भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 23 : - शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये इयत्ता 11 वी, 12 वी, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यास क्रमास प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील प्रवेशीत, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. भरलेल्या अर्जाची छायाकिंत प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह आपल्या महाविद्यालयात सादर करावी असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित/विना अनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयीन सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे नवीन व नुतनीकरणासाठी अर्ज करण्यास ऑनलाईन महाडिबीटी पोर्टलवर 11 ऑक्टोबरपासून सुरु झालेले आहे. असे समाज कल्याण विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000