प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत
स्कूल बस तपासणी मोहिम
नांदेड (जिमाका) दि. 18 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत स्कूलबस तपासणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत तांत्रिकदृष्टया दोषी असणारे शालेय वाहनावर तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व शाळांच्या व्यवस्थापक/मुख्यध्यापक यांनी त्यांच्या शाळेत येणारी स्कूल बस यांची कागदपत्रे वैधतेबाबत शहानिशा करावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
14 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत या कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत एकूण 119 विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 53 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सर्व स्कूलबस चालक / मालक यांनी त्यांच्या वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे वाहना सोबत ठेवावीत. तसेच वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत ठेवावे. वाहनांचे कागदपत्र वैध नसल्यास त्यांनी सर्व कागदपत्र वैध करुन घ्यावीत. पालकांना सूचित करण्यात येत की त्यांनी त्यांचे पाल्य शाळेस जात असलेली वाहनाची कागदपत्रांच्या वैधते बाबत खात्री करावी. तसेच वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही प्रादेशिक परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment