वृत्त क्र. 207
जागतिक महिला दिन साजरा करण्याबाबत सूचना
नांदेड, दि. 6 :- दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभागानी आपापल्या स्तरावर या संदर्भातील नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नांदेड, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक जि. प., उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड आणि जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांना पत्राद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांनी सूचना निर्गमित केली आहे. शासन परिपत्रकात दिलेल्या सुचनेप्रमाणे शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्याचा, केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद केले आहे.
0000
No comments:
Post a Comment