Thursday, August 26, 2021

 अनुज्ञप्ती चाचणीसाठी शनिवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिबीर

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- प्रलंबित पक्क्या अनुज्ञप्ती चाचण्यांचा नियमन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शनिवार 28 ऑगस्ट रोजी सुट्टीच्या दिवशी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिबीराचे आयोजन केले आहे. यासाठी एक दिवस आगोदर अपॉईंटमेंट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

 

पक्की अनुज्ञप्ती (चालक परवानाचाचणीसाठी उशीराने अपॉईंटमेंट मिळत असल्याने प्रतिक्षा कालावधी वाढला आहे.  हा कालावधी कमी करुन नागरिकांची गैरसोय कमी करण्याच्यादृष्टीने व लॉकडाऊन कालावधीत प्रलंबित पक्क्या अनुज्ञप्ती चाचण्यांचा नियमन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. अर्जदारांनी ऑनलाईन उपलब्ध असलेली अपॉईंटमेंट घेऊन चाचणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित रहावेअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्न-धान्य पिके व गळीतधान्य 2021-22 अंतर्गत रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्याक्षिके, सुधारीत कृषी औजारे व सिंचन सुविधा साधणे या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करावेत. पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविले जाणार आहेत. यासाठी कृषी सहायकांशी संपर्क साधून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.   

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके व  गळती धान्य कार्यक्रम जिल्ह्यात पुढीलप्रमाणे राबविला जातो. यात कडधान्य (हरभरा), पोष्टीक तृणधान्य (ज्वारी), गळीतधान्य (करडई) निर्देशीत आहे. बियाणे वितरणामध्ये हरभरा बियाणासाठी दहा वर्षाआतील वाणास रुपये 25 प्रती किलो, दहा वर्षावरील वाणास 12 रुपये प्रती किलो, रब्बी ज्वारी बियाणांसाठी 10 वर्षातील वाणास 30 रुपये प्रती किलो, दहा वर्षावरील वाणास 15 रुपये प्रती किलो, करडई बियाणासाठी 40 रुपये प्रती किलो असे एकुण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादत लाभ देय आहे. 

पिक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके, व पीक संरक्षक औषधे या निविष्ठासाठी एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येईल. एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी पिकाच्या प्रकारानुसार 2 हजार ते 4 हजार प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान दिले जाईल. यासाठी कृषि विद्यापिठातील शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन व लॉटरी पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी आर.बी.चलवदे यांनी स्पष्ट केले.

000000

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 685 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3  तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 727 एवढी झाली असून यातील 88 हजार 36 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 30 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे कंधार 1, लोहा 1, यवतमाळ 1 असे एकूण 3  बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 30 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविउ रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 4 हजार 497

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 1 हजार 538

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 727

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 36

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-30

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 27 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर रेल्वे हॉस्पिटल येथे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेशहॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर),  सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस व तर रेल्वे हॉस्पिटल येथे 50 कोव्हॅक्सीन लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर,  बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, मरी या 14 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव,गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद,हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा,माहूर, मुदखेड, बारड,  नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 25 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 9 लाख 81 हजार 581 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 26 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 14 हजार 30 डो, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 58 हजार 40 डोस याप्रमाणे एकुण 10 लाख 72 हजार 70 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा नांदेड जिल्हा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.  रविवार 29 ऑगस्ट 2021 रोजी येथे दुपारी 2 ते 5 वाजेपर्यत लोहा, कंधार, नांदेड तालुक्यातील मनरेगा कामांची पाहणी. सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मनरेगा कार्यान्वित यंत्रणेची जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यासमवेत मनरेगा आढावा बैठक व शासकीय वाहनाने हदगावकडे  प्रयाण .सायं. 7.30 ते 8.30 वाजेपर्यत शासकीय विश्रामगृह हदगाव येथे राखीव. रात्री 8.30 वाजता हदगाव येथून शासकीय वाहनाने उमरखेडकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...