Saturday, October 26, 2024

 वृत्त क्र. 987

हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती 

नांदेडदि. २६ ऑक्टोंबर: - 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील हैदर बाग  परिसरात मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधुमनपाचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी,स्वीप सदस्य प्रा.राजेश कुलकर्णीसंजय भालके व मुकुंद आळसपूरे यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

यावेळी मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधू यांच्या नेतृत्वाखाली प्रथम विद्यार्थ्यांची रँली काढून परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. संपूर्ण हैदर बाग परिसरातील अनेक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा आर.जी.कुलकर्णी यांनी दिली. यानंतर प्रत्यक्ष शाळेत शिक्षक,पालक व जागरुक नागरिकांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. मतदारांना मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी लोकशाहीचा प्राण म्हणजे मतदार व आत्मा म्हणजे मतदान आहे. सर्व पात्र मतदारांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपले मतदान कर्तव्य पूर्ण करावे,असे मत त्यानी व्यक्त  केले.

मनपा शाळा सुध्दा मतदान जनजागृतीमध्ये हिरीरीने भाग घेतात आणि जनजागृती करतात. यास प्रतिसाद देवून स्वीप कक्षाच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा आणि लोकसभा पोट निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत आपल्या मतदानाच्या अधिकाराचा नक्कीच योग्य उपयोग करावा असे प्रतिपादन मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंघ सधू यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजा पटेल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईराज मुदिराज,आशा घुले,संदीप लबडे,संभाजी पोकले,नाजिया तब्बसुम,निखत परविन,महेजबीन बेगम स्वच्छता निरीक्षक झियाउल्ला खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

०००००








No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...