Saturday, October 26, 2024

 वृत्त क्र. 984

मतदान अधिकारीकर्मचाऱ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

८७ नांदेड दक्षिणचे प्रथम प्रशिक्षण संपन्न

 

नांदेड दि. २6 : लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून १६-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व  ८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान अधिकारीकर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

८७-नांदेड दक्षिणच्या प्रथम प्रशिक्षणात ते बोलत होते. ८७ नांदेड दक्षिणच्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्याचे नागार्जुना पब्लिक स्कूलकौठा नांदेड येथे आज प्रथम प्रशिक्षण आयोजित केले होते.

 

मतदान केंद्रावर कार्यरत पोलींग टिमने मतदान सुलभ पध्दतीने घेतल्यास मतदानाची टक्केवारी सुद्धा आपोआपच वाढते. माँक पोल घेतल्यानंतर इव्हिएम मशीन क्लिअर करणे अत्यंत आवश्यक आहेअशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

 

 या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व पहिले मतदान अधिकारी असे एकूण 884 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पिण्याच्या पाण्याची आणि प्रतिक्षालयासह दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहेअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

यावेळी सहा. निवडणूक अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी प्रशिक्षणाची रुपरेषा सांगितली. तहसीलदार प्रविण पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर नितेशकुमार बोलेलू,नायब तहसीलदारसंजय नागमवाडमुख्य प्रशिक्षक संघरत्न सोनसळेप्रशिक्षण टिमचे सदस्य संजय भालकेसुनील दाचावार व प्रा. राजेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

 

यावेळी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीसाठी मतदान यंत्र व व्हिव्हिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मास्टर ट्रेनर म्हणून पि.बी.राऊतएम.जी.कलंबरकर,रायभोळे एम.पी.शिलेदार डि.के. यांनी कार्य केले. 

 

प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळून जोडणी कशी केली जातेकोणकोणत्या समस्या येवू शकतात आणि त्यावर उपाय कोणतायाचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतलेयाच प्रशिक्षणात सर्वांनी इडीसीपि.बी.च्या मदतीने आपल्या मताची नोंद करण्याची सूचना नितेशकुमार बोलेलू यांनी केली. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण सदस्य  आर.जी.कुलकर्णी यांनी केलें. तर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पेशकार राजकुमार कोटुरवाररुस्तुम आडे,संजय भालके,सुनील दाचावारराजेश कुलकर्णीकविता जोशी,सारिका आचमे,हनुमंत राठोड,जमील शेख यांनी परिश्रम घेतले.

०००००







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...