Friday, June 25, 2021

अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

                                  अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

           

नांदेड (जिमाका) दि. 25 :- अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती योजना सन २०२१-२२ लागू आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंतिम दिनांक ३० जून २०२१ रोजीच्या सायंकाळी 5.45 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे,असे आवाहन पुणे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.  

परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करणेसाठी परदेश शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी १२ मे २०२१ च्या जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येत असल्याबाबतची जाहिरात व मुदतवाढ प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १४ जून २०२१ व त्यानंतर १८ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आला होता. आता अर्जकरण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२१ पर्यंत सायंकाळी ५.४५ राहील. उर्वरित जाहिरातीबाबतचा तपशील हा पूर्वी दिलेल्या जाहिराती प्रमाणेच असेलअसेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

जिल्ह्यातील साठवण तलावांची कामे तात्काळ मार्गी लावा - पालकमंत्री अशोक चव्हाण

 जिल्ह्यातील साठवण तलावांची कामे तात्काळ मार्गी लावा -         पालकमंत्री अशोक चव्हाण

           


नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यातील अनेक भागात सिंचनाच्या पर्याप्त सुविधा नसल्याने त्या ठिकाणी कृषी व इतर क्षेत्रासाठी शासनाने भौगोलिक रचनेनुसार शक्य त्या भागात साठवण तलावासाठी मान्यता दिलेली आहे. ही मान्यता देवूनही अनेक प्रकल्प किरकोळ कारणांवरुन मार्गी लागले नाहीत. प्रशासकीय पातळीवर भूसंपादनापासून ज्या कांही अडचणी असतील, त्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करुन साठवण तलावाची कामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभाग प्रमुखांकडून घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीस विधान परिषदेचे सदस्य अमर राजूरकर, महापौर मोहिनी येवणकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार आदि विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.


भोकर तालुक्यातील दिवशी सिंचन तलाव, पाकी काळडोह साठवण तलाव, देगलूर तालुक्यातील येरगी साठवण तलाव, नायगांव तालुक्यातील सोमठाणा साठवण तलाव याबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. दिवशी सिंचन तलावाच्या भूसंपादनाची संयुक्त मोजणी झाली आहे. पाकी काळडोह साठवण तलावाला महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. देगलूर तालुक्यातील येरगी साठवण तलावालाही प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. नायगाव तालुक्यातील सोमठाणा साठवण तलावासाठी लागणाऱ्या 49.81 हेक्टर जमिनीचा अंतिम निवाडा जाहीर झाला आहे. यासर्व प्रकल्पांच्या पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मृद व जलसंधारण विभाग, सिंचन विभाग यांनी परस्पर समन्वयातून तात्काळ कामे मार्गी लावण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले. याचबरोबर इतर प्रकल्पांचाही त्यांनी आढावा घेतला.

मुदखेड शहरातील रेल्वे क्रॉसिंगमुळे उद्भवणाऱ्या अनेक अडचणी व त्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी प्रस्तावित भुयारी मार्ग व त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. मुदखेड शहर वाढत असल्याने रेल्वेच्या दोन्ही बाजू वसलेले शहर सुरक्षित जोडण्यासाठी आता गत्यंतर राहिले नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिने यावर तात्काळ मार्ग काढणे गरजेचे असून येणारे अडथळे समन्वयातून दूर करण्यावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिक भर दिला.

00000

जिल्ह्यातील 95 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

                                          जिल्ह्यातील 95 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 95 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 26 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 12 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालयडॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयशासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालयशहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगरजंगमवाडीदशमेश हॉस्पिटलकौठाश्रावस्तीनगरसिडको व रेल्वे हॉस्पिटल या 12 केंद्रावर कोविशील्डचा 18 ते 44 वयोगट आणि 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालयडॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयशासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयस्त्री रुग्णालयशहरी दवाखाना हैदरबागशिवाजीनगरजंगमवाडीदशमेश हॉस्पिटलकौठाश्रावस्तीनगरसिडकोरेल्वे हॉस्पिटल या 12 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस दिला जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूरहदगावगोकुंदामुखेडग्रामीण रुग्णालय भोकरबिलोलीधर्माबादहिमायतनगरकंधारमांडवीलोहामाहूरमुदखेडबारडनायगावउमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूरहदगावगोकुंदामुखेडग्रामीण रुग्णालय भोकरबिलोलीधर्माबादहिमायतनगरकंधारमांडवीलोहामाहूरमुदखेडबारडनायगावउमरी अशा एकुण 16 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 24 जून पर्यंत एकुण 5 लाख 51 हजार 935 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 25 जून पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 89 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 34 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. तसेच कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित तर 21 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित

तर  21 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 850 अहवालापैकी  8 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 212 एवढी झाली असून यातील 88 हजार 548 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 171 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, लोहा तालुक्यांतर्गत 1उमरी 1तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड 1 ,  असे एकूण 8 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 21 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1,  किनवट कोविड रुग्णालय 1,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, खाजगी रुग्णालय 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 13 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 171 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 27,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  3, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 3,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 53, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 63, खाजगी रुग्णालय 10 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 123 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 98 हजार 468

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 95 हजार 678

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 212

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 548

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 903

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-0

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-101

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-171

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4                      

00000

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

                                                  राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री

जयंत पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे दिनांक 26,27,28 जून2021 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहिल.  

 

सोमवार दि. 28 जून,2021 रोजी सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत  किनवट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. स्थळ : शासकीय विश्रामगृह माहूर. सकाळी 10 वाजता माहूरगड येथून उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण .

00000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...