Friday, January 29, 2021

 

 शिष्यवृत्तीचे ऑनलाईन

अर्ज भरण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 29 :-सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृती व शिक्षण फी परीक्षा फी तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी MAHADBT पोर्टल सुरु झाले आहे. 

जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज त्वरीत व्यवस्थीत भरावेत. तसेच सन 2019-20 या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना Re-apply पर्याय आलेला असेल त्यांनी पुन्हा अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

00000

 

47 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- शुक्रवार 29 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 47  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 33 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 14 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 550 अहवालापैकी 1 हजार 480 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 463 एवढी झाली असून यातील 21 हजार 354 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 321 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवार 29 जानेवारीला सन्मित्रनगर नांदेड येथील 48 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 585 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 30, हदगाव कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 7 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 18, अर्धापूर तालुक्यात 2, लोहा 3, मुखेड 2, उमरखेड 1, नांदेड ग्रामीण 2, कंधार 3, मुदखेड 1, उमरी 1 असे एकुण 33 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, माहूर तालुक्यात 1, भोकर 1, देगलूर 4, किनवट 2, उमरखेड 1 असे एकूण 14 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 321 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 7, मुखेड कोविड रुग्णालय 9, महसूल कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 198, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 45, खाजगी रुग्णालय 11 आहेत.   

शुक्रवार 29 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 166, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 90 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 9 हजार 42

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 82 हजार 259

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 463

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 354

एकुण मृत्यू संख्या-585

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-23

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-397

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-321

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.          

00000

 

वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रिफ्लेकटर लावणे आवश्यक

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकटर तसेच पाठीमागे फ्लोरेसेंट लाल रंगाचा कपडा बांधणे आवश्यक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते. अपघात होऊ नये यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांत अधिक ऊस भरणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालविणे या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. साखर कारखान्यांना ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्या चालकांसाठी रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना येथे 28 जानेवारीला संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.    

जिल्ह्यात रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने  "32 वे रस्ता सुरक्षा अभियान 2021" हे 18 जानेवारी  ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. रस्ते वाहतुक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, महामार्ग पोलीस निरीक्षक अब्दुल रहेमान, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर व बारड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक नांदगावकर आदी यावेळी उपस्थिती होती. 

याप्रसंगी कारखान्याच्या परिसरातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकटर लावण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. पाटील यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी शिवाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्य लिपीक राजेश गाजूलवाड, शेतकी अधिकारी श्री. गाडेगावकर यांनी परिश्रम घेतले.

0000





 

दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करावा

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- दुचाकी चालवितांना स्वत:च्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी हेल्मेट वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. दुचाकी स्वारांमध्ये हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हेल्मेट सेल्फी पॉईंटची संकल्पना राबविण्यात येत आहे. यासेल्फी पाँईटचे उद्घाटन  प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. कामत यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.   

रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी  32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021" हे 18 जानेवारी  ते 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत जिल्ह्यातील राबविण्यात येत आहे. रस्ते वाहतुक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याप्रसंगी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले व राहूल जाधव, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, कार्यालयातील कर्मचारी तसेच फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संतोष तेलंग हे उपस्थित होते.

00000





जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे मराठी भाषा पंधरवडा निमित्त ग्रंथप्रदर्शनाला जिल्हा कोषागार अधिकारी अभय चौधरी यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी सहाय्यक कोषागार अधिकारी महेश राजे, समीर पांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आषिश ढोक, प्रताप सुर्यवंशी उपस्थित होते. 






 

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020

प्रवेशिका पाठविण्याकरिता 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 29 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.31 जानेवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि.15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

0000    


    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...