वृत्त क्र. 519
26 जून रोजी सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन
· विद्यार्थी व नागरिकांनी मोठया संख्येने समता दिंडीत सहभागी व्हावे
नांदेड दि. 24 :- सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने आदेशित केलेले आहे. त्याअनुषंगाने समाज कल्याण कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येत असून सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन व शाळेतील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या समता दिंडीत मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन समता दिंडीची सुरवात होईल. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप होईल. या समता दिंडीमध्ये नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन व शाळेतील विद्यार्थ्यांनी उर्त्स्फूत सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000