Tuesday, September 26, 2017

शासकिय तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय
टेक्नीकल पेपर प्रेंझेटेशन स्पर्धा संपन्न
नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई पुरस्कृत राज्यस्तरीय टेक्नीकल पेपर प्रेंझेटेशन स्पर्धा इंजिनिअर्स डे चे औचीत्य साधुन शासकिय तंत्रनिकेतन नांदेड येथे नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य पी. डी. पोपळे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणुन उपप्राचार्य डॉ. एस. ए. एच. कादरी, एम.जी.एम अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्रा. डॉ. एम. जी. हरकरे,  ग्रामिण तंत्रनिकेतनचे प्राचार्य संजय देउळगांवकर, विश्व भारती तंत्रनिकेतन प्राचार्य शहाजी देशमुख यांनी काम पाहीले.
कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विभाग प्रमुख यंत्रविभाग प्रा. आर. एम. सकळकळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व या स्पर्धेसाठी यंत्र अभियांत्रिकी गटातुन एकुण 81 स्पर्धकांनी मिळुन 41 टेक्नीकल पेपर सादर केले अशी माहीती दिली.
इंजीनिअर्स डे निमित्त भारतरत्न सर मोक्ष गुंडम विश्वेश्वरया यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली त्यांच्या कार्याची आठवण प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सह समन्वयक प्रा. डॉ. संतोष चौधरी यांनी आभार मानले. प्रा. विजय उश्केवार यांनी सुत्रसंचालन केले व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाची विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाशी सांगड घातली.
प्राचार्य श्री पोपळे यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थांनी या स्पर्धेमधुन स्व विकासाबरोबरच अभ्यासु वृत्ती जोपासावी असे आवाहन केले. डॉ. कादरी यांनी तांत्रिक विद्यार्थांना उपलब्ध असलेल्या संधीबाबत मार्गदर्शन केले. संदीप पॉलीटेक्नीक, नाशिकच्या संकेत कोठावदे हयाला 7 हजार 500 रुपयाचे प्रथम पारितोषीक, शासकिय तंत्रनिकेतन नांदेड येथील कु. श्वेता गबाळे व कु. शरयु वेसनेकर यांना 5 हजार रुपयाचे द्वितीय पारितोषीक, तसेच 2 हजार 500 रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषीक औरंगाबदच्या कु. आकांक्षा पुरकर हयांनी पटकावीले. संस्थेतील विविध विभाग प्रमुख व अधिव्याख्याता याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी प्रा. व्ही. यु. दातीर प्रा. एस. एम. कंधारे प्रा. एस.जी. बडेकर प्रा. डॉ. डक, प्रा. ए. एच. कदम, प्रा. के. एस. कळसकर, आर. एम. दुलेवाड, एम. एस. भोजने, मो. शकील, के. डी. लोकरे, जे.एच. ठोके, श्री गांधारे यांनी संयोजन केले. संस्थेच्या यंत्र अभियांत्रिकी व उत्पादन अभियांत्रिकीच्या विद्यार्थांनी कार्यक्रमाच्या आयोजनात उस्फुर्त योगदान दिले. डॉ. महेश शिवणकर, सहसंचालक तंत्र शिक्षण औरंगाबाद विभाग व डॉ. आनंद पवार, उपसचिव एम.एस.बी.टी.ई. औरंगाबाद विभाग यांचे संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.
000000


तात्पुरते फटका परवाना अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 26 :-तात्पुरते फटका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्याच्या कालावधीची मुदतवाढ शुक्रवार 29 सप्टेंबर 2017 पर्यंत देण्यात आली आहे. या व्यतीरिक्त 6 सप्टेंबर 2017 नुसार केलेल्या जाहीर प्रगटनामध्ये दिलेल्या अटी व शर्ती कायम राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
यावर्षी दिपाली उत्सव 18 ते 21 ऑक्टोंबर या कालावधीत साजरी होत आहे. त्याअनुषंगाने नांदेड मनपा हद्दीतील तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परावाना अर्ज विस्फोटक अधिनियम 2008 नुसार 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2017 या कालावधीत विक्री व स्विकारले जाणार होती. या कालावधीस 29 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

000000
सोयाबीन, कपाशीवरील
बोंडअळीच्या नियंत्रणासाठी संदेश  
नांदेड दि. 26 :-  सोयाबीनच्या पानावरील ठिपक्यांच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. लाल्या नियंत्रणासाठी मॅग्नेशियम सल्फेट 1 टक्के किंवा युरिया 2 टक्के फवारणी करावी. चक्रीभुंगा व्यवस्थापनासाठी ट्रायझोफॉस 40 इसी 16 मिली किंवा थायक्लोप्रीड 21.7 एस.सी. 15 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
कपाशीवरील गुलाबी, शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भाव जास्त झाल्यास नियंत्रणासाठी फेव्होलरेट 20 इसी 8 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी डायफेर्थिरॉन 50 डब्ल्यु पी 12 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 26 :- उच्च शिक्षण संचालनालयाच्या शिष्यवृत्ती योजनेची नवीन मंजुरी व नुतनीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांनी www.mahadbt.gov.in  या संकेतस्थळावरुन ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर अर्जाची छाननी करुन ऑनलाईन अर्ज पुढील मंजुरीसाठी MahaDBT Portal च्या माध्यमाचा वापर करण्यात यावा. महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन उच्च शिक्षण नांदेड विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी केले आहे.
लातूर, हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ / वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयातील सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात राज्य शासनाकडून MahaDBT Portal वर राज्य शासनाची शिष्यवृत्ती योजना, आर्थिक सहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000
परिवहन महामंडळात शिकाऊ उमेदवार
पदांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड मध्ये सन 2017-18 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 55 पदे ( यांत्रिक-40, विजतंत्री- 6, शिट मेटल वर्क्स-5,पेंटर-1, अभियांत्रिक पदवीधर / पदवीका-2,अकाउंन्टसी न्ड ऑडीटींग-1 ) ऑनलाईन पध्दतीने  भरण्यात येत आहेत. त्यासाठी छापील नमुन्यातील अर्ज भरती प्रक्रीया शुल्कासह भरुन जमा करण्यासाठी शुक्रवार 29 सप्टेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
इच्छुक आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम MIS वेब पोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करुन MSRTC Division Nanded या आस्थापने (Establishment) साठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे. तसेच अभियांत्रिकी पदवीधर / पदवीकाधारक उत्तीर्ण असणा-या उमदवारांनी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या राष्ट्रीय वेबसाईटवर दिलेल्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
जे उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवार म्हणुन भरती करण्यात येईल. उमेदवारांचे कॉन्ट्रक्ट फॉर्म नोंदणी होतील. ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीसाठी  इच्छुक असणा-या उमेदवारांना छापील नमुन्यातील अर्ज विभागीय कार्यालय, कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे 29 सप्टेंबर पर्यंत शनिवार सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मिळतीलस्विकारले जातील. अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गाकरीता 500 रुपये मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आहे. त्यावर जीएसटी 18 टक्के वेगळे आहे. शुक्रवार 29 सप्टेंबर नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही ते रद्द समजले जातील, असे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी केले आहे.

000000
आयटीआय येथे भरती मेळावा
नांदेड दि. 26 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे ऑगस्ट 2017 साठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. आयोजन केले आहे. सन 2017 मध्ये आयटीआय पास होणाऱ्या उमेदवारांनी उपस्थित रहावे. दहावी,आयटीआय प्रमाणपत्र सोबत आणावे. या भरती मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातील कंपनीचे प्रतिनिधींना बोलविण्यात आले आहे. या संधीचा लाभ उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.

00000
उमरी आयटीआयमध्ये
शिल्पनिदेशक पदासाठी भरती
नांदेड दि. 26 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरी येथे कोपा व हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर या व्यवसायासाठी तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्पनिदेशक पदासाठी पात्र उमेदवारांनी गुरुवार 5 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 11.30 वा. शैक्षणीक, वय, अनुभवाचा मुळ प्रमाणपत्रांसह मुलखतीस उपस्थित रहावे. निवड झालेल्या उमेदवारास शासकीय नियमाप्रमाणे मानधन देय राहील, असे उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.  

00000
किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत
मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड दि. 26 :-  किनवट तालुक्यातील जरुरी, भिमपूरी / सिरमेटी, मारेगाव वरचे, पिंपरफोडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने मतमोजणीच्या दिवशी बुधवार 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.   
 तहसिलदार यांनी निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेशास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत बुधवार 27 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत आदेश अंमलात राहील, असेही म्हटले आहे.

00000
  जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतदान ,
मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम 
नांदेड दि. 26 :- जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने मतदानाच्या दिवशी शनिवार 7 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्र परिसरात व मतमोजणीच्या दिवशी सोमवार 9 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.  
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान केंद्राच्या हद्दीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी संबंधीत तहसिलदार यांनी निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. 

हा आदेश मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत 7 ऑक्टोंबर रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.                                        00000
पंडीत दिनदयाल यांच्या गुणांचा अंगीकार करा
                              - डॉ. सुनंदा रोडगे
नांदेड दि. 26 :- पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या अंगी असलेल्या शिस्त, बुद्धीमत्ता व वेळेचे व्यवस्थापन या गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांनी केले. येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी कु. मालाश्री कोठारे, अविनाश टारपे यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर माहिती दिली. प्रास्ताविक रामेश्वर जाधव यांनी तर आभार विशाखा माळगे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

0000
मानव अधिकार आयोगाचे सदस्य
एम. ए. सय्यद यांचा दौरा
नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाचे सदस्य एम. ए. सय्यद हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 28 सप्टेंबर रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. शिवाजी लॉ कॉलेज कंधारकडे प्रयाण. सकाळी 11 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत शिवाजी लॉ कॉलेज येथील व्याख्यान कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.15 वा. नांदेड शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, राखीव व मुक्काम. शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी सायं. 6 वा. देवगिरी एक्सप्रेसने नांदेड येथुन मुंबईकडे प्रयाण करतील.
00000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...