Saturday, October 26, 2024

 वृत्त क्र. 989

 वृत्त क्र. 988 

मुखेड येथे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले प्रशिक्षण

 

मुखेड दि. 26 ऑक्टोबर : मुखेड येथे आज निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरनिवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटीलसहाय्यक निवडणूक अधिकारी तानाजी चव्हाणराजेश जाधव यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाला 845 मतदान केंद्राध्यक्ष आमंत्रित होते. 794 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक उपस्थित होते.

 

आजच्या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने दिव्यांग व्यक्ती व 85 वयांवरील मतदार यांना पोचपावती देऊन मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले व सूचना करण्यात आल्या.

     

स्वीप उपक्रमांतर्गत शहरातील शाहीर आण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड येथे मतदान जनजागृती बाबत कार्यक्रम घेण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाला उपस्थित रहावेअसे आवाहन यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केले.

000000

 

 वृत्त क्र. 987

हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती 

नांदेडदि. २६ ऑक्टोंबर: - 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील हैदर बाग  परिसरात मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधुमनपाचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी,स्वीप सदस्य प्रा.राजेश कुलकर्णीसंजय भालके व मुकुंद आळसपूरे यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

यावेळी मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधू यांच्या नेतृत्वाखाली प्रथम विद्यार्थ्यांची रँली काढून परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. संपूर्ण हैदर बाग परिसरातील अनेक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा आर.जी.कुलकर्णी यांनी दिली. यानंतर प्रत्यक्ष शाळेत शिक्षक,पालक व जागरुक नागरिकांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. मतदारांना मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी लोकशाहीचा प्राण म्हणजे मतदार व आत्मा म्हणजे मतदान आहे. सर्व पात्र मतदारांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपले मतदान कर्तव्य पूर्ण करावे,असे मत त्यानी व्यक्त  केले.

मनपा शाळा सुध्दा मतदान जनजागृतीमध्ये हिरीरीने भाग घेतात आणि जनजागृती करतात. यास प्रतिसाद देवून स्वीप कक्षाच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा आणि लोकसभा पोट निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत आपल्या मतदानाच्या अधिकाराचा नक्कीच योग्य उपयोग करावा असे प्रतिपादन मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंघ सधू यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजा पटेल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईराज मुदिराज,आशा घुले,संदीप लबडे,संभाजी पोकले,नाजिया तब्बसुम,निखत परविन,महेजबीन बेगम स्वच्छता निरीक्षक झियाउल्ला खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

०००००








  वृत्त क्र. 986

राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

 

नांदेड दिनांक २६ ऑक्टोंबर :- आयुक्तक्रीडा व युवक सेवा संचालनालयपुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयव जिल्हा क्रीडा परिषदनांदेड संयुक्त विद्यमाने व ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 25 ते 27 ऑक्टोंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुलइनडोअर हॉलनांदेड येथे करण्यात आले आहे.  या स्पर्धेचे उदघाटन डॉ. हंसराज वैद्य (अध्यक्षनांदेड जिल्हा वुशू असो.) यांचे अध्यक्षतेखाली व सोपानजी कटके (सचिवऑल महाराष्ट्र वुशू असो.)यांचे हस्ते  आज संपन्न झाला.

 

या कार्यक्रमासाठी श्रीमती अॅड. अर्चना जांभळे (विधी तज्ञ)जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे एपीआय दिगंबर कांबळेक्रीडा अधिकारी लातूर उपसंचालक कार्यालयचे डी.व्ही. गडपल्लेवार राजेश जांभळे (सचिवनांदेड जिल्हा वुशू असो.) श्रीमती प्रतिक्षा शिंदे (शिवछत्रपती पुरस्कारार्थी)सुरज सोनकांबळे (शिवछत्रपती पुरस्कारार्थी)डॉ. पचलिंगे (वैद्यकीय अधिकारी)अविनाश पाटील (जिल्हा सचिव कोल्हापूर)अमित म्हात्रे (जिल्हा सचिवठाणे)दिनेश माळी (जिल्हा सचिवमुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्यातील 08 विभागातून खेळाडू मुले-मुलीनिवडसमिती सदस्यपंचसामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित झालेले आहेत. मुले खेळाडूंची निवास व्यवस्था गुरुग्रंथ साहिब भवनयात्री निवासगुरुद्वारा परिसरनांदेड येथे तर सर्व खेळाडूंची भोजनाची व मुलींची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे.

 

या स्पर्धेकरीता पंच म्हणून अविनाश पाटील (कोल्हापूर)लक्ष्मण उदमले (अहिल्यानगर)महेश इंदापुरे (छ.संभाजीनगर)निलेश राऊत (वर्धा)श्रीमती प्रतिक्षा शिंदे (पुणे)विजय खंडार (अमरावती)प्रफल्ल करंजीकर (पुणे)श्रीमती तृप्ती चांदवडकर (पुणे)अभिषेक सोनवणे (वर्धा)गणेश कुटटे (परभणी)सुरज सोनकांबळे (शिवछत्रपती पुरस्कारार्थीनांदेड)संदिप शेलार (शिवछत्रपती पुरस्कारार्थीमुंबई)अमिर शेख (लातूर)कृष्णा सुरवसे (परभणी)प्रकाश ग्यानोबा वाघमारे (व्य. लिपीक)दिपक बिसेन (नागपूर)बंटी राठोड (छ. संभाजीनगर)गणेश साकुरे (भंडारा)सददा सय्यद (छ. संभाजीनगर)अनिल खराडे (बीड)राज वासवंड (पुणे)अतुल जाधव (जळगांव)प्रणव वाघमारे (नांदेड)अक्षय जांभळे (नांदेड)अजय नवघडे (नांदेड)माधव शेरीकर (सोलापूर)दिनेश सोनवणे (जळगांव)प्रणव विटणकर (वर्धा)रोहीत राऊत (पुणे)सुमित खरात (छ. संभाजीनगर)सौरभ पाटील (कोल्हापूर)पियुष ढोणे (मुंबई शहर)शोऐब शेख (मुंबई शहर)साहिल भंडारी (ठाणे)दिनेश माळी (मुंबई उपनगर)संकेत गायकवाड (पनवेल शहर) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी तथा कार्यासन)क्रीडा अधिकारी संजय बेतीवारराज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकरचंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन)श्रीमती शिवकांता देशमुखवरिष्ठ लिपीक संतोष कनकावारकनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडेव्यवस्थापक संजय चव्हाणआनंद जोंधळेहनमंत नरवाडेआकाश भोरेमोहन पवारसुभाष धोंगडेशेख इकरमविद्यानंद भालेरावचंद्रकांत गव्हाणेसोनबा ओव्हाळयश कांबळे व आर्चरी असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य करीत आहेत.

 

ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉलनांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूक्रीडाप्रेमीरसिक यांनी आनंद घ्यावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

०००००


















  वृत्त क्र. 985

राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक

 

नांदेडदि. 26 :- लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही जाहिरात तयार करतानातसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियासोशल मीडियायावरील पोस्टबल्क एसएमएसरेडिओ जिंगल्स चित्ररथावरील व्हिडिओ थोडक्यात कोणत्याही प्रसिद्धीसाठी परवानगी आवश्यक असून ती घेणे अनिवार्य असल्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

 

जिल्‍ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षउमेदवारव्यक्ती यांनी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर / प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींना जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

 

जाहिरातींमध्ये दूरचित्रवाहिन्याकेबल नेटवर्क/ केबल वाहिन्यांवरचे प्रक्षेपण प्रसारणचित्रपटगृहेरेडिओखाजगी एफएमसार्वजनिक ठिकाणी दृकश्राव्य माध्यमा‌द्वारे (Audio- Video Display) होणारे प्रसारणई-वृत्तपत्रांमधील जाहिरातींचे प्रकाशनबल्क एसएमएस (SMS) / व्हॉईस मॅसेजेस यांचा समावेश होतो. तसेच मुद्रीत माध्यमांमध्ये (Print Media Paper) मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिरातींकरीता देखील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावरील समितीकडे समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मतदारसंघातील व्यक्ती किंवा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक मीडियावर जारी करावयाच्या जाहिरातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे. या समितीकडून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण केले जाते. यासाठी भारत निवडणूक आयोगाने वेगवेगळे अर्ज उपलब्ध केले आहे . ते अर्ज दाखल करून रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे .जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने मान्यता दिल्याशिवाय राजकीय पक्ष / उमेदवारांनी राजकीय जाहिरातीचे प्रसारण करू नये.

 

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नियोजन भवनात माध्‍यम कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या कक्षाच्‍या माध्‍यमातून जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे कार्यवहन केले जात आहे. या समितीत 9 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी व वृत्‍तपत्राचा एक माध्‍यम प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या समितीचे सदस्‍य सचिव म्‍हणून जिल्‍हा माहिती अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम काम पाहतात. लोकसभा पोटनिवडणूक असो वा विधानसभेची निवडणूक दोन्ही निवडणुकीसाठी या संदर्भातील परवानगी घेणे आवश्यक आहे. नुकतीच दोन्ही निवडणूक खर्च निरीक्षकांनी माध्यम कक्षाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

०००००




 वृत्त क्र. 984

मतदान अधिकारीकर्मचाऱ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

८७ नांदेड दक्षिणचे प्रथम प्रशिक्षण संपन्न

 

नांदेड दि. २6 : लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून १६-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व  ८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान अधिकारीकर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

८७-नांदेड दक्षिणच्या प्रथम प्रशिक्षणात ते बोलत होते. ८७ नांदेड दक्षिणच्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्याचे नागार्जुना पब्लिक स्कूलकौठा नांदेड येथे आज प्रथम प्रशिक्षण आयोजित केले होते.

 

मतदान केंद्रावर कार्यरत पोलींग टिमने मतदान सुलभ पध्दतीने घेतल्यास मतदानाची टक्केवारी सुद्धा आपोआपच वाढते. माँक पोल घेतल्यानंतर इव्हिएम मशीन क्लिअर करणे अत्यंत आवश्यक आहेअशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

 

 या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व पहिले मतदान अधिकारी असे एकूण 884 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पिण्याच्या पाण्याची आणि प्रतिक्षालयासह दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहेअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

यावेळी सहा. निवडणूक अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी प्रशिक्षणाची रुपरेषा सांगितली. तहसीलदार प्रविण पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर नितेशकुमार बोलेलू,नायब तहसीलदारसंजय नागमवाडमुख्य प्रशिक्षक संघरत्न सोनसळेप्रशिक्षण टिमचे सदस्य संजय भालकेसुनील दाचावार व प्रा. राजेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

 

यावेळी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीसाठी मतदान यंत्र व व्हिव्हिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मास्टर ट्रेनर म्हणून पि.बी.राऊतएम.जी.कलंबरकर,रायभोळे एम.पी.शिलेदार डि.के. यांनी कार्य केले. 

 

प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळून जोडणी कशी केली जातेकोणकोणत्या समस्या येवू शकतात आणि त्यावर उपाय कोणतायाचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतलेयाच प्रशिक्षणात सर्वांनी इडीसीपि.बी.च्या मदतीने आपल्या मताची नोंद करण्याची सूचना नितेशकुमार बोलेलू यांनी केली. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण सदस्य  आर.जी.कुलकर्णी यांनी केलें. तर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पेशकार राजकुमार कोटुरवाररुस्तुम आडे,संजय भालके,सुनील दाचावारराजेश कुलकर्णीकविता जोशी,सारिका आचमे,हनुमंत राठोड,जमील शेख यांनी परिश्रम घेतले.

०००००







 वृत्त क्र. 983

मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य 12 ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य जिल्हाधिकारी

 

नांदेडदि. 26 : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईलअशी माहितीजिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

 

लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांनी ही माहिती दिली. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र आहेअसे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. मतदार ओळखपत्र नसणाऱ्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

 

यामध्ये आधार कार्डमनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्रबँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुककामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्डवाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)पॅन कार्डराष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्डभारतीय पारपत्र (पासपोर्ट)निवृत्तीवेतनाची दस्तावेजकेंद्र अथवा राज्य शासनतसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमपब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्रसंसदविधानसभाविधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्रभारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

 

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.

०००

 विशेष वृत्त क्र. 982 

ईव्हीएम फोडणेमतदान करतांनाचे व्हिडिओ काढणे महागात

गेल्या लोकसभा निवडणुकीतील 23 गुन्हे न्यायप्रविष्ट

 

• जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा

• सायबर संदर्भातील गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण अधिक

 नागरिकांनी अतिशय सावधतेने समाज माध्यमांवर व्यक्त व्हावे

 

नांदेड दि. 26 ऑक्टोबर :- लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीदरम्यान समाज माध्यमांवर आचारसंहिता भंग होईल अशा पोस्ट करू नका. कारण समाज माध्यमांवरील पोस्ट हा सबळ पुरावा मानल्या जातो. तसेच आचारसंहिता भंग करण्याचे गुन्हे कोणीही गृहित पकडू नयेत. या प्रकरणात शंभर टक्के शिक्षा भोगावी लागते. त्यामुळे या काळात आचारसंहितेचे सक्त पालन करा. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अशा स्वरुपाचे 23 गुन्हे न्यायप्रविष्ट असून या सर्व गुन्ह्यांच्या संदर्भातील आढावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी काल उशिरा घेतला.

 

यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी विशेषत: जिल्ह्यातील तरुणांना आवाहन करताना सोशल मिडियाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. आपले मतदान हेच आपले व्यवस्थे बद्दलचे उत्तम मत आहे. त्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. तथापि अनावधानाने देखील समाज माध्यमांवर आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. समाज माध्यमांवरील चुकीची पोस्ट हा प्रबळ पुरावा ठरतो. त्यामुळे नागरिकांनी अतिशय सावधतेने समाज माध्यमांवर व्यक्त व्हावेअसे आवाहनही जिल्हा व पोलीस प्रशासनाने केले आहे. यावेळी सर्व न्यायप्रविष्ट प्रकरणावर विचार विनिमय करण्यात आला.

 

निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीमध्ये अनेक कायदे बनविले आहेत. कोणतेही बॅनर त्याखाली आकारप्रकाशकमुद्रक याशिवाय न लावण्याचे सूचविले आहे. परवानगी शिवाय उमेदवारांच्या जाहिरातीवर निर्बंध आहेत. सोशल माध्यमांचा गैरवापर करणेचुकीच्या पोस्ट टाकणेजातीवाचक धर्मवादी पोस्ट करणेनिवडणूक साहित्याशी छेडछाड करणेनिवडणूक यंत्रणेला गृहित धरणेमंदिरमशिद व अन्य धार्मिक स्थळांमध्ये सभासंमेलन घेणेकोणाच्याही भिंतीवर काहीही चिटकविणेलावणे मनाई आहे. थोडक्यात या काळामध्ये परवानगी शिवाय काही करता येत नाही. याशिवाय मतदान करतांना व्हिडिओ बनविणेसरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे आचारसंहितेचा भंग ठरतो. 

                         

23 प्रकरणे न्यायप्रविष्ट 

गेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये 29 मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. पंचायत समिती नायगाव येथील एका शासकीय कर्मचाऱ्याने व्हिडिओ बनवून व्हायरला केला होता. दुसरा गुन्हा याच तारखेमध्ये सकनूर आरोपीने बॅनरवर आकारप्रकाशकमुद्रक यांचे नाव लिहिणे आवश्यक असतांना तसे न केल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला होता. लोकसेवक असतांना एका पक्षाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. विनापरवाना पक्षाचे झेंडे लावणेगाडीवर नेत्यांचे फोटो लावणेउमेदवारांचे फोटो लावणे याबाबतही गुन्हे दाखल झाले आहेत.

 

आचारसंहिता काळामध्ये एकाने चक्क डिजे लावून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले होते. शासकीय कर्मचाऱ्यांने देखील या काळात दिलेले कामे वेळेत करणे आवश्यक असते. दुर्लक्ष केल्यामुळे काही गुन्हे गेल्यावेळी दाखल झाले आहेत. सभा संपल्यानंतर पक्षाचे झेंडे न काढणे आयोजकाच्या अंगावर आले होते. या प्रकरणातही गुन्हा दाखल झाला आहे. कोणालाही प्रचारासाठी प्रतिबंध करणे. गावात आलेल्या वाहनाला अडवणेबॅनर फाडणे. धोकादायक असून अशा पद्धतीचे कार्य करणाऱ्या व्यक्तीवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे अशा पद्धतीच्या कृत्यात कोणी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 

निवडणूक कार्याचे आदेश असतांना शासकीय कर्मचाऱ्यानी प्रचाराच्या कामात राहू नये. अशा पद्धतीने प्रचार करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर गेल्या लोकसभेत गुन्हा दाखल झाला आहे. 

 

मतदान करतांना मोबाईलवर शुटिंग करण्यास प्रतिबंध आहे. मात्र मतदान करतांनाचे शुटींग कर्मचाऱ्याच्या लपून करणे गेल्या निवडणुकीत महाग पडले आहे. यासाठी दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. 

 

रामतीर्थ येथील एका घटनेत व्हिव्हिपॅट व दोन बियू मशीन तोडफोड केल्याचा शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा तसेच पोलिसांशी धक्काबुकी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल आहे.

 

हदगाव येथे मतदान करत असतांना मतदान यंत्रावरील बॅलेट युनिट दिसत असणारा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात चार्जसिट दाखल झाली असून हे प्रकरण देखील न्याय प्रविष्ट आहे. 

 

सायबरकडून 7 गुन्हे दाखल

याशिवाय गेल्या निवडणुकीत काही पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेलकडून निवडणुकी संदर्भात चुकीच्या पोस्ट आल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाजाची भावना दुखवणारी पोस्ट व्हायरल केल्याबद्दलमुखेड येथे इन्स्टाग्रामवर हिंदू समाजाच्या भावना दुखवणारी पोस्ट व्हायरल केल्याबद्दल. अर्धापूर येथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारी पोस्ट व्हायरल केल्याबद्दल. माहूरमध्ये इन्स्टाग्रामवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारी पोस्ट केल्याबद्दल. अर्धापूर येथे एका  समाजाबाबत अक्षेपार्ह विधान केल्याबद्दल. शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत इन्स्ट्राग्रामवर मुस्लिम समाजाची भावना दुखविणारी पोस्ट केल्याबद्दल. तर लोहा पोलीस स्टेशन अंतर्गत मतदान केंद्रावरील ईव्हिएम मशिन व व्हिव्हिपॅट फोटो घेऊन फेसबुकवर प्रसारीत केल्याबद्दल गेल्या लोकसभा निवडणुकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट असून याप्रकरणात लवकरच कायदेशीर कारवाई होईलअसे सुतोवाच त्यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...