वृत्त क्रमांक 478
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत मुल्य साखळी भागीदार निवड प्रक्रिया
शेतकरी उत्पादक कंपन्यांना 9 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदत
नांदेड दि. 6 मे :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26 अभियानांतर्गत सोयाबीन, करडई व सूर्यफूल या पिकासाठी नांदेड जिल्हयाची निवड करण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये पिकनिहाय मुल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात येणार आहे. निकष पुर्ण करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी परीपुर्ण प्रस्ताव आपल्या संबंधित तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे शुक्रवार 9 मे 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत जिल्हा तेलबिया समितीने निवड केलेल्या मुल्य साखळी भागीदार यांच्यामार्फत शेतकरी प्रशिक्षण, प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी शेतीशाळा आदी घटक राबवायचे आहेत. याबाबतचे निकष पुढीलप्रमाणे असून नांदेड जिल्ह्यात पिकनिहाय मुल्य साखळी भागीदार म्हणुन शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत.
पात्रता निकष
कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोदणी केलेली असावी. ज्या तालुक्यात समुह तयार झाला आहे तेथे काम करण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा म्हणजेच नोंदणी मार्च 2022 पुर्वीची असावी. किमान 200 शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये (FPC) नोंदणीकृत असावी. मागील 3 वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल 9 लाख रुपया पेक्षा जास्त असावी. शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) मध्ये शेतकऱ्यांचा किमान 3 लाख रुपयांचा समभाग असावा. सरकारकडून अनुदान प्राप्तकर्त्या शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाईल, असे प्रसिद्धी पत्रकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी स्पष्ट केले आहे.
0000