Friday, July 19, 2024

 वृत्त क्र. 614

हलके मोटार वाहन संवर्गातील

वाहन नोंदणीसाठी एमएच 26-सीपी नविन मालिका  

 

नांदेडदि. 19 जुलै :- परिवहन्नेतर संवर्गातील हलके मोटार वाहन (LMV-NT) वाहनांसाठी एमएच26-सीपी (MH26-CPGही नविन मालिका सोमवार 22 जुलै पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्डपॅन कार्डमोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज सोमवार 22 जुलै रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेतत्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 22 जुलै रोजी दुपारी वाजता Text message किंवा दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 613

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 

नांदेडदि. 19 जुलै :- शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धांचा उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते पार पडला. सदर स्पर्धेतील विजेत्यांना अधिष्ठाता डॉ. देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्याबाबत विद्यार्थ्यांना समाजात जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित केले.

 

वत्कृत्व स्पर्धेमध्ये या महाविद्यालयातील तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातल विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. एकूण 100 विद्यार्थ्यांनी रांगोळीपोस्टरकविताघोषवाक्यनिबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अधिष्ठाता यांनी अवयवदानाच्या महत्वावर प्रकाश टाकला त्याचबरोबर अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित रॅलीमध्ये मोठया प्रमाणात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

 

या प्रसंगी डॉक्टर संजय मोरेप्राध्यापक व विभागप्रमुखसुक्ष्मजीवशास्त्र विभाग तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय.एच. चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले व अवयवदान ही चळवळ विद्यार्थ्यांपर्यंत सिमीत न राहता सर्व लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे सांगितले. सदरील कार्यक्रमामध्ये या महाविद्यालयातील डॉ. प्रल्हाद राठोड व डॉ. मुकुंद कुलकर्णी तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापकडॉ. प्रज्ञा देशपांडेडॉ. डोळे व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

स्पर्धेतील गुणवंतांची निवड करण्याकरिता स्पर्धेचे निरिक्षक म्हणुन डॉ. हेमंत गोडबोलेडॉ. चंडालियाडॉ. वैशाली इनामदारडॉ. किशोर राठोडडॉ. सुधा करडखेडकरडॉ. उमेश अत्रामडॉ. अनुजा देशमुख यांनी काम पाहीले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखडॉ. वैष्णवी कुलकर्णीडॉ. नाजीमा मेमन व ईतर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अनिकेत वानखेडेडॉ. तेजस्वीनी बसले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सचिन तोटावार यांनी विभागाच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

00000



 वृत्त क्र. 612 

दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयवसहायभूत साधन 

मोजमाप- नाव नोंदणी शिबिराचे आयोजन

 

नांदेड, दि. 19 जुलै :- जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन व एलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी सी.एस.आर च्या माध्यमांतून मोफत कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांचे मोजमाप- नावनोंदणी शिबीराचे मंगळवार 23 व बुधवार 24 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता शहराच्या मगनपुरा भागातील आर.आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

 

मोजमाप शिबिरासाठी दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्डयु.डी.आय.डी कार्ड, ऑडिओग्राफ (श्रवणयंत्रासाठी), दिव्यांगत्व दिसेल असे 2 फोटो असणे आवश्यक आहे.  मोजमाप-नावनोंदणी शिबिरानंतर दिव्यांगाना कृत्रिम अवयव, सहायभूत साधनांचे वाटप  अंदाजित एक महिन्याच्या कालावधीत वाटप शिबिरात करण्यात येणार आहे. या शिबिरात सी.एस.आर अंतर्गत मोटराइज्ड ट्रायसिकल, ट्रायसिकल, व्हीलचेअर, सी.पीचेअर, सुगम्यकेन, कुबडी जोड, मोबाईल, श्रावणयंत्र, रोलेटर, वॉकिंग स्टिक आदी साहाय्यभूत साधनांचा समावेश आहे.

 

शासकीय योजनेअंतर्गत गत तीन वर्षात सहायभूत साधनांचा व मोटराइज्ड ट्रायसिकलसाठी गत पाच वर्षात लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहायभूत साधनांचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील अशा अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक नितिन निर्मल यांनी केले आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी आरआर मालपाणी मतिमंद विद्यालयात संपर्क (९०६७३७७५२० / ८२०८११४८३२) करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 611 

जिल्ह्यात जमावबंदीशस्त्रबंदी आदेश लागू


नांदेडदि. 19 जुलै :- नांदेड जिल्ह्यात 21 जुलै 2024 चे सकाळी वाजेपासून ते ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहेअशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 जुलै चे सकाळी वाजेपासून ते ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारीशासकीय कर्मचारीविवाहअंत्ययात्राधार्मिक कार्यक्रमयात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठीसभामिरवणुकामोर्चा काढणेध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

 वृत्त क्र. 610

 वृत्त क्र. 609

सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु


नांदेडदि. 19 जुलै :- माजी सैनिकमाजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांच्या महाविद्यालयीन पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 व 8707608283 वर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते.  प्रवेश  सैनिक/ माजी सैनिकांच्या विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरिक पाल्यांना सुद्धा उपलब्ध आहेत.  प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृहविष्णुपुरीनांदेड येथे उपलब्ध आहेत. या वसतीगृहात उत्तम जेवणाची सोय (आठवड्यातून तीन वेळा नॉन-वेज/वेज व नाश्त्यामध्ये अंडी)स्वतंत्र अभ्यासिकाजिमखानाभोजनालय कक्ष तसेच सकाळी पीटी आणि सायंकाळी रोल कॉल या सर्व सोयींनी सज्ज आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच संबंधितांनी याची नोंद घ्यावीअसेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.

0000

 विशेष लेख

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण

महिलांच्या सक्षमीकरणाला मिळेल चालना


महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य. महाराष्ट्राने सुरू केलेल्या अनेक योजना,उपक्रम व अभियानाचे अनुकरण देशातील अनेक राज्यांनी केले आहे. स्त्री आणि पुरुष ही संसाररूपी जीवनाची दोन चाके आहे. कुटुंबाच्या अर्थार्जनात महिलाही आपला सहभाग देत आहे.महिलांच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे म्हणून महिला धोरण ठरविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. माझी कन्या भाग्यश्री,लेक लाडकी या मुलींसाठी योजना सुरू केल्या.एवढ्यावरच न थांबता आता महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे.या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य,त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासोबतच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत होण्यास मदत होणार आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करून त्याची व्याप्ती देखील वाढविली आहे.महानगरपालिका क्षेत्राकरिता वार्ड स्तरीय समित्या गठित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा,यासाठी अनेक अटी शिथिल करून प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित असलेल्या विधवा,घटस्फोटीत,परितक्त्यानिराधार महिला त्याचप्रमाणे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.वर्षाकाठी 18 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.हा पैसा महिलांच्या अडीअडचणीच्या कामी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक बाबीसाठी खर्च करण्यात कामी पडणार असून त्यांना आत्मनिर्भर,स्वावलंबी व त्यांच्या सशक्तिकरणाला हातभार लागणार आहे.


 योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारी शक्ती दूत हे मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे.नवविवाहित महिलेचे नाव रेशनकार्डवर लवकर लावणे शक्य होत नाही,त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल व त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.


आता योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे पोस्टातील बँक खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच ऑफलाइन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.जिल्ह्यात जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कक्ष सुरू करण्यात आले आहे.या कक्षातून महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे.जिल्हातालुका आणि गाव पातळीवर या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आढावा बैठका देखील घेण्यात येत आहे.समित्या गठित करून समितीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांचे ग्रामीण व शहरी भागात अर्ज भरून घेण्यासाठी बालवाडी सेविका,अंगणवाडी सेविकानागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटकमदत कक्ष प्रमुख,नागरी अभियानाचे व्यवस्थापकआशा सेविका,सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ज्या महिला लाभार्थी " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील त्या लाभार्थी महिलांचे केवळ ऑफलाइन अर्ज भरून घेऊन त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल मात्र पात्र लाभार्थी महिलांकडून या योजनेचे अर्ज भरून घ्यावे लागणार आहे.


ग्रामस्तरीय समिती ही गाव पातळीवर स्थापन करण्यात येत आहे.या समितीमध्ये ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,तलाठी,अंगणवाडी सेविकाआशा सेविका,ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी असतील. या समितीचे संयोजक हे ग्रामसेवक तर सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असतील. ही समिती गाव पातळीवर जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करून ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने लाभार्थी महिलांची नोंदणी करणार आहे. ऑफलाइन अर्ज लगेच ॲप/ पोर्टलवर भरावे लागणार आहे. या समितीकडून गावातील अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी आणि आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे.ही यादी गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या यादीवर कोणी आक्षेप घेतले तर त्याचे निराकरण करण्यात येणार आहे तसेच द्विवृत्ती (डुप्लिकेशन) टाळण्यात येईल.लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविकाअंगणवाडी सेविकाराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख,शहर अभियानाचे व्यवस्थापक,आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र,अंगणवाडी  पर्यवेक्षिका,ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्रति लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे,अर्ज भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास,या प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या योजनेतील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.

 

विवेक खडसे

जिल्हा माहिती अधिकारी,

धाराशिव

 वृत्त क्र. 608

 

जिल्हा उद्योग केंद्राची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात

सरकारची धोरणे-उपक्रमाबाबत सोमवारी कार्यशाळा 

 

नांदेड, दि. 19 जुलै :- जिल्हा उद्योग केंद्र या कार्यालयाची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य व केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत एक दिवशीय कार्यशाळा सोमवार 22 जुलै रोजी उद्योग भवन नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आली आहे.

 

 ही कार्यशाळा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.  या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग व संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 

या कार्यशाळेचा उद्देश हा नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांचे उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा असून सदर कार्यशाळेत स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे, निर्यात प्रक्रिया, खरेदीदार आणि विक्रेते शोधणे, निर्यात कर्ज आणि अनुदान योजना, पॅकिंग व ब्रेडींग, आवश्यक चाचण्या या विषयांवर चर्चा होणार आहे. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकासोबत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन "IGNITE Maharashtra-2024" या अंतर्गत करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करतील. जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, निर्यातदार, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग, निर्यातीशी संबंधीत अधिकारी व केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी उद्योजक यांचा सहभाग राहणार आहे.

 

राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पदकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वंयरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा उत्पादन उपक्रम व निर्यातवद्धीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरिता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबविण्यात येत आहेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी कळविले आहे.

0000

 वृत्त क्र. 607


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत

सहभागी होण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

 

नांदेड दि. 19 जुलै : "प्रधानमंत्री पीक विमा योजना" खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नांदेड जिल्हयातील  जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे.

 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी राज्यात राबविण्यास 26 जून 2023 च्या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू केली असून सहभागाची अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी निश्चित करण्यात आली होती.

 

शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'प्रधानमंत्री पीक विमा योजनाखरीप हंगाम ऑनलाईन विमा भरण्यास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

०००००

  वृत्त क्र. 606 


प्रत्येक शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे आवाहन

 

नांदेडदि. 19 जुलै :- राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला आहे. ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थीशिक्षकधोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणारा आहे. शिक्षण सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी सूचित केले आहे. त्यानुसार शिक्षण सप्ताहातील उपक्रम पुढील वेळापत्रकाप्रमाणे शाळेत राबवून व तसा अहवाल शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद कार्यालयास पाठवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.    

 

सोमवार 22 जुलै रोजी अध्ययन-अध्यापन साहित्य दिवसमंगळवार 23 जुलै रोजी मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस. बुधवार 24 जुलै रोजी क्रीडा दिवसगुरुवार 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवसशुक्रवार 26 जुलै रोजी कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवसशनिवार 27 जुलै रोजी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात एकोक्लब उपक्रम,शालेय पोषण दिवसरविवार 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस याप्रमाणे उपक्रमांची नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त संख्येनी सहभागी व्हावे, असेही आवाहन केले आहे.

000

 विशेष लेख

 महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ.. 

        आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता ‘मार्वल’ कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे. 

            मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या माध्यमातून अनेक नवकल्पना निर्मित होऊन प्रगती साधली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्या बाबी कल्पनेबाहेरच्या वाटत होत्या त्या वैज्ञानिक सिद्धांताद्वारे मान्य होऊन हळूहळू वास्तविकतेत रूपांतरित झाल्या. त्याचेच आजचे आधुनिक स्वरूप म्हणून आपण कृत्रिम बुद्धीमत्तेकडे पाहू शकतो. 

            कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी तयार केलेल्या संगणकामधील मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण म्हणता येईल. शिकणे, तर्क करणे, समस्या सोडवणे, समज आणि भाषेचे आकलन ही सर्व या संगणकीय क्षमतांची उदाहरणे म्हणता येतील. संगणक, संगणक-नियंत्रित रोबोट किंवा सॉफ्टवेअर बनवण्याची एक पद्धत आहे जी मानवी मन आणि बुद्ध‍िप्रमाणे विचार करते. मानवी मेंदूचा अभ्यास करून आणि माहितीचे विश्लेषण करून त्याचे परिणाम दर्शविते.

            वास्तववादी आणि उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा, व्हिडीओ आणि ऑडिओ तयार करण्यासाठी सुमारे एक दशकापूर्वी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर भारतात होऊ लागला. त्यासोबतच गुगल एआय, चॅट-जीपीटी आदी माध्यमातूनही याचा वापर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे सिरी किंवा अलेक्सा ही नावे सुद्धा परिचित झाली आहेत. या मशीन्स सुद्धा मर्यादित स्वरुपात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा भाग म्हणता येतील. मानवाप्रमाणे विचार करण्याची कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची क्षमता सिद्ध होऊ लागली आहे. सध्या चॅटबॉट्सने जगात वादळ आणले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात डेटाचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले आहे. मोठमोठ्या कंपन्या दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आणि कामगारांना मदत करण्यासाठी याची मदत घेत आहेत. मानवी आकलनशक्ती आणि तर्कावर आधारित निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर जटील समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर केला जाऊ लागला आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलाला याचा मोठा लाभ होऊ शकणार आहे.

            सद्यस्थितीत शासनाच्या विविध विभागांकडे प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असते. पोलीस दलाकडे गुन्हे आणि गुन्हेगारांसंबंधी माहिती मोठ्या प्रमाणावर येत असते. सायबर आणि आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असून नागरिकांच्या फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. यात गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हेगारांची संख्या देखील मोठी असते. प्रत्येक बाबीत विविध प्रकारे मानवी मेंदूच्या क्षमतेचा वापर करून आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि या माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मनुष्याप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकालाच शिकविले तर याचा मोठा लाभ होऊ शकतो. हाच धागा पकडून महाराष्ट्र पोलीस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करुन पोलीस दलाला या कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत मिळवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने  16 मार्च 2024 च्या बैठकीत घेतला आणि त्या अनुषंगाने तातडीने पावले उचलून ‘मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली.

            कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करुन गुप्तवार्ता क्षमता भक्कम करण्यासाठी आणि अपराधांचा पूर्वानुमान लावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच राज्य पोलीस दलास कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी राज्यात ‘Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement (MARVEL)’ ‘मार्वल’ ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या कंपनीस शासनामार्फत 4 कोटी 20 लाख रुपये प्रतीवर्ष याप्रमाणे पाच वर्षांकरिता 100 टक्के भागभांडवल देण्यात येणार असून भागभांडवलाचा पहिला हप्ता नुकताच वितरीत करण्यात आला आहे. 

            ‘मार्वल’ स्थापन करण्याबाबत राज्य शासन, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर आणि मे. पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या. यांच्यात दि.22 मार्च 2024 रोजी त्रिपक्षीय करार करण्यात येऊन शासनाची ही कंपनी अधिनियम 2013 खाली नोंदणीकृत करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासमोर पोलीस जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिव तथा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव (अतिरिक्त कार्यभार) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. 

            पोलीस दलाला कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाल्याने मशीनला माहितीचे विश्लेषण करून आणि मानवाप्रमाणे विचार करायला शिकवून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठा लाभ होऊ शकेल. त्याचबरोबर गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत जाणून, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून कुठे गुन्हा घडू शकतो, कुठे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते आदी बाबींचे अनुमान आधीच लावता येऊ शकणार आहे.

            या उपक्रमातील मे. पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या. ही चेन्नई स्थित कंपनी असून त्यांना भारतीय नौदल, गुप्तवार्ता विभाग, आंध्र प्रदेश, आयकर विभाग, सेबी आदी संस्थांना एआय सोल्युशन्स पुरविण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विशेषज्ञतेचा उपयोग व्हावा या उद्देशाने ‘मार्वल’ चे कार्यालय नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आवारात आहे. पोलीस दलाच्या मागणीनुसार ‘पिनाका’ एआय सोल्युशन्स पुरवेल तर, भारतीय व्यवस्थापन संस्था संशोधन आणि प्रशिक्षणामध्ये सहकार्य करणार आहे. नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर चे संचालक हे या कंपनीचे पदसिद्ध संचालक असतील आणि मे.पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या.चे संचालक हे या कंपनीच्या संचालक मंडळावर असणार आहेत. तर नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक हे पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

            देशात नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाची कार्यक्षमता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरामुळे आणखी वाढणार असून सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची उकल तातडीने होण्यासाठी हातभार लागेल, यात शंका नाही. ‘मार्वल’ थेट शासनाच्या गृह विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार आहे. त्यामुळे भविष्यात शासनाच्या इतर विभागांनाही कृत्रिम बुद्धीमत्तेचा लाभ मिळून महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत देश विविध क्षेत्रात जगभरात अग्रेसर राहील, हे निश्चित.

 -ब्रिजकिशोर झंवर

वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.

00000




वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...