Wednesday, August 14, 2024
#स्वातंत्र्यदिन
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावरील शुभेच्छा संदेश प्रसिद्धीसाठी
पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाला नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्राममधील स्वातंत्र्य सैनिक, सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना मी अभिवादन करतो.
आज आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. लाखो लोकांच्या बलिदानानंतर हा दिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा झाला. आपली लोकशाही हळूहळू प्रौढ होत असून आम्ही आणखीन जाणीव, जबाबदारीने काम करावे, असे संकेत यातून दिले जात आहेत.
स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन आमची वाटचाल असली पाहिजे. घटनेच्या परिघात राहून स्वातंत्र्याचा समान उपभोग घेणे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. थोडक्यात स्वातंत्र्य ही जबाबदारीही आहे. देशातील समस्या, देशातील परिस्थिती यावर टीकाटिपणी करण्याचा आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सोबतच आपण नेमके देशासाठी काय करू शकतो? किती सुलभतेने समस्या सोडवू शकतो आणि आपण आपल्या देशासाठी काय दायित्व देऊ शकतो याचे आत्मचिंतन करण्याचा आजचा दिवस आहे. देशासाठी सिमेवरच लढावे लागते असे नाही तर आपण जे कार्य करतो ते प्रामाणिकतेने, सचोटीने करणे ही देखील देशसेवा आहे.
राज्य शासनाने लोकांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी काही नव्या योजना यावर्षी सुरू केल्या आहेत. महिलांना आर्थिक बळ, आर्थिक स्वातंत्र्याचा पाया घालण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राज्यात राबविली जात आहे. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मातृ वंदना योजना, आनंदाचा शिधा योजना, वेगवेगळ्या घरकुल योजना अशा कितीतरी योजना राज्यात सध्या सुरू आहेत.या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनासोबत सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करणे गरजेचे आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या अशा या योजना आहेत. या योजनांची उत्तम अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असून त्याला तसाच प्रतिसाद जनतेकडून मिळावा ही अपेक्षा आहे.
#नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे पीक परिस्थिती उत्तम आहे. सोबतच आपण गेल्या वर्षभरात केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे भूगर्भात पाणी पातळी वाढत आहे. ही धरणी, ही पृथ्वी, आपली आई असून पुढच्या पिढीसाठी तिच्या संगोपनाची, तिच्या उज्वल भविष्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत कसा मुरेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठवाड्यासारख्या प्रदेशांमध्ये प्रत्येक शेतातील विहिरीला मुबलक पाणी असावे, प्रत्येक शेताला पाणी मिळावे यासाठी जलसंधारणाच्या कामाला सर्वाधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. शासन त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. आपल्या सर्वांची ही साथ मिळावी अशी अपेक्षा आहे.
यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी एका वेब पोर्टलची सुरुवात 15 ऑगस्ट पासून आम्ही करत आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत किंवा नगरपालिका नगर परिषदांपर्यंत पोहोचून जनतेला आपला हक्क मागण्यासाठी मोठी ससेहोलपट करावी लागते त्यावर मात म्हणून हे पोर्टल काम करणार आहे प्रशासनातर्फे गतिशील पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला जाईल अशा पद्धतीची रचना आम्ही करतो आहे मात्र हे पोर्टल पुढच्या काळातही उत्तम प्रकारे सुरू राहावेत व प्रशासन व सामान्य जनतेच्या मधला दुवा बनावेत यासाठी सामान्य जनतेकडूनही मोठ्या प्रमाणात आम्ही अपेक्षा करत आहे लवकरच या संदर्भातील लिंक आम्ही माध्यमांमधून जाहीर करणार आहोत.
लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका अनिवार्य आहे. या निवडणुकांमधून मतदानाद्वारे आपले लोकप्रतिनिधी निवडणे नागरिकांचे कर्तव्य आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला मतदान करायचे आहे. त्यासाठी 20 ऑगस्ट पर्यंत आपल्या नावाबाबतची खातरजमा करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या या पर्वावर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सतरा व अठरा तारखेच्या विशेष मतदार नोंदणी अभियानात सहभागी होण्याचे मी आवाहन करीत आहे.
आजचा दिवस हा देशासाठी नव्याने प्रण करण्याचा दिवस आहे. आपला देश अधिकाधिक प्रगत होईल, यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या घरापासून याची सुरुवात होऊ शकते. सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, धर्म, पंथ, समुदाय, जात यावरून भेदाभेद न करणे, सार्वजनिक मालमत्तेप्रती आपले दायित्व आणि परस्परांबद्दलच्या शुभचिंतनातून देखील मोठे कार्य सिध्दीस जाऊ शकते. त्यामुळे सकल समाजाचा सामाजिक पुरुषार्थ वाढीस लागो, अशी अपेक्षा आपण करू या.
मी पुन:श्च एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
जय हिंद जय महाराष्ट्र
शुभेच्छांसह..
गिरीश महाजन
ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री नांदेड
0000
#नांदेड मुख्य शासकीय समारोह : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 वा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात हर्षोल्लासात साजरा झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी झेंडावंदन केले. कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #स्वातंत्र्यदिन
#नांदेड मुख्य शासकीय समारोह : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 वा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात हर्षोल्लासात साजरा झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी झेंडावंदन केले. कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #स्वातंत्र्यदिन
वृत्त क्र. 721
राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा सप्ताहाचे आयोजननांदेड दि. 14 ऑगस्ट :- राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगष्ट, 2024 रोजी साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून याकरीता जास्तीत खेळाडूंनी सहभाग घ्यावा. तसेच सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त खेळाडुनी आपल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत व नावे 25 ऑगस्ट 2024 पर्यत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड येथे जमा करावी. अधिक माहितीकरीता श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी संपर्क, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने ऑलम्पिक वीर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलम्पिक वीर कै.खाशाबा जाधव यांचे स्मरण करून, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नांदेड जिल्ह्य़ातील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त केलेल्या प्राविण्य प्राप्त खेळाडुचा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगष्ट, 2024 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड द्वारा सन्मान चिन्ह देवुन गौरव करण्यात येणार आहे.राज्यामध्ये सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार होत असून अर्थात खेळाची प्रगती साध्य होणे आवश्यक आहे. याकरिता कार्यालयाच्या वतीने 26 ते 31 ऑगष्ट,2024 या कालावधीत पुढीलप्रमाणे खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे.1) चालण्याची शर्यत व बुध्दीबळ (19 वर्षे मुले-मुली) –26 ऑगस्ट 2024 वेळ स. 7 वा. जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड2) बॅडमिंटन (19 वर्षे मुले-मुली)- दि.27 ऑगस्ट 2024 जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड वखो-खो- तालुका क्रीडा संकुल, सिडको-नांदेड3) टेबल टेनिस व बास्केटबॉल (19 वर्षे मुले-मुली)- 28ऑगस्ट 2024 जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड4) व्हॉलीबॉल (19 वर्षे मुले-मुली)- दि.29 ऑगस्ट 2024- महात्मा फुले हायस्कुल, बाबानगर, नांदेड5) हॉकी पॅनल्टी शुट आऊट (19 वर्षे मुले-मुली)- दि.29 ऑगस्ट 2024 – खालसा हायस्कुल, नांदेड6) मिनी फुटबॉल (19 वर्षे मुले-मुली)- 30 ऑगस्ट 2024- इंदिरा गांधी मैदान स्टेडियम परीसर, नांदेड7) टेनिसबॉल क्रिकेट (19 वर्षे मुले-मुली)- 31 ऑगस्ट 2024- इंदिरा गांधी मैदान स्टेडियम परीसर, नांदेड000000
वृत्त क्र. 720
मतदारांना विधानसभेसाठी 20 ऑगस्टपर्यत मतदार नोंदणी करता येईल
17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान
नांदेड, दि. १४ ऑगस्ट : मतदारांनो विधानसभा निवडणुकीमध्ये आपली मतदार नोंदणी करणे बाकी असेल तर शेवटची मुदत 20 ऑगस्ट असून या तारखेपर्यत नोंदणी करुन घ्यावी. तसेच आपण मतदार आहोत अथवा नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी व नसेल तर आपले नाव यादीत घालण्यासाठी 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
येत्या शनिवारी व रविवारी म्हणजेच 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नाव वगळणे, कमी करणे, समाविष्ट करणे, तपासणी करणे ही प्रक्रिया करता येणार आहे.
जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. येत्या शनिवार व रविवारी म्हणजेच दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजीही मतदान पुनरिक्षण राबविण्यात येणार आहे.
000000
वृत्त क्र. 719
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत
वृत्त क्र. 718
स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आज
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन
नांदेड दि. 14 ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे.
सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र. 717
जिल्हा युवा पुरस्काराचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांचे हस्ते वितरण
नांदेड दि. 14 ऑगस्ट :- जिल्हयात कार्यरत असलेल्या युवक, युवतीं व नोंदणीकृत संस्थानी केलेल्या समाजहिताच्या उल्लेखीत कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर अर्जाची छाननी करुन अंतिम पुरस्कारार्थीची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पुरस्कारार्थीना उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, विविध एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी यांनी उद्या 15 ऑगष्ट, 2024 रोजी सकाळी 8.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
राज्याचे युवा धोरण सन 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासननिर्णय 12 नोव्हेंबर,2013 अन्वये जिल्हयातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थाकडून जिल्हा युवा पुरस्कार सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या चार वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावाची जिल्हास्तर युवा निवड समितीच्या वतीने छाणणी करून अंतिम पुरस्कारार्थीची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
सन 2020-21 (युवक) करीता खान इम्रान मुजीब पाशा- बिलोली, सन 2021-22 (युवक) अमोल उध्दवराव सरोदे- रा.अर्धापूर जि.नांदेड, सन 2021-22 (संस्था) अध्यक्ष/सचिव अल इम्रान प्रतिष्ठाण, बिलोली जि.नांदेड, सन 2022-23 (युवक) अमरदिप दिगंबर गोधणे- हडको नवीन नांदेड .
या पुरस्काराचे स्वरुप युवकासाठी 10 हजार रुपये रोख, तसेच संस्थासाठी 50 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असुन पुरस्कारार्थीना भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगष्ट, 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमा मध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे.
00000
वृत्त क्र. 716
खरीप मधील कापुस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य
नांदेड दि. 14 ऑगस्ट :- राज्यातील ज्
सदरील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्ये देणे अपेक्षित आहे. चूक होऊ नये यासाठी या संमतीपत्रावरोवर आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहाय्यकांना देण्यात यावी. याशिवाय ज्या क्षेत्रावर सामायिक खातेदार आहेत त्यांनी सामायिक खातेदार ना हरकत पत्र सोबत जोडणे अपेक्षित आहे.
सदरचे संमतीपत्र तसेच सामायिक खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र यांचा नमुना पत्र आपल्या गावाच्या कृषी सहाय्यकांकडून शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या वेवपोर्टलवर माहिती भरली जाणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
वृत्त क्र. 715
विशेष गौरव पुरस्कारासाठी
माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 14 ऑगस्ट :- विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एकरकमी 10 हजार व 25 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभागाच्यावतीने देण्यात येतो. तरी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक / पत्नी व त्यांच्या पाल्यांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह मंगळवार 27 ऑगस्ट 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक मोबाईल क्रमांक 8698738998, 8707608283 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
सन 2023-24 या वर्षासाठी कल्याणकारी निधितून विशेष गौरव पुरस्कार उत्कृष्ट क्षेत्रातील कामगिरी नुसार प्रदान केला जाणार आहे. इयत्ता 10 व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नृत्य, इत्यादी क्षेत्रातील राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे पुरस्कार प्राप्त व्यक्ती, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबाबत पुरस्कार प्राप्त व्यक्ती अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य इत्यादींना विशेष गौरव पुरस्कार आर्थिक स्वरूपात प्रदान केला जाणार आहे.
00000
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...