Monday, June 14, 2021

बांबु लागवड व रेशीम लागवड मार्गदर्शन कार्यशाळा

नांदेड (जिमाका) दि. 14 :- बांबु लागवड व रेशीम लागवड मार्गदर्शन कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे 15 जून रोजी सकाळी 10 वाजता कृषि, महसुल, वनविभाग व रेशीम विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकुर-घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

या कार्यशाळेस माजी आमदार पाशा पटेल, जळगावचे बांबु अभ्यासक संदिप माळी, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे रेशीम संशोधक श्री लटपटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बांबू व रेशीम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, उप वनसंरक्षक एम. आर. शेख,  उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले आहे. तसेच याठिकाणी बांबुपासुन तयार केलेली फर्निचर व त्यापासुन तयार केलेली इतर साहित्य प्रदर्शनासाठी दुपारी 3 ते 5 यावेळेत डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे ठेवण्यात येणार असुन त्याची विक्रीपण करण्यात येणार आहे.

00000

 

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 14 :- कोरोना प्रार्दुभाव वाढत असल्याने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नांदेड जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या विद्यमाने 14 ते 18 जून 2021 पर्यंत ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्या नामांकीत कंपनीच्यावतीने बेरोजगार उमदवारांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीतजास्त बेरोजगार उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswaya.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर सपंर्क साधवा.

 

ऑनलाईन मुलाखतीसाठी शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, कोणत्याही शाखेची पदवी किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप,व्हॉटस्, फोन आदीद्वारे) संपर्क साध आपली ऑनलाईन मुलाखत घेतील.

 

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभागी व्हावे. http://www.rojgar.mahaswaya.gov.in या वेबसाईटवर नोकरी साधक (Job Seeker) म्हणून नोंदणी करावी. वेबसाईटवरील नोकरी साधक (Job Seeker) या लिंकवर क्लिक करावे. नोकरी उत्सुक उमेदवारांनी आपल्या युजरनेम पासवर्डचा वापर करुन लॉगीन बटणावर क्लिक करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून Filter या बटणावर क्लिक करावे. आपल्याला नांदेड Nanded District Pandit Din Dayal Online Job Fair 1 मेळावा दिसू लागेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणापैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील. दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. सदर संदेश काळजी पूर्वक वाचा I Agree बटणावर क्लिक करावे. आपल्याला रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचेनाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्ये, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसू लागतील. आपल्या शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्ये या नुसार पदाची निवड करावी Apply बटणावर क्लिक करावे. आपल्याला एक संदेश दिसेल. हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओक बटणावर क्लिक केल्यावर रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसू लागेल, अशी माहिती सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी दिली आहे.

00000

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 15 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय,  शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 150 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 13 जून पर्यंत एकुण 4 लाख 63 हजार 721 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 14 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 38 हजार 230 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 41 हजार 940 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 80 हजार 170 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 12 व्यक्ती कोरोना बाधित

दोघांचा मृत्यू तर 37 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 793 अहवालापैकी  12 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे 6 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 917 एवढी झाली असून यातील 87 हजार 997 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 474 रुग्ण उपचार घेत असून 6 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

12 जून रोजी डेल्टा कोविड रुग्णालय नांदेड येथे नंदीग्राम सोसायटी नांदेड येथील 91 वर्षाच्या पुरुषाचा तर 14 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे भोकर तालुक्यातील आमदरी येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 899 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 6 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा 1, माहूर तालुक्यात 3, हदगाव 1, कंधार 1 असे एकूण 12 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 37 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3, हदगाव कोविड रुग्णालय 2, बिलोली तालुक्यांतर्गत 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, किनवट कोविड रुग्णालय 3, अर्धापूर तालुक्यांतर्गत 2, माहूर तालुक्यांतर्गत 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 10, देगलूर कोविड रुग्णालय 4 तर खाजगी रुग्णालयातील 6 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. 

आज 474 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  23, लोहा कोविड रुग्णालय 4, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2, किनवट कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 2,   हदगाव कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 322, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 80, खाजगी रुग्णालय 18 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 121, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 131 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 77 हजार 295

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 74 हजार 907

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 917

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 997

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 899

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.78 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-161

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 474

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-6

00000

 

बांबू व रेशीम लागवड कार्यशाळेचे आज आयोजन   

नांदेड (जिमाका) दि. 14 :- बांबू व रेशीम लागवड मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन मंगळवार 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने यांची प्रमुख उपस्थिती राहील. या मार्गदर्शन कार्यशाळेची नोंदणी सकाळी 9.30 ते 10 वाजेपर्यंत होईल. 

या कार्यशाळेत तांत्रिक मार्गदर्शनात माजी आमदार पाशा पटेल हे बांबू लागवडीतून पर्यावरण, जळगावचे बांबू अभ्यासक संदीप माळी हे बांबू रोपवन आणि रोपवाटिका व्यावसायिक संधी, रेशीम संशोधक डॉ. सी. बी. लटपटे हे रेशीम लागवडीतून व्यावसायिक संधी तर लातूरचे संजीव करपे हे बांबू व बांबूपासून इमारत बांधणे व फर्निचर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बांबु व्यवसायाचे फायदे या विषयावर शेतकरी मनोगत व्यक्त करतील तर शेवटी शंकेचे निरसन केले जाणार आहे. 

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत व नवीन किक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. शेतकऱ्यास कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात तीन एकर तुती जोपासता येते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षापर्यंत जिवंत राहत असल्याने दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकाप्रमाणे वारंवार येत नाही. बांबू लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्वाचे घटक आहे. बांबूची शेती, लागवड कशी करावी, बांबू प्रजातीचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटामध्ये दरवर्षी 8 ते 10 नवीन बांबू तयार होत असतात. त्यामुळे बांबू लागवडीचे फायदे व रेशीम लागवड याविषयी मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, उपवनसंरक्षक एम. आर. शेख, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी संयुक्त केले आहे.  

00000

 

जिल्ह्यात गत 24 तासात

सरासरी 33.60 मि. मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात सोमवार 14 जुन 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 33.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 132 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात सोमवार 14 जून रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 16.30 (80.10), बिलोली- 36.50 (144.60), मुखेड- 26.40 (150), कंधार- 23.40 (155.60), लोहा- 24.20 (123), हदगाव-42.40 (119.60), भोकर- 20.00 (101.70), देगलूर- 21.60 (176.70), किनवट- 60.50 (162.90), मुदखेड- 24.40 (89.60), हिमायतनगर-39.80 (128.80), माहूर- 61.60 (163.60), धर्माबाद- 63.90 (163.80), उमरी- 43.90 (110.70), अर्धापूर- 8.10 (90.80), नायगाव- 37.80 (120.80) मिलीमीटर आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...