वृत्त क्रमांक 839
शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी
पोर्टल सुरू
· समाज कल्याण कार्यालयामार्फत
महाविद्यालय प्राचार्यांना आढावा बैठक संपन्न
नांदेड दि. 12 ऑगस्ट :- जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत,
कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील सन 2025-26
या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी MAHADBT
पोर्टल 30 जून 2025 पासून सुरु झाले आहे,
असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद
मिनगिरे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण
सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर
शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक
पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता
शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजना या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य
अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत
महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आढावा बैठक नुकतीच 11 ऑगस्ट रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड
येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्ह्यातील
महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी उपस्थित होते.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील काही महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्जाबाबत तात्काळ कार्यवाही करावी असे
निर्देश यावेळी देण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्गातील
विद्यार्थ्यांमध्ये योजनांबाबत जनजागृती करावी. बैठकीत भारत
सरकार शिष्यवृत्ती योजनेचे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील
महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढणे. स्वाधार
योजनेच्या बाबतीत विद्यार्थ्यांची उपस्थित तपासून सादर करणे. महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर स्वाधार व भा.स.शी.बाबत नोटीस लावणे.
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल त्वरीत
सादर करणे. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता
शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याबाबत सूचना
देण्यात आल्या.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)



.jpeg)

.jpeg)


.jpeg)



.jpeg)
