक व्यवस्थापक अमोल चव्हाण, सहायक परिवहन अधिकारी रोहित काटकर, सहाय्यक राज्यकर आयुक्त प्रकाश गोपनर, नगरपरिषदेचे जिल्हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, लोहा नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. डोईफोडे, संनियंत्रण समिती सदस्य उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, ही निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्यावेळी जी दक्षता घेण्यात येते ती घेण्यात यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळण्यासाठी आचारसंहिता कालाधीत मतदारांना प्रभावित तसेच प्रलोभन देण्यासाठी उमेदवारांकडून तसेच राजकीय पक्षांकडून नवनवीन कल्पना वापरण्यात येतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जसे वस्तू, मद्य व पैसा इत्यादीच्या वाटपांवर अंकुश ठेवावा. उमेदवार व राजकीय पक्षांनी खर्चाबाबत व्यवस्थित माहिती वेळेवर सादर करावी. रोख रक्कमा मोठ्या व्यवहाराबाबत संबंधित विमानतळ, रेल्वे स्थानक, हॉटेल्स, फार्म हाऊस, तारण वित्तीय हवाला दलाल, बँकामार्फत मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवावे, असेही निर्देश समिती सदस्यांना देण्यात आले.
            आयोगाच्या आदेशाचे पालन व व्हिडीओ सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेकपोस्टसाठी पथक, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सुचना देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाकडील 1 नोव्हेंबरच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात लोहा नगरपरिषदेच्या थेट अध्यक्षपदाचा व सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर मतदानाची मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता 1 नोव्हेंबर पासून लागू झाली आहे. ही आचारसंहिता निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अंमलात राहणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...