वृत्त क्रमांक 477
अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास 20 मे 2025 पर्यत मुदतवाढ
नांदेड दि. 6 मे :- अनुसूचित जाती , नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज स्विकारण्याची यापूर्वी अंतिम मुदत 30 एप्रिल 2025 दिली होती. त्याअनुषंगाने या जाहिरातीस आता अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदतवाढ 20 मे 2025 दिली आहे.
तरी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज तात्काळ आयुक्त, समाज कल्याण आायुक्तालय, 3, चर्चपथ, पुणे-01 याचेस्तरावर अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment