Monday, April 10, 2023

 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी

पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता

 

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 12 एप्रिल 2023 या दिवसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 12 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

0000

 जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी

बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि.10 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने बुधवार 12 एप्रिल 2023  रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कैलास नगर, नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपनीच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462) -251674 किंवा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

0000

 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना

सेवायोजन प्रमाणपत्र अद्यावत करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 10 :- शासनाच्या पूर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोकरी इच्छूक सुशिक्षित बेरोजगारांनी नाव नोंदणी केली आहे. त्या उमेदवारांनी नाव नोंदणीला आधार कार्ड लिंक करुन घ्यावेत.

उमेदवारांनी आपले नाव नोंदणीला आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी लिंक करुन माहीत अद्यावत करावी. त्यामुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत घेण्यात येणारे रोजगार मेळावे, दिले जाणारे प्रशिक्षण याचा लाभ उमेदवारांना घेता येईल. उमेदवारांना माहिती अद्यावत करताना अडचण भासल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

0000

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी

21 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्हयातील युवकयुवती तसेच नोंदणीकृत संस्थाकडून जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या चार वर्षांच्या कालावधीतील प्रतिवर्षं प्रमाणे हे अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील युवकयुवती व नोंदणीकृत संस्थानी युवा पुरस्कारासाठी शुक्रवार 21 एप्रिल 2023 पर्यत अर्ज करावेतअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

 

राज्याचे युवा धोरण सन 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने शासन निर्णय 12 नोव्हेंबर 2013 निर्गमित आहे. त्याअन्वये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक-युवतींना व नोंदणीकृत संस्थानी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावेयासाठी युवा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

00000

 फुले शाहू आंबेडकरी जलसा कार्यक्रमास आजपासून प्रारंभ 

§  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजन

§  शाहिर सीमा पाटील, नागसेन सवदेकर, डॉ. मधुकर मेश्राम फुले शाहू आंबेडकरी गीते व गझल सादर करतील

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ 11 एप्रिल 2023 पासून  होणार असून या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाचे आयोजन 11 ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023 या कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार अशोक चव्हाण, आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पवार जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

या महोत्सवात मंगळवार 11 एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत तक्षशीला बुद्धविहार मैदानभगीरथ नगर, जंगमवाडी नांदेड येथे महात्मा फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर  शाहिर सीमा पाटीलनागसेन सवदेकरडॉ. मधुकर मेश्राम व सहकलाकार फुले शाहू आंबेडकरी  गीते व गझल सादर करतील. या जलसामध्ये प्रबोधनात्मक फुले शाहू आंबेडकरी  गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

 

बुधवार 12 एप्रिल 2023 रोजी सुप्रसिद्ध गायक मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवेचंद्रकांत प्रल्हाद शिंदेकुणाल वराळेगौरव जाधवहे आंबेडकरी जलसा सादर करतील. शाहिर  संतोष साळुंखे व सहकलाकार राजर्षी शाहू  महाराज यांच्यावर आधारित  जोशपूर्ण  शाहिरी पोवाडा सादर करतील.

 

गुरुवार 13 एप्रिल 2023 रोजी  सुप्रसिद्ध शाहीर मीरा उपममहाराष्ट्राचा महागायक अभिजीत कोसंबीप्रसेनजित कोसंबीसत्यजित कोसंबी व सहकलाकार  फुले शाहू आंबेडकरी गीतांच्या  गायनाने या जलसाची सांगता होणार आहे.

 

या फुले-शाहू-आंबेडकरी जलसामध्ये सहभागी कलाकारांचापुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या परिसंवादाचा तसेच  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकाराच्या कलापथकाचाशाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचा नांदेडच्या कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावाअसे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य  बिभीषण चवरे यांनी केले आहे.

0000

 भूमिअभिलेख विभागाने साध्य केलेल्या तंत्रकुशलतेबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केला गौरव

▪️भूमापन दिन उत्साहात साजरा
नांदेड (जिमाका), दि. 10 : जगातले सर्वांत उंच शिखर म्हणून आपण ज्याकडे पाहतो त्या माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची सर्वप्रथम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोजल्यामुळे त्यांच्या नावाने हे शिखर ओळखल्या गेले. भूमापन व त्यातील नोंदी या एवढ्या महत्त्वपूर्ण असतात. याकडे केवळ सात-बारा, जमिनीच्या हद्दी नोंदविणारी यंत्रणा म्हणून पाहता येणार नाही. कधी काळच्या लोखंडी गजापासून सुरू झालेली भूमापनाची पद्धत आता रोवर्स आणि ड्रोन पर्यंत येऊन ठेपली आहे. भूमीअभिलेख विभागाने अलिकडच्या काही वर्षात ही अतीउच्च तंत्रकुशलता साध्य करून ग्रामपातळीवर त्याची उपलब्धी करून देण्यात मोलाचे यश संपादन केले आहे, असे गौरोद्गगार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज भूमिअभिलेख विभागामार्फत आयोजित केलेल्या भूमापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चिखली खु. येथील सरपंच राधाबाई भारती, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उपसरपंच प्रदिप मुळे आदी उपस्थित होते.
आजवरची सर्व युद्ध ही जमिनीसाठी झाली, असा इतिहास सांगतो. भावकिच्या धुऱ्यापासून ते गावाच्या सिमेपर्यंत जमिनीचे अचूक मोजमाप हे अत्यावश्यक असते. हे काम आव्हानात्मक जरी असले तरी तितकेच गरजेचे असून याला आता कालमर्यादाचे बंधनही आले आहे. एकाबाजुला वाढती लोकसंख्या तर दुसऱ्या बाजुला जमिनीचे होत जाणारे लहान-लहान तुकडे आणि त्याच्या मालकीसाठी होणारे संघर्ष लक्षात घेता भूमिअभिलेख अर्थात भूमापन किती महत्त्वाचे आहे ते लक्षात येईल. लोकाभिमूख सेवा देतांना ती अचूक व तात्काळ कशा पद्धतीने पुरवितो हेही महत्त्वाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भूमापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी जमिनीतील फेरफार, कायदे व सेवापूर्तता याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी आपल्य प्रास्ताविकात भूमापन इतिहासाचा आढावा घेत नांदेड जिल्ह्याच्या भूमिअभिलेख कामाची माहिती दिली. सद्यस्थितीत एकुण 30 रोवर्स कार्यालयाकडे उपलब्ध असून जीपीएस आधारे भूमापनाची गती व अचूकता वाढल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात लवकरच ई-मोजणीसाठी नागरिकांना आपल्या मोबाईलवरून अर्ज करता येण्याबरोबर त्यांना नकाशाही ऑनलाईन पाठवता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी चिखली खु. गावातील प्रातिनिधीक गावकऱ्यांना जमीन मालकीचे क पत्रक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याचबरोबर भूमापनबाबत जुन्या साहित्यांपासून रोवर्स पर्यंत सर्व साहित्यांची मांडणी करून त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.
00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...