Tuesday, May 31, 2022

 खऱ्या गरजू लाभार्थ्यांना उच्च तंत्रज्ञानाने

योजनांचा लाभ तात्काळ देणे झाले सुलभ

-        पंतप्रधान नरेंद्र मोदी  

 

राज्यातील लोककल्याणासाठी केंद्र-राज्य शासनाच्या

योजना प्रभावीपणे राबविल्याचे हे द्योतक

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवाद कार्यक्रमात

लाभार्थ्यांनी जाणून घेतली योजनेमागील तळमळ

 

नांदेड, दि. 31  (जिमाका) :- विकासापासून वंचित असलेल्या समाजातील सर्व घटकांपर्यंत सरकारच्या विविध योजना उच्च तंत्रज्ञानामुळे पोहचविणे आता सुलभ झाले आहे. याचबरोबर ज्यांच्या कल्याणासाठी योजना आखल्या गेल्या आहेत त्या वर्गाला त्याचा लाभ मिळणे शक्य झाले असून यातूनच नवीन भारत घडेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  आज देशभरातील विविध लाभार्थ्यांशी त्यांनी ऑनलाईन संवाद साधला.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे नांदेड जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांना या संवादात भाग घेता यावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व सुविधा उपलब्ध केल्या होत्या. जिल्ह्यातील तीनशे पेक्षा अधिक लाभधारक या संवादात सहभागी झाले. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम व मान्यवर उपस्थित होते.

 

महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य आहे. तळागाळातील लोकांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्राने केलेली आहे. कोणत्याही विकास योजनेमध्ये सर्वसामान्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून त्यांना अधिका अधिक न्याय कसा देता येईल ही भूमिका महाराष्ट्राने जपली असल्याच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लाभधारकांशी संवाद साधला. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याप परतावाबाबत अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या निदर्शनास आणून दिले.

 

उपस्थित लाभार्थ्यांमध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा योजनांचा समावेश होता.

0000









 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त रॅली संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-   संपूर्ण जगात जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून 31 मे रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रॅली आयोजित करण्यात आले होते. सर्व शासकीय रुग्णालयात तंबाखू व्यसन मुक्ती केंद्र असून तेथे तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. व्यसन करणाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त होण्यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.

 

या रॅलीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनमंत पाटील, डॉ. एच. टी. साखरे, प्राचार्य रेणुकादास मैड, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक गजानन गोरे, नागेश अटकोरे तसेच शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक श्रीमती अपर्णा जाधव, श्रीमती राजेश्वरी देशमुख, विद्यार्थिनी आणि इंडियन डेंटल असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

तंबाखू व्यसन हे मृत्युच्या प्रमुख कारणांपैकी एक असून त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यापैकी तोंडात सर्वप्रथम लक्षणे दिसून येतात. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या मार्फत आज 31 मे रोजी सर्व नोंदणीकृत डेंटल दवाखान्यात मोफत तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते. पुढील 15 दिवस कर्करोग किंवा त्याआधीचे लक्षणाबाबत तपासणी सर्व डेंटल दवाखान्यात मोफत राहील असे इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पांडूर्णीकर यांनी सांगितले.  

 0000



 विमा सल्लागार पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- नांदेड डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आर पीएल आय) योजनेअंतर्गत डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार) भरतीसाठी मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड येथे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात भरलेल्या अर्जासह मंगळवार 14 जून 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 9:30 ते सायं 6 वाजेपर्यंत अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड- 431601 येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. सोबत बायोडाटामूळ कागदपत्रेप्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन नांदेड विभाग डाकघरचे अधिक्षक यांनी केले आहे.

  

 विमा सल्लागार पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता व मापदंड

उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत-कमी 18 वर्षं व जास्तीत-जास्त 50 वर्ष दरम्यान असावे.अर्जदार हा दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ज्यात केंद्रीय / राज्य मान्यता प्राप्त केलेली असावी. बेरोजगार/ स्वयंबेरोजगारमाजी विमा सल्लागारकोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंटमाजी सैनिकसेवानिवृत्त शिक्षकअंगणवाडी कार्यकर्तेमहिला मंडळ कार्यकर्तेग्रामप्रधानग्रामपंचायत सदस्य आदी टपाल जीवन विमासाठी थेट असे अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्यव्यक्तिमत्वजीवन विमा बाबतचे ज्ञानसंगणकाचे ज्ञानस्थानिक भागाची माहिती आदी बाबी अपेक्षित आहेत. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी / केव्हीपीच्या स्वरूपात असेल.

 

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे नांदेड विभाग डाकघरचे अधीक्षक यांनी कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...