Friday, November 18, 2022

 प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत

स्कूल बस तपासणी मोहिम

नांदेड (जिमाका) दि. 18 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत स्कूलबस तपासणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत तांत्रिकदृष्टया दोषी असणारे शालेय वाहनावर तसेच  क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व शाळांच्या व्यवस्थापक/मुख्यध्यापक यांनी त्यांच्या शाळेत येणारी स्कूल बस यांची कागदपत्रे वैधतेबाबत शहानिशा करावीअसे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

14 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत या कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत एकूण 119 विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 53 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सर्व स्कूलबस चालक मालक यांनी त्यांच्या वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे वाहना सोबत ठेवावी. तसेच वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त  सुस्थितीत ठेवावे. वाहनांचे कागदपत्र वैध नसल्यास त्यांनी सर्व कागदपत्र वैध करुन घ्यावीत. पालकांना सूचित करण्यात येत की त्यांनी त्यांचे पाल्य शाळेस जात असलेली वाहनाची कागदपत्रांच्या वैधते बाबत खात्री करावी. तसेच वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही प्रादेशिक परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

00000

 जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव

1 डिसेंबर पर्यंत सादर करावेत

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- आयुक्त समा कल्याण पुणे  डॉबाबासाहेब आंबेडकर संशोधन  प्रशिक्षण संस्था (बार्टीपुणे यांचे संयुक्त विद्यमाने मंडणगड पॅटर्नप्रमाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांनी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहेज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन प्रस्ताव सादर केलेले नाहीअशा विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत प्रस्ताव www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गुरुवार 1 डिसेंबर 2022 पर्यंत जमा करावेतअसे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले व उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांनी केले आहे.

 

जिल्हयातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनु.जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग  विशेष मागास प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. या प्रवर्गातील 11 वी  12 वी विज्ञान  व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहीतत्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात

 

जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विदयार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नयेयासाठी विहित वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.  ज्या मागासवर्गीय विदयार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी समितीकडे अर्ज सादर केलेले नाहीतत्यांनी ज्या जिल्हयातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहेत्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करण्यासाठी परिपूर्ण अर्ज भरुन त्यांची एक प्रत  त्यासोबत आवश्यक ते संपूर्ण छायाकिंत साक्षाकिंत प्रती जोडून आपले महाविद्यालयाच्या स्थापन केलेल्या समान संधी केंद्राकडे जमा करावेत, असे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांनी कळविले आहे.

00000

 वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर

आल्याचे आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा

  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी 1 नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत  अवकाशात 10 बलून फ्लाईटस  सोडण्यात येत आहेत. या बलूनमध्ये वैज्ञानिक उपकरणे असून ठराविक कालावधीनंतर वैज्ञानिक उपकरणे  मोठ्या रंगीत पॅराशुटसह औरंगाबादबीडनांदेडउस्मानाबादपरभणीसांगलीसातारा,अहमदनगरवर्धाचंद्रपूरगडचिरोलीनागपुरजळगाव आणि सोलापूर जिल्ह्याच्या स्थलसिमा हद्दित जमिनीवर खाली येण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींना ही उपकरणे दृष्टीस पडतील त्यांनी या उपकरणांना स्पर्श करू नये ‍किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. अशी उपकरणे आढळून आल्यास नजिकच्या पोलीस स्टेशनपोस्ट ऑफीसस्थानिक प्रशासन  किंवा  जिल्हा प्रशासनास संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बलून फॅसिलिटीमधून फुगे सोडले जात आहेत.  हे फुगे पातळ (पॉलीथिलीन) प्लास्टिक फिल्म्सपासून बनवलेले असून 50 मीटर ते 85 मीटर व्यासाचे असतात. ते हायड्रोजन वायुने भरलेले असतात. संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे वाहून नेणारे फुगेहाती घेतलेल्या प्रयोगानुसार 30 किमी ते 42 किमी दरम्यान उंची गाठतील अशी अपेक्षा आहे.  काही तासांच्या कालावधीनंतर ही उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशूटसह जमिनीवर खाली येतात. सुमारे 20 ते 40 मीटर लांबीच्या एका लांब दोरीवर त्याच्या खाली लटकलेली उपकरणे असलेले पॅराशूट साधारणपणे हळूहळू जमिनीवर येतात.  ही उपकरणे हैद्राबादपासून सुमारे 200 ते 350 किमी अंतरावर असलेल्या बिंदुवर उतरू शकतात. विशाखापट्टणम-हैदराबाद-सोलापूर मार्गावर आंध्रप्रदेशउत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये हे बलून वाहतील.

 

वैज्ञानिक संशोधनासाठी ठेवण्यात आलेली उपकरणे अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यांच्याशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होईल. त्यातील काही उपकरणांवर उच्च व्होल्टेज असू शकतात ती उघडण्याचा अथवा हाताळण्याचा प्रयत्न केल्यास धोकादायक ठरू शकतात. ही उपकरणे जमिनीवर खाली आल्याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयोग करणारे शास्त्रज्ञ उपकरणे गोळा करतील आणि शोधकर्त्याला योग्य बक्षीस देतील. यासोबत टेलिग्राम पाठवणेदूरध्वनी करणेमाहिती पोहोचवण्यासाठी प्रवास करणे इत्यादी सर्व वाजवी खर्च देतील. मात्र उपकरणासोबत कोणतीही छेडछाड केल्याचे आढळून आल्यास कोणतेही बक्षीस दिले जाणार नाही. नांदेड जिल्हा स्थलसिमा हद्दित ही उपकरणे ज्यांना आढळून येतील त्यांनी त्वरीत जवळचे पोलीस स्टेशनपोस्ट ऑफीसस्थानिक प्रशासनजिल्हा प्रशासनाशी संपर्क साधुन माहिती द्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

0000

 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचे निर्देश   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- भारतीय संविधानाची नागरिकांना माहिती असावी व त्यासंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी हा दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी  दिले आहेत. 

या दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी करण्यात यावे. तसेच वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात. विद्यापीठामधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रभात फेऱ्यांचे आयोजन करावे. संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरण्यात यावे. शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून कार्यक्रमाचे आयोजन सर्व विभाग प्रमुखांनी करावे, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.

0000

 मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा योजनेत

प्रस्ताव करण्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 

नांदेड, (जिमाका) दि. 18 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी शासनाच्यावतीने योजना सुरु करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रस्ताव सादर करण्यासाठी शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी पात्र बचतगटांनी दिलेल्या मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...