Wednesday, March 27, 2024

 वृत्त क्र. 280 

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी

आरटीओ कार्यालय राहणार सुरु  

 

नांदेड दि. 27 :- सन 2023 2024 हे वित्तीय वर्ष दिनांक 31 मार्च 2024 रोजी समाप्त होत असून दिनांक 29, 30 व 31 मार्च 2024 या कालावधीत अनुक्रमे सार्वजनिक सुट्टीशनिवार व रविवार येत असले तरी या काळात प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू असणार आहे.

 

मार्च अखेर असल्यामुळे नवीन वाहनांची खरेदी होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषंगाने होणाऱ्या नोंदी व कार्यालयातील कामकाजाला लक्षात घेऊन ही सूचना जारी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे 29 मार्च 2024 ते दि. 31 मार्च 2024 या सुट्टीच्या कालावधीत सुरु राहील. सर्व वाहन चालक / मालक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 279 

दुष्काळसदृश्य भागातील

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती  

 

नांदेड दि. 27 :- सन 2023-24 मधील जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य भागातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र असलेल्या नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळण्यासाठी पात्रतेच्या आवश्यक माहितीसह अर्ज करण्याचे आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाने केले आहे.

 

यासाठी स्वतःच्या, पालकांच्या आधार संलग्र बॅक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा. तपशीलवार माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://mahahsscboard.in माध्यमिकसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in  उच्च माध्यमिक http://feerefund.mh-hsc.ac.in या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुधाकर तेलंग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

000000

 वृत्त क्र. 278 

बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध

 

·     वाळु डेपोवरुन वाळू वाहतुक सुरु

 

नांदेड दि. 27 :- जिल्‍हयात एकूण 24 वाळु डेपो प्रस्‍तावित करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये बिलोलीदेगलुरमाहुरहदगाव व हिमायतनगर तालुक्‍यातील 17 वाळू डेपो हे नियमित वाळू डेपोंना पर्यावरण अनुमती प्रदान करण्‍यात आली आहे. उर्वरित 7 वाळू डेपो हे नांदेड व लोहा तालुक्‍यातील गाळमिश्रीत वाळु डेपो आहेत.


बिलोली तालुक्यात येसगी, सगरोळी-1 व नागणी, देगलूर तालुक्यात तमलूर व शेवाळा, हदगाव तालुक्यात बेलमंडळ,  नांदेड तालुक्यात वाघी, खुपसरवाडी, भायेगाव व लोहा तालुक्यात बेटसांगवी याठिकाणी मुबलक प्रमाणात वाळू साठा उपलब्ध आहे.

 

ग्राहकास वाळु डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू विक्री सुरु करण्‍यात आली आहे. ज्‍या नागरिकांना वाळुची आवश्‍यकता आहे, अशा नागरिकांना नजिकच्‍या सेतू केंद्रावर जाऊन संपर्क करावा. सदरील सेतु केंद्रावर वाळु डेपोतुन वाळु मागणी करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीवर दररोज कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे. प्रत्‍येक वाळु डेपोवरुन प्रतिदिन किमान 200 ब्रास इतकी रेती बुकींगची मर्यादा निश्‍चीत केली आहे. प्रत्‍येक लाभार्थ्‍याना प्रति महिना 10 ब्रास इतकी वाळु उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. घरकुलाच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू विनामूल्य उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन नागरिकांनी वाळु उपलब्‍ध करुन घ्‍यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 277


आजपासून नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात
४ एप्रिलपर्यत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत

 ५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी

 नांदेड दि. २७ :- नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये उद्या दिनांक २८ मार्चपासून नाम निर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. तर नांदेड लोकसभा निवडणुकीत नेमके किती उमेदवार हे आठ तारखेच्या रात्री निश्चित होईल.  

नांदेड लोकसभा संघाची निवडणूक २६ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. त्यामुळे उद्यापासून तर २६ एप्रिलपर्यत निवडणुकीची लगबग सुरू असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किंवा त्यांच्या सूचकाला नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी नांदेड यांच्याकडे गुरुवार ४ एप्रिलपर्यत (सार्वजनिक सुट्टी व्यक्तीरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.
 
नामनिर्देशनपत्राची छाननी शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवार 8 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत देता येईल.
 
नांदेड जिल्हयात २६ लक्ष ९७ हजार २८७ मतदार
नांदेड जिल्ह्यामध्ये २२ मार्च पर्यंत नोंदीनुसार एकूण मतदारांची संख्या २६ लाख ९७ हजार २८७ आहे. एकूण ३ हजार ८१ मतदान केंद्र यासाठी सज्ज झाले आहे. त्यापैकी भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, या सहा विधानसभा क्षेत्रातील 18.43 लक्ष मतदार नांदेड लोकसभा मतदारसंघात 2 हजार 62 मतदान केंद्रावरून मतदान करणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 9 लक्ष 50 हजार 976 पुरुष, तर 8 लक्ष 92 हजार 129 महिला व 139 तृतीय पंथी आपला मताधिकार बजावणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये 25 हजार 14 मतदार हे 85 वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रावर यायची क्षमता नसेल त्यांना बॅलेट पेपरने मतदान करता येणार आहे. प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
 
तर जिल्ह्यातील किनवट व हदगाव विधानसभा क्षेत्रातील 05.57 लक्ष मतदार 649 केंद्रावरून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत. याशिवाय लोहा विधानसभा क्षेत्रातील 02.92 लक्ष मतदार ३३० मतदार केंद्रावरून लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.

 निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीची घोषणा : 16 मार्च 2024
निवडणुकीची अधिसूचना : 28 मार्च नामनिर्देशनाची अंतिम तारीख : 4 एप्रिल 2024
छाननी : 5 एप्रिल 2024
अर्ज मागे घेण्याची तारीख : 8 एप्रिल 2024
मतदान :26 एप्रिल 2024
मतमोजणी :4 जून 2024
0000

 वृत्त क्र. 276 

संभाव्य काळात पाणी व चारा टंचाई

भासणार नाही याची दक्षता घ्यावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड दि. 27:- जिल्ह्यात उन्हाळ्याच्या संभाव्य काळात पाणीटंचाई व जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी संबंधित विभागानी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर द्यावाअसे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संभाव्य पाणी टंचाई आराखडा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 

यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरपाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंतापाटबंधारे विभागाचे अधिकारीपशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील पाण्याच्या व चाऱ्याच्या उपलब्धतेचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आढावा घेतला. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते अशा ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विहिर अधिग्रहणतात्पुरता पाणी पुरवठा व टंचाई निवारणासाठीची कामे आगामी काळात प्राधान्याने राबविले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत जिल्ह्यात चाऱ्याबाबत कुठल्याही प्रकारची चणचण नसल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागावर लक्ष ठेवून असावे असेही यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...