Tuesday, November 6, 2018


प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे राबवावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
क्षयरोग आजारावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने येत्या 12 ते 24 नोव्हेंबर 2018 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते जिल्हयात विविध भागात जाऊन प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेत सहभागी होऊन गृहभेटी देणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात समन्वय समितीच्या बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच.आर.गुंटूरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे छातीरोग विभाग प्रमुख डॉ. विजय कापसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. के. आर. शेळके, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार आदि उपस्थित राहुन चर्चेत सहभाग नोंदविला.
दर दोन मिनीटात तीन क्षयरुग्ण उपचारा अभावी मृत्यू पावतो.  ज्या रुग्णास दोन आठवडे व त्यापेक्षा जास्त दिवसांचा खोकला, रात्रीचा येणारा हलकासा ताप, वजन घटणे, भुक मंदावणे अशी लक्षणे असणाऱ्या संशयीत क्षयरुग्णांचे दोन बेडका नमुने तपासणार असुन याशिवाय यांचे एक्स-रे व गरज भासल्यास जीन एक्सपर्ट मशिनीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेस रुग्ण व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जुन 2018 मध्ये प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा पहिला टप्पा जिल्हयात यशस्वीपणे पार पडला होता. या दुसऱ्या टप्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हयात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्याचे नियोजन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे, अशी माहिती नांदेडचे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी दिली आहे.  
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...