दुष्काळाची
समस्या सोडविण्यासाठी
एकत्र येऊन
मदतीचा दिलासा देऊ या
-
पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि.
26 :- मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मराठवाड्याच्या
हितासाठी प्रयत्न करुन जनतेला मदतीचा दिलासा देऊ या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण
मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
भारतीय
प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री कदम
यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा
परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शिलाताई भवरे, आमदार अमर राजूरकर, आमदार डी.
पी. सावंत, आमदार
अमिताताई चव्हाण, आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे,
पोलीस अधीक्षक संजय
जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक
काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी
खुशालसिंह
परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर आदी मान्यवर पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, नागरिक उपस्थित
होते.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
देवून पालकमंत्री श्री कदम म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या
घटनेमुळे आपल्या सर्वांना जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले, हे विसरुन चालणार नाही.
महामानवाचे समाजावर अनंत उपकार आहेत अशी आठवण करुन देत ज्यांनी-ज्यांनी आम्हाला
स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या या आठवणीबरोबर त्यांना दु:ख होईल असे काम
आपल्या हातून होणार नाही याची दक्षता प्रत्येकांनी घेतली पाहिजे. आपण एकमेंकापासून
विखुरले जाऊ नये, त्यावेळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत होते पोटाला
जातीचे कव्हर लावू नका, जे पोट खाली आहे, रिकामे आहे ते कुठल्याही जाती, धर्माचे
असो ते पोट भरले पाहिजे. तीच भावना सरकारची आहे. आम्ही सर्वजण एक आहोत हे
राष्ट्रीय सणातील घोषणेपुरते मर्यादीत न राहता खऱ्या अर्थाने आपण एका कुटुंबातील,
एका रक्ताचे, भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणं गरजेचे आहे, असे
त्यांनी सांगितले.

श्री. कदम पुढे म्हणाले, देशात आपण महात्मा
गांधीजींची 150 वी जयंती साजरी करणार आहोत. महात्मा गांधी जेंव्हा बॅरीस्टर होऊन
आले तेंव्हा ते सुटा-बुटात होते. पण ग्रामीण भागातील गरिबी त्यांनी पाहिली तेंव्हा
माझ्या देशातील शेवटच्या माणसाच्या अंगावर कपडा येणार नाही तोपर्यंत मी कपडे
घालणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. त्यांच्या या संदेशातून वंचितांचा आपण
विचार करणे आवश्यक आहे. समाजात कुठलाही भेद-भाव न मानता सर्वांना समान जगण्याचा
अधिकार आहेत. या सगळ्याचं आत्मपरिक्षण आपण केले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर आज देखील
समस्या दिसत आहेत. यात मराठवाड्यातील दुष्काळ, सिमेवरील शहीद जवान, बेळगाव भागात संयुक्त
महाराष्ट्राचा लढा सुरु आहे. यासाठी सर्वजण एक होऊन प्रश्न सोडविणे आवश्यक आहे, असे
नमूद करुन पालकमंत्री श्री कदम यांनी सुरुवातील
छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू
महाराज, महात्मा जोतिबा फुले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करुन
शुभेच्छा संदेश दिला.

यावेळी पालकमंत्री
ना. कदम यांच्या हस्ते जानापूरी येथील शहीद जवानांच्या वीरपत्नी श्रीमती शितल
संभाजी कदम यांना लोहा तालुक्यातील खरबी येथील 2 हेक्टर जमिनीचा जिल्हाधिकारी
यांचा आदेश सन्मानपूर्वक देण्यात आला. यावेळी शहीद
संभाजी कदम यांचे वडील यशवंत कदम होते. पालकमंत्री ना. कदम यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांची भेट घेवून संवाद
साधला तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशीही हितगुज केली.
याप्रसंगी
केंद्रीय राखीव पोलीस बल मुदखेड, राज्य राखीव पोलीस बल हिंगोली, सशस्त्र पोलीस पथक
(क्युआरटी) नांदेड, सशस्त्र पोलीस पथक (पोलीस मुख्यालय), सशस्त्र पोलीस पथक नांदेड
शहर व भोकर विभाग, पुरुष गृहरक्षक दल पथक, शहर वाहतूक शाखा पथक नांदेड, महिला
गृहरक्षक दल पथक, अग्निशमन दल पथक (म.न.पा), एनसीसी मुलांचे पथक (सायन्स
महाविद्यालय) , महात्मा फुले हायस्कूल स्काऊट मुले पथक, चक्रवर्ती अशोक विद्यालय
पळसा पथक, श्री दत्त हायस्कूल तळणी पथक, पोलीस बँड पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक व
नाशक पथक, मार्क्स मॅन क्यूआरटी, वज्र वाहन (दंगा नियंत्रण), बुलेट रायडर, मिनी
रेस्क्यू फायर टेंडर, 108 रुग्णवाहिका यांनी संचलन केले. तर महानगरपालिका स्वच्छ
भारत मिशन शहरी व पंतप्रधान आवास योजना, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आयुष्यमान
भारत, जलयुक्त शिवार अभियान, वन विभागाचा पर्यावरणाचा समतोल, सामाजिक वृक्ष लागवड,
बेटी बचाव बेटी पढावो, मतदार जनजागृती, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा चित्ररथही
संचलनात सहभागी झाला होता. पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते संचलनात उत्कृष्ट
कार्य केल्याबद्दल परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक अश्विनी शेंडगे यांचा सत्कार
करण्यात आला.

राजस्थानी
एज्युकेशन सोसायटीचे आर. आर. मालपाणी मतीमंद विद्यालयाचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा
व सचिव प्रकाश मालपाणी यांना दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार, पोतदार इंटरनॅशनल
स्कूलचा श्रेयस इंगोले याची परीक्षा पे चर्चा-2 स्पर्धेत निवड झाली असून
प्रधानमंत्री यांच्या हस्ते 29 जानेवारी रोजी देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल, निवासी
उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना सायकलिंगमध्ये 15 तासात 300 किमी अंतर पूर्ण
केल्याबद्दल तर नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांना राज्यस्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत
दुसरे पारितोषिके मिळाल्याने सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस महासंचालकांचे प्रशस्तीपत्र
व सन्मानचिन्ह पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, प्रदीप काकडे, सहायक पोलीस निरीक्षक
पांडुरंग भारती, पोलीस शिपाई महेश बडगु, राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत कास्य
पदक प्राप्त पो. कॉ. सुप्रीया गोडबोले, दिपाली शिंदे, लक्ष्मण फुलारी, राष्ट्रीय
जलतरण स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अंजना शिंदे, टूर दि फ्रान्सची बीआरएम
सायकलिंग स्पर्धेत 35 तास 37 मिनिटात 600 किमी अंतर पूर्ण केल्याबद्दल संतोष व
साईनाथ सोनसळे, अतिउत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाचे शल्यचिकित्सा शास्त्रामध्ये डॉ. जी. एल. अनमोड, वैद्यकीय अधिक्षक
रुग्णालयात प्रशासनामध्ये डॉ. वाय. एच. चव्हाण, अधिसेविका नर्सिग सेवेत सौ. कमल
वाडकर, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, मुखेड तालुक्यातील सलगरा येथील बहुजन हिताय
सेवाभावी संस्थेचे दत्ता चापलकर यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात
आले.

यावेळी जिल्हा
क्रीडा कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कवायती केल्या. यात सर्व
शाळेचे एक हजार मुले-मुली, खेळाडूने मासपीटी (उभी व बैठी) तर खालसा हायस्कुल-
गदका, गुजराथी हायस्कूल- गरबा, प्रतिभा निकेतन हायस्कुल- डंबेल्स, महात्मा फुले
हायस्कुल विजयनगर व बाबानगर, नागसेन हायस्कुल, सावित्रीबाई फुले विद्यालय यांनी लेझीम
पथकांनी नागरिकांची मने वेधून घेतली. सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी
शिंदे यांनी केले. या समारंभास शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनी, कर्मचारी व
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000