Friday, November 13, 2020

 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45 अर्ज वैध

तर 8 अर्ज अवैध

औरंगाबाद ,दि.13 (विमाका):- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने  शुक्रवार, दि.13 नोव्हेंबर 2020 रोजी मतदारसंघातील एकूण 53 प्राप्त नामनिर्देशनपत्राच्या छाननी अंती 45 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.  

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) अक्षय नवनाथराव खेडकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 14) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 15) ईश्वर आनंदराव मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 16) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 17) अंभोरे शंकर भगवान (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 18) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 19) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 20) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 21) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 22) जयसिंगराव गायकवाड पाटील (पक्ष : अपक्ष), औरंगाबाद 23) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 24) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 25) प्रवीणकुमार विष्णु पोटभरे (पक्ष : अपक्ष) बीड 26) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 27) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 28) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 29) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 30) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 31) विजेंद्र राधाकृष्ण सुरासे (पक्ष : अपक्ष) जालना 32) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 33) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 34) विवेकानंद शशीकांत उजळंबकर (पक्ष : अपक्ष) लातूर 35) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 36) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 37) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 38) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 39) शेख गुलाम रसूल कठ्ठु (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 40) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 41) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 42) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 43) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 44) संजय शहाजी गंभीरे (पक्ष : अपक्ष) बीड 45) संदीप बाबुराव कराळे (पक्ष : अपक्ष) नांदेड.

अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) अतुल राजेंद्र कांबळे 2) छाया सोनवणे 3) सुनील महाकुंडे 4) प्रविण घुगे 5) प्रदिप चव्हाण 6) विजयश्री बारगळ 7) बळीराम केंद्रे 8) शेख फेरोजमीया खालेद.

****


 

14 ते 21 नोव्हेंबर कालावधीत

महिला व बालविकास विभागातर्फे दत्तक सप्ताह 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :-  जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दत्तक सप्ताह राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात उन्नतीशिल महिला मंडळ संचलित लोहा तालुक्यातील सावित्रीबाई फुले शिशुगृह लोहा व नरसाबाई महिला मंडळ संचलित शिशुगृह गितानगर आनंदनगर नांदेड या दोन विशेष दत्तक संस्थांना शासकीय मान्यता प्राप्त आहे. या शिशुगृहात शुन्य ते 6 वर्षे वयोगटातील बालक असतात. तसेच परित्याग केलेले सोडून दिलेले किंवा सापडलेले बालकांना शिशुगृहात प्रवेश दिला जातो. त्यानंतर पुढील 60 दिवसात संबंधित पालकांनी संपर्क साधला नाही तर ते मुल दत्तक देण्यासाठी कायद्याने मान्यता प्राप्त होते. इच्छूक पालकांना अपेक्षेनुसार बालकाची दत्तक प्रक्रिया केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (CARA) www.cara.nic.in या संकेतस्थळावर कायदानुसार ऑनलाईन नोंदणी करण्यात येते. 

नांदेड जिल्ह्यात परित्याग केलेले सोडून दिलेले किंवा सापडलेला अशा बालकांना जिल्हा महिला व बाल विकास कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष शास्त्रीनगर भाग्यनगर जवळ नांदेड येथे 02462-261242 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी केले आहे.

000000

 

जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची समिती गठीत

उद्योजकांना नोंदणी करण्याचे आवाहन   

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- नांदेड जिल्ह्यातील निर्यातवाढीसाठी विविध केंद्र व जिल्हा कार्यालये, औद्योगिक संघटना, निर्यात परिषदा, निर्यात सल्लागार इ. यांच्याशी सातत्याने पाठपुरावा, समन्वय व अडीअडचणी दूर करण्याच्यादृष्टिने जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेस सहाय्य करण्यासाठी शासन निर्णयामधील मुद्दा क्र. 5 नुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची समिती गठीत करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय निर्यात करण्यास तयार असलेल्या व निर्यात करत असलेल्या उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड येथे प्रत्यक्ष अथवा didic.nanded@maharashtra.gov.in या ईमेलवर नोंदणी करावी असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

राज्यातील लघू व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहाय्य करण्यासाठी तसेच राज्यातील संभाव्य निर्यात क्षमता असलेल्या विविध क्षेत्रामधून निर्यातवृद्धी होण्यासाठी निर्यातदारांमध्ये जागरुकता आणून त्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी तसेच राज्यातील निर्यातीला चालना देण्याचे दृष्टिने तसेच उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यात महाराष्ट्र निर्यात प्रचालन परिषदची स्थापन करण्यात आली आहे, असेही  महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 

कोविड-19 च्या सुरक्षा निर्देशासह

 कौमी एकता सप्ताह होईल साजरा 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- दरवर्षीप्रमाणे 19 ते 25 नोव्हेंबर हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून साजरा केला जातो. नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या प्रादुर्भाव असल्यामुळे कोविड-19 च्या सुरक्षेच्या उपाय योजनाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन कौमी एकता सप्ताह साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश दिले आहेत. याबाबत दिनांक 14 नोव्हेंबर 2017 रोजीचे शासन परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 20161111168419814 असा आहे.

00000

 

 37  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

28 कोरोना बाधितांची भर  तर तिघांचा मृत्यू  

नांदेड (जिमाका) दि. 13 :- शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 28 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 19 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 514 अहवालापैकी  1 हजार 469 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 595 एवढी झाली असून यातील  18  हजार 626 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 255 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार तीन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  गुरुवार 12 नोव्हेंबर 2020 रोजी नवीन मोंढा नांदेड येथील 51 वर्षाच्या पुरुषाचा, लोहा तालुक्यातील गुंडेवाडी येथील 61 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020 रोजी हदगाव तालुक्यातील वायफना येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 538 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, खाजगी रुग्णालय 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 15, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, नांदेड ग्रामीण 2 असे एकुण 9 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 7, अर्धापूर तालुक्यात 1, मुखेड 2, बिलोली 2, नांदेड ग्रामीण 1, भोकर 2, हदगाव 2, यवतमाळ 2 एकुण 19 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 255 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 26, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 77, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 13, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, 

धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 31, औरंगाबाद येथे संदर्भित 2, अकोला येथे संदर्भित 1 आहेत.  

शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 166, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 79 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 26 हजार 548

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 3 हजार 501

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 595

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 626

एकूण मृत्यू संख्या- 538

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 354

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 255

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 16. 

फटाक्यांच्या धुरामुळे कोविड बाधित  रुग्णांना व श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करावी. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...