Monday, August 19, 2024

वृत्त क्र. 740

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान 

मंगळवारी नांदेड दौऱ्यावर

नांदेड, दि. १९ ऑगस्ट : पंजाबचे मुख्यमंत्री उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक गुरुद्वारामध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान चंदीगड येथून श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे उद्या दुपारी दोन वाजता पोहोचणार आहेत. दुपारी दोन ते पाच ते नांदेड येथील प्रसिद्ध तख्त सचखंड श्री. हुजूर साहिब गुरुद्वारा गुरुद्वारामध्ये कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी ते मुंबईकडे प्रयाण करतील.

000000

 वृत्त क्र. 739

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 163

नांदेड दि. 19 ऑगस्ट :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 सप्टेंबर 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 ऑगस्ट 2024  रोजी सकाळी  6  वाजेपासून ते 19 सप्टेंबर 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 वृत्त क्र. 738

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी

ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 19 ऑगस्ट : राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्वअशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधनेउपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ्य केंद्रयोगोपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्ज 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मागविण्यात आली आहेत.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणान्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे (उदा :- चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-बेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.) खरेदी करण्याकरिता राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" सुरु केलेली असून पात्र रक्कम हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणेसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालय व कार्यालय अधिनस्त तालुकाच्या ठिकाणी कार्यरत मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह व शासकिय निवासी शाळा येथे कार्यालयीन वेळेत पुढीलप्रमाणे दिलेल्या तालुकानिहाय वसतिगृह व निवासी शाळेस अर्ज सादर करावेत.

 

गुणवंत मुलाचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी तालुका नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बिलोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह धर्माबाद, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देगलूर, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मुखेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हदगाव, मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह भोकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उमरी, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव, अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकिय निवासी शाळा माहूर तसेच वरील नमुद शाळा व वसतीगृह या व्यक्तीरिक्त सदर योजनेचे ग्रामपंचायत अंतर्गत अर्ज ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित गावची ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी पंचायत समिती, संबंधित तालुका याठिकाणी  लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत.

 

अर्जासोबतची कागदपत्रे  

दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावे. आधार कार्ड / मतदान कार्ड, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसिलदार तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँक खात्याचे बँक पासबुक झेरॉक्स. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. उत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असावे. स्वयंघोषणापत्र CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे देखील स्वयंघोषणापत्र नमुद करण्यात यावे. वरील नमूद साधनांपैकी पैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमुद करावी. ही कागदपत्रे पुर्ण करणारे लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत तालुका निहाय दिलेल्या ठिकाणी परिपूर्ण अर्ज सादर करावेतअसे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र. 737

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 19 ऑगस्ट:- नांदेड जिल्ह्यात 20 ऑगस्ट 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 3 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 20 ऑगस्टचे सकाळी 6 वाजेपासून ते 3 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्र. 736                          

                              सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार

31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 19 ऑगस्ट : राज्य शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकतेसह जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा नि:शुल्क आहे. स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईचा https://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून परिपूर्ण भरलेले अर्ज 31 ऑगस्टपर्यत   mahotsav.plda@gmail.com ईमेलवर सादर करावेत.

7 सप्टेबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थाच्या उत्सव स्थळाला भेट देतील आणि  जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. नांदेड जिल्ह्यातून 1 शिफारस राज्यस्तरीय परीक्षणासाठी पाठविली जाईल. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असेही प्रसिध्दीपत्रकाने कळविले आहे.

00000 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...