Thursday, August 6, 2020

वृत्त क्र.  734  

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून

सरकारी सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र चालू ठेवण्यास परवानगी

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोविड-19 च्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंडसंहिता 188 नुसार जिल्ह्यातील विविध आस्थापनांसह सरकारी सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र चालू ठेवण्यास मनाई केलेली होती. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही निर्बंध सुकर करण्यासह नियम व अटींच्या अधिन राहून टाळेबंदीचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत वाढवून मार्गदर्शक सुचना व निर्देश मा. मुख्य सचिव यांनी निर्गमीत केले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात यापूर्वी 19 जुलै रोजी दिलेल्या आदेशातील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीचा कालावधी पुढील आदेशापर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र, सी.एस.सी. केंद्र, महा ई-सेवा केंद्र इत्यादी चालू आहेत. तथापि याठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने नवीन आधार नोंदणी, दुरुस्तीचे कामे बंद होती. आता जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हे केंद्र खालील नमूद अटी व शर्तीच्या आधारे चालू करण्यास परवानगी दिली आहे. यात खालील अटींचा समावेश आहे.

·         नांदेड जिल्ह्यातील चालू असलेल्या व भविष्यात नव्याने निर्माण होणा-या प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) मध्ये आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र चालू ठेवण्यास परवानगी असणार नाही.

·         आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र येथील कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्ड, सॅनिटायझर, कापूस, टिशु पेपर, टिशु पेपरबॅग इ. चा नियमित वापर करावा.

·         बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाज्याचे हॅण्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची इ. चे सातत्याने निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करत रहावे.

·         आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र येथील कर्मचा-यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

·         कर्मचा-यांनी काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.

·         सर्व आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र याठिकाणी येणा-या ग्राहकांना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी ग्राहकांना साबण व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे.

·         बायोमेट्रीक उपकरण निर्जंतुक (सॅनिटाईज) करताना वापरलेला कापसाचा बोळा पेपर कव्हरमध्ये ठेवण्यात यावा आणि तो काळजीपूर्वक व पुरेशी दक्षता घेऊन नष्ट करण्यात यावा.

·         ग्राहकांना त्यांचे नाक व तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधणेबाबत सक्ती करावी तसेच रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील यादृष्टीने मार्कींग करण्यात यावे. ग्राहकांना सामाजिक अंतराचे पालन करणेबाबत वारंवार सूचना द्याव्यात.

·         सर्दी, ताप व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे इ. कोवीड-19 ची लक्षणे असलेल्या कर्मचा-यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात यावे.

·         आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र उपलब्ध सेवा व त्या सेवांचे दरपत्रक असलेला फलक प्रदर्शित करावा.

·         युआयडीएआय (UIDAI) कडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

·         आधार कॅम्प तसेच कोणत्याही प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करण्यात येऊ नये.

·         आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र यांनी एका वेळेस जास्तीत जास्त तीन/चार ग्राहकांना काउंटरसमोरील रांगेत उभे राहण्याची परवानगी द्यावी. व रांगेतील ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना रांगेत उभे राहण्यास परवानगी देऊ नये. यासाठी आवश्यतेनुसार ग्राहकांना टोकनचे वाटप करण्यात यावे. गर्दी होणार नाही यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी.

·         65 वर्षांवरील नागरिक व 10 वर्षांखालील मुले, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला यांनी घरीच राहणे आवश्यक असल्याने त्यांना आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र याठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यास मनाई असेल.

·         तसेच या कार्यालयाचे संदर्भिय आदेशानुसार देण्‍यात आलेल्‍या निर्देशाचे/सूचनाचे पालन करणे बंधनकारक राहील.

    या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंडसंहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

000000


कोरोनातून आज 83 व्यक्ती बरे 

जिल्ह्यात 168 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू 

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  जिल्ह्यात आज  6 ऑगस्ट रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 83  व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 168 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 521 अहवालापैकी 316 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 2 हजार 860 एवढी झाली असून यातील 1 हजार 215 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 523 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 65बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

 

बुधवार 5 ऑगस्ट रोजी गोकूळनगर नांदेड येथील 64 वर्षाची एक पुरुष, देगलूर येथील 70 वर्षाचा एक पुरुष, चिखलवाडी नांदेड येथील 74 वर्षाचा एक पुरुष, दापका राजा मुखेड येथील 80 वर्षाची एक महिला, मुखेड येथील 74 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथे तर मकबुलनगर नांदेड येथील 65 वर्षाची एक महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 109 एवढी झाली आहे.  

 

 

आज बरे झालेल्या 83 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 1, कंधार कोविड केअर सेंटर येथील 7,  देगलूर कोविड केअर सेंटर येथील 15, भोकर कोविड सेंटर येथील 1, खाजगी रुग्णालय 29, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 10, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील 3, नांदेड पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 14, बिलोली कोविड सेंटर येथील 02, औरंगाबाद येथील संदर्भित 1 असे एकूण 83 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 

 

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र 43, अर्धापूर तालुक्यात 4, देगलूर तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 21, परभणी 2, नांदेड ग्रामीण 4, भोकर तालुक्यात 5, धर्माबाद तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 4, उदगीर 1, यवतमाळ जिल्हा 2 असे एकूण 93 बाधित आढळले.

 

अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 55, बिलोली तालुक्यात  1, हदगाव तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 1, अर्धापूर तालुक्यात 6, देगलूर तालुक्यात 8, कंधार तालुक्यात 1, माहूर तालुक्यात 1 असे 75 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 523 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 152, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 529, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 44, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 81, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 35, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 123, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 101, लोहा कोविड केअर सेंटर येथे 7, हदगाव कोविड केअर सेंटर 67, भोकर कोविड केअर सेंटर 3, उमरी कोविड केअर सेंटर 14, कंधार कोविड केअर सेंटर येथे 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 29, किनवट कोविड केअर सेंटर येथे 29, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 18, मुदखेड कोविड केअर सेटर 15, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 10, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 19, बारड कोविड केअर सेंटर 3, महसूल भवन कोविड केअर सेंटर 49, खाजगी रुग्णालयात 152, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 2 बाधित, हैदराबाद येथे 1 तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

 

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 689,

घेतलेले स्वॅब- 19 हजार 459,

निगेटिव्ह स्वॅब- 14 हजार 780,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 168,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 860,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 10,

मृत्यू संख्या- 109,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 215,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 523,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 635. 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 65

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000


वृत्त क्र. 732   

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे

कामकाज दोन दिवस बंद  

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पुढील 2 दिवस म्हणजेच 6 व 7 ऑगस्ट 2020 रोजी  बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व वाहनचालक-मालक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. 

 

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयालयाचे तीन कर्मचारी कोव्हीड-19 विषाणु चाचणीमध्ये संक्रमित झाल्याचे आढळून आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा परिसर सॅनिटायझेशन करणे आदी बाबींसाठी हे कार्यालय दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

0000

 इंटरनेट ऑफ थींगस विषयाचे

ऑनलाईन शिबिर संपन्न

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- शासकीय तंत्रनिकेतनच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत इंटरनेट ऑफ थींगस या विषयावर एफडीपीचे दोन दिवशीय ऑनलाईन शिबिर नुकतेच संपन्न झाले. मुंबई तंत्रशिक्षण संचालनालयाने हा कार्यक्रम प्रमाणित केला होता.  

 

राज्यातील  विविध तंत्रनिकेतनमधील अधिव्याख्यात्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी प्रमुख एस. एन. ढोले, अधिव्याख्याता के. व्ही. देवकर, मोसीन शेख, श्रीमती एस.आर.शामराज यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.

 

या कार्यक्रमात श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. एम. व्ही. वैद्य, पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेजचे डॉ. पी. एन. महाले व शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. जी.व्ही. गर्जे यांचा सहभाग होता.

00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...