Thursday, October 29, 2020

 

101 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 71 कोरोना बाधितांची भर      

नांदेड (जिमाका) दि. 29 :- गुरुवार 29 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 101 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 71 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 27 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 44 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 591 अहवालापैकी  1 हजार 505 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 19 हजार 27 एवढी झाली असून यातील  17  हजार 717 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 669 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकाही बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 504 एवढीच आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 2, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केंअर सेंटर 1, लोहा कोविड केंअर सेंटर 1, बिलोली कोविड केंअर सेंटर 3, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, हदगाव कोविड केंअर सेंटर 1, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 70, किनवट कोविड केंअर सेंटर 3, खाजगी रुग्णालय 13 असे  101 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.36 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 22, बिलोली तालुक्यात 1, मुखेड 2, मुदखेड 1, नायगाव 1 असे एकुण 27 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 13, लोहा तालुक्यात 3, अर्धापूर 6, नायगाव 1, मुखेड 2, नांदेड ग्रामीण 3, हदगाव 3, बिलोली 8, धर्माबाद 4, मुदखेड 1 असे एकूण 44 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 669 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 157, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 192, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 44, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 24, हदगाव कोविड केअर सेंटर 8, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 16, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 19,  मांडवी कोविड केअर सेंटर 2, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, मुदखेड कोविड केअर सेटर 6, माहूर कोविड केअर सेंटर 9, किनवट कोविड केअर सेंटर येथे 30, धर्माबाद कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 8, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, भोकर कोविड केअर सेंटर 6,  हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, बारड कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 90, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत. 

गुरुवार 29 ऑक्टोंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 72, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 68 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 11 हजार 440

निगेटिव्ह स्वॅब- 88 हजार 959

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 27

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 717

एकूण मृत्यू संख्या- 504

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 487 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 669

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 36. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

ऑनलाईन महारोजगार मेळावा

1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन 

 नांदेड (जिमाका) दि. 29 :- कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद यांच्यामार्फत  1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., पदवीधर, डिप्लोमा अभियांत्रिकी पदवीधर, एम.बी.ए, इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलेले आहे. 

सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना आपल्या एम्पलॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन आप्लाय करावे. ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अप्लाय करावे. या मेळाव्यासाठी, जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय ऑटोपार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो इंडस्ट्रिज लि औरंगाबाद,चौगुले इंडस्ट्रिज प्रा.लि. पुणे, महावितरण कार्यालय औरंगाबाद, मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सेक्युरिटी ण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडीया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली, विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स उस्मानाबाद, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग औरंगाबाद, सेंसीव्ह एज्युकेशन लि.पुणे श्री साई रिसर्च लॅब इ. नामांकिंत उद्योजकांनी 1902 ऑनलाईन  रिक्तपदे अधिसुचित केलेली  आहेत. 

याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क करावा. तसेच जॉब व्हॅकेंसीज बाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते तरी उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलेले आहे.

00000

 

 मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतर्गंत लाभार्थ्यांनी

ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यातील मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतर्गंत अनुसूचित जाती प्रर्वगातील लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.यांनी सुरु केलेल्या https://www.mahadiscom.in/solar/ https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=trackA1FormStatus या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. यांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतर्गंत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ऑनलाईन पोर्टलवर लिंक उपलब्ध करुन दिलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेबाबतच्या माहितीसाठी अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. अण्णाभाऊ साठे चौक नांदेड या कार्यालयाशी संपर्क करावा, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले  आहे.

0000

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

शुक्रवार 30 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.30 वा. नांदेड येथून परभणीकडे मोटारीने प्रयाण करतील. परभणी येथून मोटारीने सायं. 6.30 वा. नांदेड येथे आगमन व राखीव. शनिवार 31 ऑक्टोंबर 2020 रोजी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उपस्थिती. स्थळ गांधीपुतळा, वजीराबाद नांदेड. दुपारी 12 वाजता मोटारीने यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000

सुधारित वृत्त

 

शेतकऱ्यांना ऊसाचा मोबदला

अधिकाधिक कसा मिळेल यासाठी कटिबद्ध

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लि. लक्ष्मीनगरच्या रौप्य महोत्सवी

गळीत हंगामाचा डॉ. विश्वजीत कदम व मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मागील 24 वर्षे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने इथल्या शेती आणि शेतकऱ्यांप्रती जी विश्वासार्हता जपली त्याच विश्वासार्हतेच्या बळावर आपण कारखान्याच्या रौप्य महोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या योगदानातून हा कारखाना आजवर विविध गुणवत्तेसह सुरु आहे. शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त चांगला दर कसा मिळेल यासाठी आम्ही विश्वस्त या नात्याने अधिक कटिबद्ध असून सदैव प्रयत्नशील राहून असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लि. लक्ष्मीनगरच्या रौप्य महोत्सवी गळीत हंगाम शुभारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ आणि मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, उपाध्यक्ष कैलास दाड आदींची यावेळी उपस्थिती होती.   

केवळ साखरेच्या उत्पादनावर साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अधिक पैसे मिळतील अशी स्थिती आता राहिली नाही. शेतकऱ्यांना, भागधारकांना ऊसाचा योग्य दर देण्यासाठी इतर बायोप्रोडक्टची जोड द्यावी लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण 30 हजार लिटर इथेनॉलचा प्रकल्प सुरु केला आहे. यात आता वाढ करुन तो प्रकल्प दुप्पटीने मोठा म्हणजेच 60 हजार लिटर क्षमतेचा करीत असल्याची घोषणा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. सहकारी साखर कारखान्यांच्याबाबतीत अलिकडच्या काळात ऊसासाठी जे दर बांधून दिले तेच दर साखरेसाठी जर बांधून दिले असते तर शेतकऱ्यांचा आजवर अधिक फायदा झाला असता. केंद्र सरकारच्या निदर्शनास आम्ही याबाबी आणून दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील रस्ते विकासासमवेत इतर विकासाच्या कामांवरही भर दिला आहे. यात सुमारे 153 कोटी रुपयांची जिल्हा न्यायालयाची इमारत, भोकर येथे 12 कोटी रुपयांची न्यायालयीन इमारत, तांडा विकास निधी आदी विविध विकास कामांवर भरीव तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याबाबत असलेल्या अडचणी व तापमान नोंदीतील कार्यपद्धतीमुळे होणारे नुकसान याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी अप्पर पैनगंगा विष्णुपूरी सारखे मोठे प्रकल्प आकारास घातले. यावर्षी सर्वत्र भरपूर पाऊस झाल्याने शंभर टक्के धरणे भरली आहेत. आता शेतकरी रोटेशनचे नावही घ्यायला तयार नाहीत  एवढे पाणी आहे. सर्वांजवळ मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी आता गुणवत्तापूर्ण शेती उत्पादनाकडे वळले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीत राज्यातील रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतेच दहा हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. यात 2600 कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील विविध कामांसह जिल्ह्यातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण करु असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचित केले. 

भाषणाच्या सुरवातीला त्यांनी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण व स्व. पतंगराव कदम यांच्या स्मृतींना उजाळा दिला. डॉ. विश्वजीत कदम यांनी पतंगराव कदम यांचा वारसा समर्थपणे चालविला असून त्यांच्या कामाची कार्यपद्धती अतिशय चांगली असून या युवा नेत्याचे मराठवाड्याकडून कौतूक व्हावे, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी त्यांना मी निमंत्रण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझा युवा सहकारी म्हणून मला अभिमान असल्याचेही त्यांनी गौरोउद् गार काढले. 

इथल्या कृषिक्षेत्रावर स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे मोठे ऋण आहेत. त्यांनी शेतीसाठी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करुन दिले. पाणी उपलब्ध झाल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्धता साध्य करता आली. अशोक चव्हाण यांनीही त्यांची धुरा समर्थपणे सांभाळली असून माझ्या सारख्या अनेक युवा नेतृत्वाला त्यांनी घडविल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.  

शेतीतील उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर ठिबक शिवाय पर्याय नसल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना उच्च कृषि तंत्रज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी आमदार अमर राजूरकर व कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी मनोगत व्यक्त केले.

00000

 






 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...