Friday, October 12, 2018


अवसायकांची पॅनेलसाठी अर्ज करण्याचे
विभागीय सहनिबंधकाचे आवाहन
      नांदेड दि. 12 :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 व कलम 110 (अे) अन्वये जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांचे कामकाजासाठी अवसायकांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, शिवाजी चौक लातूर यांचे कार्यालयात 15 ते 30 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दिनांक 30 ऑक्टोंबर 2018 पर्यंत राहील, असे आवाहन श्रीकांत देशमुख विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी केले आहे.
अर्ज करण्यास पात्र व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी. प्रॅक्टीसिंग डव्होकटस. चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टट, कंपनी सेक्रेटरी. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी  सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमीदर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी. सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग-1, वर्ग-2 दर्जाचे अधिकारी आणि सहकार अधिकारी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी. महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी. कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती. सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण केले असल्याचे 10 वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक असावा.
अर्जदार व्यक्तींनी पुढीलप्रमाणे अर्हता धारण केलेली असावी. अर्जदार व्यक्तीवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. वर्यामर्यादा 70 वर्षापर्यंत असावी. शारीरीक व मानसिक आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असावा. प्रॅक्टीसिंग डव्होकेटस् व चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टट, कंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा 5 वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम 83 व कलम 88 च्या कार्यवाहीमध्ये जबाबदार धरलेला नसावा (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा). सदर व्यक्तीचा सहकार खात्याने काळ्या यादी मध्ये (Black List) समावेश केलेला नसावा. व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. (लातूर, उस्मानाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यातील) सदर व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकतील.
               प्राप्त अर्जाची छाननी दिनांक 13 नोव्हेंबर 2018 रोजी पूर्ण करुन 17 नोव्हेंबर 2018 पर्यंत प्रारुप नामिका प्रसिध्द करणे व त्यावर हरकती मागवूण निर्णय घेण्यात येईल. हरकतीचा निर्णय करुन 30 नोव्हेंबर 2018 रोजी अंतीम नामीका प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहीर सूचना विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन  प्रवीण फडणीस जिल्हा उपबिनंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
000000

गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलच्या
वापराबाबत सोमवारी कार्यशाळा
        नांदेड, दि. 12 :-जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था व जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने  सोमवार 15 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 11 वा. GeM पोर्टलबाबत कार्यशाळा जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन पहिला मजला कै. रामगोपाल गुप्ता सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस कार्यालयाचे प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
शासनाच्या सर्व विभाग / शासकीय उपक्रम / महामंडळे व त्याअंतर्गत सर्व कार्यालयाकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने मानवी हस्तक्षेपाशिवाय व खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टल विकसित केलेले आहे. राज्य शासनाने पोर्टलची कार्यपध्दती वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी राज्यामध्ये दिनांक 8 डिसेंबर 2017 पासून बंधनकारक केले आहे. बहुतांशी कार्यालयाकडून GeM पोर्टलवरुन खरेदी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
भारत सरकारचे वाणिज्य सचिव यांनी सर्व राज्यातील मुख्य सचिव / अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) यांच्याशी दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींग बैठकीत GeM पोर्टल राष्ट्रीय अभियान राबविण्याचे निर्देशित केले आहे.
त्यानुषंगाने जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था व जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने  सोमवार 15 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 11 वा. GeM पोर्टलबाबत कार्यशाळा जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन पहिला मजला कै. रामगोपाल गुप्ता सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळे जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नांदेड येथील पवार शिवराज पंढरी, वाघमारे आर.एन., नाईक अनुप प्रकाश हे व्याख्याते  मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेस कार्यालयाचे प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...