वृत्त क्रमांक 474
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कंधार व मुखेड येथे वसतीगृह सुरु
ऑफलाईन अर्ज प्राप्त करुन घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 6 मे :- सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते पदवी, पदवीव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वसतिगृह प्रवेश ऑफलाईन अर्ज वाटप करण्यास सुरवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थी व पालकांनी संबंधित गृहपालांशी संपर्क साधून ऑफलाईन अर्ज प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय 10 जानेवारी 2024 अन्वये ऊसतोड कामगारांच्या मुलां-मुलींसाठी नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील 62 संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतीगृह सुरु करणेबाबत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील कंधार व मुखेड या दोन तालुक्यातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 100 मुलांच्या क्षमतेची वसतीगृह सुरु करण्यात आली आहेत.
विद्यार्थी व पालकांनी अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, कंधार साठी व्ही.एम. चपलवार यांचा मो. क्रमांक 7744946836 व संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, मुखेड या वसतीगृहासाठी पी.एन पल्लेवाड यांचा मो. क्र. 8390474908 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
0000
No comments:
Post a Comment