Wednesday, March 6, 2024

 वृत्त क्र. 210

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी

·         आदर्श आचारसंहिता,कायदा सुव्यवस्थासंदर्भात सक्त सूचना जारी

·         माध्यमातील पेड न्यूजअफवासमाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर करडी नजर


नांदेड दि. ६ : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आलेले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी गेल्या दोन दिवसात विविध बैठका घेऊन निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहिताकायदा सुव्यवस्था आणि माध्यमांचा गैरवापर याकडे विशेष लक्ष वेधले आहे. याबाबत कुठलीही हयगय सहन केली जाणार नाहीअसे सक्त आदेश त्यांनी जिल्ह्यातील यंत्रणेला दिले आहेत.



नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये या संदर्भात दोन दिवसात तीन बैठकी घेण्यात आल्यात. यामध्ये विभाग व विविध कक्ष प्रमुखांची प्रामुख्याने बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रशिक्षण व निर्धारित कर्तव्याची माहिती दिली गेली.

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशिक्षण व व्यवस्थापन कक्ष, आचारसंहिता कक्षकायदा व सुव्यवस्था निवडणूक विषयक वेबसाईट तयार करणेमाहिती व व्यवस्थापन कक्षनिवडणूक निर्णय अधिकारी कक्षमतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्षईव्हीएम कक्षनिवडणूक साहित्य स्वीकृती व वितरण कक्ष,टपाली मतपत्रिका कक्ष मतदार यादी कक्षसंगणकसायबर सुरक्षा व माहिती तंत्रज्ञान कक्षवाहतूक व संपर्क व्यवस्था कक्षमतपत्रिका छपाई व वाटप कक्षसीव्हीजील पब्लिक हेल्पलाइनउमेदवार राजकीय पक्ष निवडणूक खर्च विभागमीडिया कक्ष ( माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती ) निवडणूक निरीक्षक कक्षमतमोजणी कक्षमतदार जनजागृती अभियान कक्षनिवडणूक कायदेविषयक कक्षमतदान केंद्रावरील सुरक्षा व सुविधा कक्षअशा विविध समित्यांची स्थापना जिल्हास्तरावर करण्यात आली आहे.


या सर्व समित्यांचे कर्तव्यघ्यायची दक्षताकार्यपद्धतकाल मर्यादाअधिकार आणि व्याप्ती याबाबतचे प्रशिक्षण या काळामध्ये देण्यात आले. विशेषतः आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होता कामा नयेयाबाबत सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

निवडणूक काळामध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्याचे काम काही गुन्हेगारी तत्वांकडून केले जाते. अनेक ठिकाणी निवडणूक यंत्रणाईव्हीएम मशीन मतपत्रिका कायदा सुव्यवस्थायंत्रणाबद्दलची सुविधा या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरविल्या जातात. समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो मात्रअसा चुकीचा प्रसार मोडून काढण्याचे सूचना व असे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशत्या संदर्भातील तरतुदी याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यातील सायबर सेल या संदर्भात अधिक दक्ष असून याबाबतीत तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता प्रत्येक यंत्रणेने तयार करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. माध्यमातील वृत्तपत्रइलेक्ट्रॉनिक्स मीडियासोशल मीडिया या संदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. आचार संहिता जारी झाल्यानंतर या संदर्भातील काटेकोर पालन करण्याबाबत सूचना प्रामुख्याने यावेळी देण्यात आल्या.

संविधानाच्या कलम 324 अनुसार भारत निवडणूक आयोगाकडे कोणत्याही कर्मचाऱ्यांची कुठेही सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे. यंत्रणेतील अधिकारी हे निवडणूक आयोगाच्या वतीने काम करत असतात. त्यामुळे अतिशय गांभीर्याने निवडणूक कार्याला घेण्याचे त्यांनी सूचित केले .त्यामुळे एकदा नियुक्त करण्यात आल्यानंतर निवडणूक कर्तव्यात बदल करण्यासाठी कोणी प्रयत्न करू नयेड्युटी चार्ज बदलून मागू नये,अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी या काळात आपले सर्वोत्तम प्रयत्न प्रक्रियेत देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

0000

विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

 वृत्त क्र. 209

विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

नांदेडदि. 6 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना राबवितांना येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व सहकार्य करण्यात येइल. जास्तीत जास्त विद्यार्थी/विद्यार्थीनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेवून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची प्रसिध्दी व प्रचार करण्यासाठी नुकतेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

यावेळी मनपाचे उपायुक्त दिवेकर, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवारपोलीस निरीक्षक उदय खंडेराये, पोलीस निरीक्षक विजय पुरीमाणिकराव लोहगावे जिल्हा परिषद सदस्य, प्राचार्य बालाजीराव पांडागळे, शंकरराव राठोडसचिन पवाररवी जाधवस्वरुप राठोड व नागरीकविद्यार्थीमुख्याध्यापकशिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.




कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुलेछत्रपती राजर्षी छत्रपती शाहु महाराजभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी केले. विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यासाठी इतर मागास प्रवर्गातील गरजु लाभार्थ्यासाठी मोदी आवास घरकुल योजनेचे 23 हजार 598 उदिष्ट ठेवण्यात आले होते. 100 टक्के उदिष्ट पुर्ण केल्याचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी सांगितले. तसेच नांदेड जिल्हयामध्ये 100 मुलांसाठी विष्णुपुरी याठिकाणी तर मुलींसाठी 100 क्षमतेचे शेतकरी चौकच्या पुढे दिपनगर याठिकाणी नवीन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त गरजु विद्यार्थी/विद्यार्थीनिनी प्रवेश घ्यावा असेही आवाहन केले.

मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा या उपक्रमातंर्गत सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याण विभाग नांदेडच्या अधिनस्त असलेल्या देगलूर तालुक्यातून विमुक्त जाती भटक्या जमातीच्या प्राथमिक आश्रमशाळाशिळवणी बॉर्डर तांडा देगलूर, हदगांव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळापळसा व हिमायतनगर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळापोटा बु. हिमायतनगर तालुक्यातून प्रत्येकी शाळेस दित्तीय क्रमाक प्राप्त झाला आहे. यावेळी आश्रशाळेचे मुख्याध्यापक यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे,  यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्राध्यापक धारशिव शिराळ यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचे सादरीकरण केले.

0000


 वृत्त क्र. 208

छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे

'शिवगर्जना’ महानाट्य कुटुंबासोबत बघा : जिल्हाधिकारी

·         9,10,11 मार्चला गुरुद्वारा मैदानहिंगोली गेटवर दररोज सायंकाळी ६.३० वाजता सादरीकरण

नांदेडदि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्भुत जीवन चरित्राला प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी 9 10 व 11 मार्च रोजी नांदेडकरांना आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासह या महा नाटकाला उपस्थित राहून नव्या पिढीला शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राला अनुभवण्याची संधी द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.

राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे.   दि. 9,10,11 मार्च  2024 रोजी गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट (सर्कस ग्राउंडरेल्वे स्टेशन शेजारी )नांदेड  येथे आबालवृद्धाना विनामूल्य महानाट्य पाहता येणार आहे, अशी  माहितीही त्यांनी दिली.





या संदर्भात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असून दररोज दहा हजार नागरिकांना बसण्याची सुसज्ज व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी आज दिले. शनिवार रविवार व सोमवार असे तीन दिवस हे प्रयोग होणार आहेत या प्रयोगाच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः अंगणवाडी सेविकाजिल्ह्यातील सर्व बचत गट सदस्य, आशा वर्कर व जिल्हा प्रशासनाच्या सेवेत असणाऱ्या आरोग्य यंत्रणाविविध सामाजिक संघटनाव्यापारी संघटनाउद्योजक तसेच समाजातील सर्व घटकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या आयोजन समितीला दिले आहेत. जिल्हाभरातील शाळांनी या संदर्भातील आपापले नियोजन करावे पाचवी इयत्ता वरील मुलांनी शाळेच्या शिक्षकांसोबत तर त्यापेक्षा लहान मुलांनी आपल्या कुटुंबासोबत शिवछत्रपतींचा इतिहास याची डोळा बघावा प्रत्येकाने आपल्या घरातील मुलाला या इतिहासाचे साक्षीदार व्हायची संधी द्यावी, असे आवाहन केले आहे.

शेकडो कलाकारांचा सहभाग आणि शिवचरित्रातील लक्षवेधी प्रसंगांची शृंखलाघोडेउंट यांचा कल्पक वापरतत्कालीन लोक कलेचे चित्तथरारक सादरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे हे महानाट्य प्रत्येक कुटुंबाने बघावे असेआवाहनही करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित हे महानाट्य नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत राज्याचे ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सूचना केली आहे.  यासाठी वाहनतळरस्ते मार्गआपत्ती व्यवस्थापनबैठक सुविधाजनजागृती आदि विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले.  

आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेतभारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही  हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्तीघोडेउंटबैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहेतसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे.

12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत  आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रयोगाला सुरुवात होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या अविस्मरणीय क्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना छत्रपती शिवरायांवरील हे महानाट्य पहाता यावे यासाठी हदगावनरसी-नायगावमुदखेडअर्धापूरलोहाकंधारउमरीभोकर या ठिकाणावरुन प्रेक्षकांना नांदेडला येण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी नांदेड बसस्थानकावरुनही जादा बसेसची सोय करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे असे एसटी महामंडळाच्या वतीने सांगितले आहे.

00000

जागतिक महिला दिन साजरा करण्याबाबत सूचना

 वृत्त क्र. 207

जागतिक महिला दिन  साजरा करण्याबाबत सूचना

नांदेडदि. 6 :- दरवर्षी मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभागानी आपापल्या स्तरावर या संदर्भातील नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारीतहसिलदारजिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधकस्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिवनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्तजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपोलीस अधीक्षकडॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाताजिल्हा शल्यचिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीनांदेडबालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पशिक्षणाधिकारी प्राथमिकमाध्यमिक जि. प.उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड आणि जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांना पत्राद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांनी सूचना निर्गमित केली आहे. शासन परिपत्रकात दिलेल्या सुचनेप्रमाणे शुक्रवार मार्च 2024 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्याचाकेलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावाअसेही पत्रात नमूद केले आहे.

0000

वृद्ध साहित्यिक व कलावंतानी बँक खाते आधार व मोबाईल क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतची माहिती 15 मार्चपर्यंत कळवावी

 वृत्त क्र. 206

वृद्ध साहित्यिक व कलावंतानी बँक खाते आधार व मोबाईल क्रमांकाशी

संलग्न केल्याबाबतची माहिती 15 मार्चपर्यंत कळवावी

नांदेड दि. 5 :-  राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून राज्यात सांस्कृतिक संचालनालयामार्फत राबविली जाते. शासनाने आता ही योजना डीबीटी मार्फत राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. डीबीटीमार्फत ही योजना राबविण्यासाठी सर्व वृद्ध कलावंताचे बँक खात्याशी मोबाईल व आधार क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वृध्द कलावंतानी आपल्या आपले बँक खाते मोबाईल व आधार क्रमांकाशी संलग्न करुन त्याबाबतची माहिती 15 मार्च 2024 पर्यत तालुक्याच्या पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करावीअसे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.  

सांस्कृतिक विभागाने जिल्ह्यातील तालुकानिहाय वृध्द कलावंताची गुगल शिट तयार केली आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील वृध्द कलावंत एकूण संख्या 1 हजार 251 असून तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड-24अर्धापूर-52भोकर 79हदगाव-96हिमायतनगर -71किनवट-36माहूर -23मुदखेड-56 उमरी 33नायगाव-187मुखेड-93बिलोली-89कंधार-151लोहा-77धर्माबाद-177देगलूर-65 आहे. कलावंताचे बँक खात्याशी आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक संलग्न केलेली माहिती संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीने प्राप्त करुन घ्यावी अशा सूचना सांस्कृतिक संचालनालयाने दिल्या आहेतसंबंधितानी यांची नोंद घ्यावी.

जे वृध्द साहित्यिक व कलावंत त्यांचे बँक खाते आधार कार्ड व मोबाईल क्रमांक संलग्न करुन त्याबाबतची माहिती दिलेल्या मुदतीत सादर करणार नाहीतत्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार नाहीअसे समाज कल्याण कार्यालयाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...