Sunday, January 5, 2020


राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत
जलसंपदा विषयक कामासंदर्भात आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 5:- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री, नांदेड जलसंपदा विषयक कामासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक श्री. कोहिरकर, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री. गिरवलसींग, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदि विविध विभागाच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीस उपस्थिती होती.
यावेळी एकात्मिक राज्य जल आराखडा - मध्य गोदावरी खोऱ्यातील अस्तित्वातील प्रकल्पाचे पुर्ननियोजनाचे प्रस्ताव, उर्ध्वपैनगंगा प्रकल्पामध्ये होणारी पाण्याची तुट, त्यामुळे करावे लागणाऱ्या पुर्ननियोजनाचा प्रस्ताव (सापळी धरण) व इतर उपाययोजना, लेंडी प्रधान प्रकल्पाची सद्यस्थिती, शंकरराव चव्हाण विष्णुपरी प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प,सहस्त्रकुंड जलविद्युत (बहुउद्देशिय) प्रकल्प हिमायतनगर, भुसंपादन, उर्ध्वपैनगंगा प्रकल्प उजव्या कालव्यावरील शाखा,वितरीका,लघु कालव्याची दुरुस्ती व शिल्लक कामे पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही, गरज पाहता नांदेड शहरासाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था आदी विषयांचा आढावा घेतला.
 0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...