Sunday, January 5, 2020



सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी
स्व. शंकरराव चव्हाण, स्व. कुसुमताई चव्हाण
यांच्या समाधीस्थळास भेट देऊन अभिवादन केले  
नांदेड दि. 5 :-  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी  माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण व मातोश्री स्व. कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या समाधी स्थळास भेट देऊन पुष्प अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह पदाधिकारी,नागरीक उपस्थित होते.
00000


बाभळी बंधारा पाणी प्रश्न
मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार
- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 5:-   बाभळी बंधारा पाणी प्रश्नी तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी स्वत: राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना सोबत घेऊन चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. धर्माबाद येथील सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार अमर राजूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, दत्ताहरी पाटील -चोळाखा, ताहेर पठाण, गोविंद पाटील रोषणगावकर, निलेश पाटील, राजू सुरकूटवार, नरेंद्र रेड्डी, श्रीराम जगदंबे, आकाश रेड्डी, राजू शिरामणे, भोजीराम गुणारकर, अभेदअली, सुधाकर जाधव, नागोराव पाटील रोषणगावकर, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक आदिंची यावेळी उपस्थिती होती.
जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरुन प्रेम दिले असून जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. बाभळीचा प्रश्न मिटल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जिल्ह्यासह उमरी, धर्माबाद तालुक्याच्यादृष्टीने महत्वाच्या विकासात्मक कामांना चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वांच्या सहकाऱ्याचीही अपेक्षा मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त करुन त्यांनी धर्माबाद येथील शंकरगंज येथील साईबाबा दर्शन मंदिरात दर्शन घेतले.
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट दिली. यावेळी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या कार्यकारी मंडळांनी शालेय साहित्य भेट देवून मंत्री श्री. चव्हाण यांचा सत्कार केला.  
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर गुजराथी, सचिव डॉ. कमलकिशोर काकाणी, कोषाध्यक्ष महेंद्रकुमार पांडे, संचालक उमेशकुमार झंवर तसेच विश्वनाथ बन्नाळीकर,वर्णी गंगन्ना, प्राचार्य डॉ. दिगंबर मोरे ,शिक्षकवृंद, शिक्षिका आदिंची उपस्थिती होती.
भगवानराव पाटील भिलवंडे यांची भेट
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नरसी येथील भगवानराव पाटील भिलवंडे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण, संभाजी भिलवंडे, रविंद्र भिलवंडे, राजू पाटील भिलवंडे आदि सदस्यांनी त्यांची भेट घेतली. 
विविध ठिकाणी मंत्री अशोक चव्हाण
यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बरबडा, कहाळा (बु), कहाळा (खु). नायगाव तालुक्यातील कृष्णूर, पळसगाव, देगाव, नायगाव (बा), पिंपळगाव, नरसी. बिलोली तालुक्यातील लोहगाव, तळणी, पांचपीपळी, बिलोली धर्माबाद तालुक्यातील कुंडलवाडी या सर्वांचे ठिकाणी प्रत्येक गावातील ग्रामस्थ, नागरिक, पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
0000


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
पदवी वितरण समारंभ संपन्न
नांदेड दि. 5 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नीत येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात बी. एड. व एम.एड. पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आला.
या समारंभाचे अध्यक्षस्थानावरुन प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मसन्माने जगावे. सुत्रसंचलन सौ. रेखा पवार यांनी तर प्रास्ताविक प्रफुल्ल माटाळकर यांनी केले. आभार सतीश गोपतवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. डॉ. उमेश मुरुमकर व त्यांच्या सहकार्याने नियोजन केले.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. शाकेर, प्रा. डॉ. हारुन शेख, प्रा. डॉ. घोणशेटवाड तसेच कार्यालयीन कर्मचारी, पदवी प्रदान स्नातक, प्रथम, द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी, एम. एड, पदवी स्नातक बहुसंख्येने उपस्थित होते. 
00000



मोटार वाहन निरीक्षक यांचा
तालुका शिबीर कार्यालयाचा दौरा  
नांदेड दि. 5 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 9 तालुक्याच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक यांचा जानेवारी ते जून 2020 या कालावधीतील तालुका शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
तालुका शिबिर कार्यालयाचा दौरा पुढील प्रमाणे राहील. कंधार- 4  व 22 जानेवारी,  5 व 25 फेब्रुवारी, 7 व 23 मार्च, 7 व 23 एप्रिल, 8 व 22 मे, 6 व 24 जून. मुखेड- 7 व 18 जानेवारी, 7 व 24 फेब्रुवारी, 9 व 19 मार्च, 8 व 20 एप्रिल, 11 व 21 मे, 8 व 20 जून. देगलूर- 8 व 21 जानेवारी, 10 व 20 फेब्रुवारी, 11 व 20 मार्च, 9 व 22 एप्रिल, 12 व 20 मे, 10 व 22 जून. हिमायतनगर- 10 जानेवारी, 11 फेब्रुवारी 12 मार्च, 13 एप्रिल, 14 मे, 11 जून. मुदखेड- 14 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 16 मार्च, 15 एप्रिल, 15 मे, 12 जून. हदगाव- 15 व 31 जानेवारी, 15 फेब्रुवारी, 17 मार्च, 16 एप्रिल, 16 व 28 मे, 15 जून. धर्माबाद- 16 व 24 जानेवारी, 17 व 26 फेब्रुवारी, 18 व 26 मार्च, 17 व 27 एप्रिल, 18 व 27 मे, 18 व 26 जून. किनवट- 29 जानेवारी, 28 फेब्रुवारी, 30 मार्च, 29 एप्रिल, 29 मे, 29 जून. माहूर- 30 जानेवारी, 29 फेब्रुवारी, 31 मार्च, 30 एप्रिल, 30 मे, 30 जून 2020 या प्रमाणे मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक हे शिबिर कार्यालयाचे आयोजन करुन जनतेची कामे पार पाडणार आहेत.
00000


महारेशीम अभियानाचा
मंगळवारी शुभारंभ
नांदेड दि. 5 :- "महा-रेशीम अभियान 2020" अभियाचा शुभारंभ व रेशीम रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे हस्ते मंगळवार 7 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 10 वा. करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शेतकरी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा रेशीम कार्यालय नांदेड  यांनी केले आहे.    
या अभियानांतर्गत नवीन तुती लागवड करण्‍यासाठी उत्‍सुक शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी जिल्‍हा रेशीम कार्यालय कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती जवळ नवा मोंढा नांदेड येथे (दुरध्‍वनी 02462-284291) संपर्क करावा. सन 2020-21 मध्ये समुहाने मनरेगा योजनेंतर्गत तसेच वैयक्तिक नवीन तुती लागवड करण्‍यासाठी उत्‍सुक असलेल्‍या शेतकऱ्यांची नोंदणी करण्‍यासाठी "महा-रेशीम अभियान 2020" चे आयोजन 7 ते 21 जानेवारी 2020 या कालावधीत करण्यात येणार आहे, अशी माहिती रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी दिली. 
00000



नारी शक्ती पुरस्कारासाठी
अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 5 :- नारी शक्ती पुरस्कारासाठी केंद्र शासनाने निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार महिला सक्षमीकरण, महिला कौशल्य विकास, पारंपारिक व अपारंपारिक क्षेत्रात महिलांसाठी कार्य तसेच ग्रामीण  भागातील महिला कल्याणासाठी केलेले कार्य, विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, कला, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कामकाज केलेल्या पात्र व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून ऑनलाईन अर्ज, नामनिर्देशन मंगळवार 7 जानेवारी 2020 पर्यंत मागविण्यात आली आहेत.
नारी शक्ती वैयक्तिक पुरस्काराच्या बाबतीत वय 25 पेक्षा कमी नसलेल्या तसेच संस्थांच्याबाबतीत किमान 5 वर्षाचा अनुभव असलेल्या पात्र संस्थांना देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्काराचे नामांकने सादर करण्यासाठी पात्र संस्था, व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, अर्जदारांनी अर्ज/नामनिर्देशन वेबसाईटवरील सुचनेनुसार योग्य त्या कागदपत्रांसह ऑनलाईन केंद्रशासनाचे www.narishaktipurarskar.wcd.gov.in www.wcd.nic.in या वेबसाईटवर भरावयाचे आहे. केवळ ऑनलाईन अर्ज स्विकारले जातील तसेच अर्ज / नामनिर्देशन भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 7 जानेवारी 2020 आहे याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा 
विकास कामे वेळेत, दर्जेदार पूर्ण करावीत  
                  --- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 5:- जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत, दर्जेदार पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
विविध विषयांची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री येथे आज संपन्न झाली. यावेळी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बोलत होते.  
या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हबंर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर दिक्षा धबाले, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक श्री. कोहिरकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत मंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील किनवट,माहूर,देगलूर,भोकर,मुखेड तालुक्यात हेलीपॅड बांधण्याकरिता भूसंपादन करुन शासकीय अथवा खाजगी जमिनीवर पायलेट प्रोजेक्ट म्हणून करण्याकरिता कार्यवाही करण्यात यावी. यासोबतच हेलिपोर्टसाठीही प्रयत्न करण्यात यावेत. तसेच आसना जूना पूल / ब्रीज बांधण्याकरिता प्रस्ताव सादर करावेत. ट्रामा केअरबाबत पाठपुरावा करण्यात यावा. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाच्या कामे पूर्ण करावीत. अर्धापूर तालुक्यातील मालेगाव हनुमानमंदिराजवळील सभागृहाच्या अर्धवट राहिलेल्या कामांची माहिती, नांदेड-भोकर-रहाटी महामार्गाचे काम दर्जेदार पूर्ण करावीत व अहवाल सादर करावा. तसेच उर्वरित कामांचे प्रस्तावही सादर करण्यात यावेत. मातूळ ता. भोकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रिक्त पदे भरणे, नगर परिषद, भोकरच्या कार्यालयाच्या अर्धवट असलेल्या कामाबाबतची सविस्तर माहिती घेतली. भोकर व अन्य तालुक्याच्या पाणी पुरवठा योजनेचा राष्ट्रीय पेयजल आणि इतर पाणी पुरवठ्याबाबतचा आढावा घेतला. देगलूर नाका येथील ओव्हर ब्रीजच्या कामाबाबतचे जिल्हाधिकारी, मनपा व अधिक्षक अभियंता यांनी नियोजन करावं. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील विविध समस्या, भोकर येथे पोलीस ट्रेनिंग स्कूल सुरु करण्याबाबतही कार्यवाही करण्यात यावी. नांदेड सामान्य रुग्णालयाच्या सद्यस्थिती, कौठा ले-आऊट सद्यस्थिती, विकास कामे, भूसंपादन आदि विविध विकास कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेतला.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी
6 जानेवारी दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  6 जानेवारी दर्पण दिनानिमित्त यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री श्री. चव्हाण हे शुभेच्छा संदेशात म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून व लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी वृत्तपत्रे ही आपले कार्य करीत असतात. त्यामुळे विकासासाठी चालना मिळाली आहे. तसेच मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, पत्रकार भवनाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन असेही यावेळी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील संपादक, प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीची उपस्थिती होती.
0000  





राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत
जलसंपदा विषयक कामासंदर्भात आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 5:- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री, नांदेड जलसंपदा विषयक कामासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक श्री. कोहिरकर, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री. गिरवलसींग, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदि विविध विभागाच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीस उपस्थिती होती.
यावेळी एकात्मिक राज्य जल आराखडा - मध्य गोदावरी खोऱ्यातील अस्तित्वातील प्रकल्पाचे पुर्ननियोजनाचे प्रस्ताव, उर्ध्वपैनगंगा प्रकल्पामध्ये होणारी पाण्याची तुट, त्यामुळे करावे लागणाऱ्या पुर्ननियोजनाचा प्रस्ताव (सापळी धरण) व इतर उपाययोजना, लेंडी प्रधान प्रकल्पाची सद्यस्थिती, शंकरराव चव्हाण विष्णुपरी प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प,सहस्त्रकुंड जलविद्युत (बहुउद्देशिय) प्रकल्प हिमायतनगर, भुसंपादन, उर्ध्वपैनगंगा प्रकल्प उजव्या कालव्यावरील शाखा,वितरीका,लघु कालव्याची दुरुस्ती व शिल्लक कामे पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही, गरज पाहता नांदेड शहरासाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था आदी विषयांचा आढावा घेतला.
 0000

निमंत्रण दि. 5 जानेवारी 2020
 
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी दैनिक, साप्ताहिक वृत्त्पत्र / दूरचित्रवाणी / केबल टि.व्ही .
नांदेड जिल्हा 

महोदय , 
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “दर्पण दिन” कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. 6 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वा. नांदेड येथील एमजीएम महाविद्यालयात करण्यात आले आहे.
तरी कृपया या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे, ही विनंती.
         आपली विश्वासू
                                                                              (मीरा ढास)
       प्र.जिल्हाा माहिती अधिकारी,
                                                                                      नांदेड

सुधारीत वृत्त


दर्पणदिनानिमित्त पत्रकारांसाठी
कार्यक्रमाचे आज आयोजन
नांदेड दि. 5 :- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त नांदेड जिल्हा माहिती कार्यालय व एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 6 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वा. एमजीएम महाविद्यालय नांदेड येथे दर्पणदिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पत्रकारितेसमोरील आव्हाने व पत्रकारांची जीवनशैली आणि आरोग्याची काळजी या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत.   
या कार्यक्रमास मुद्रीत, ईलेक्ट्रॉनिक, छायाचित्रकार माध्यम प्रतिनिधी व पत्रकारिता विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी, नांदेडचे प्र. जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...