Friday, September 16, 2016

आदिवासी विकास राज्यमंत्री
राजे अम्ब्रीशराव यांचा दौरा
 नांदेड दि. 16 :- राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव हे शनिवार 17 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी नागपूर येथून शासकीय हेलिकॅाप्टरने सकाळी 11 वाजता सुभाषनगर हबीब कॉलनी समोर दत्तनगर रोड किनवट हेलिपॅडवर आगमन व तेथून शासकीय विश्रामगृहाकडे शासकीय वाहनाने प्रयाण, आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशहा व रघुनाथशहा स्मृतिदिनानिमित्त जनजाती चेतना परिषदेच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- कलावती गार्डन माहूर रोड किनवट. सायंकाळी 4  वा. शासकीय हेलिकॉप्टरने सुभाषनगर हबीब कॉलनी समोर दत्तनगर रोड किनवट येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000
जप्त रेतीसाठ्याचा सोमवारी
नांदेड तहसिलमध्ये लिलाव
 नांदेड दि. 16 :- नांदेड तहलिस कार्यालयाकडून जप्त करण्यात आलेल्या रेतीसाठ्याचा सोमवार 19 सप्टेंबर रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार नांदेड यांनी कळविली आहे.
नांदेड तालुक्यातील मौ. भणगी, सोमेश्वर, वाघी, पिंपळगाव को., नाळेश्वर, नागापूर, सायाळ, गंगाबेट, रहीमपुर खु., तरोडा खु, ब्रम्हपुरी, पिंपळगाव निमजी, बोंढार तर्फे हवेली, कामठा बु. गाडेगाव, मार्कंड लगतच्या गावठाणामध्ये अंदाजे 17 हजार 136 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. त्या रेतीसाठ्याचा जाहीर लिलाव सोमवार 19 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 3 वा. उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालय नांदेड येथे ठेवण्यात आला आहे. लिलावात भाग घेण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींनी सोमवारी वेळेवर तहसिल कार्यालय नांदेड येथे उपस्थित रहावे तसेच लिलावात सहभागी होण्यासाठीच्या पात्रता अटी, शर्ती आदी तपशीलासाठी नांदेड तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

00000
मतदार यादीत नोंदणी, दुरुस्तीसाठी रविवारी
मतदान केंद्रावर अर्ज स्विकारण्यात येणार
नांदेड, दि. 16 :-भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर विधानसभा मतदार यादयाच्‍या विशेष पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचा कालावधी शुक्रवार 16 सप्‍टेंबर 2016 ते 14 ऑक्‍टोबर 2016 असा आहे. तर रविवार 18 सप्‍टेंबर व 9 ऑक्‍टोंबर 2016 रोजी विशेष मोहीम निश्‍चीत केली आहे. यादिवशी जिल्‍हयातील सर्व केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून अर्ज स्‍वीकारतील. याचा सर्व मतदारांनी लाभ घ्‍यावा , असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केले आहे. दिनांक 1 जोनवारी 2017 रोजी ज्‍यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण होणार आहेत अशा सर्व मतदारांनी सुध्‍दा नाव नोंदणीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.
            विशेष मोहिमेच्‍या तारखा व्यतिरिक्त  16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर 2016 या कालावधीत जिल्‍हयातील सर्व तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्र व संबंधीत बीएलओ यांचेकडे अर्ज करता येतील. मतदारांनी अर्ज करताना आवश्‍यक ते पुरावे जोडूनच अर्ज करावेत. तसेच कुटूंबातील व्‍यक्‍तींनीच अर्ज जमा करावेत. त्रयस्थ व्‍यक्‍तीमार्फत गठ्ठयांनी अर्ज स्‍वीकरले जाणार नाहीत याची नोंद घ्‍यावी.
भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनाकांवर विधानसभा मतदारसंघाच्‍या मतदान यादयांच्‍या संक्षिप्‍त पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नावात दुरुस्‍ती, आक्षेप नोंदविण्‍यासाठी 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोबर 2016 हा कालावधी आयोगाने निश्‍चीत केला आहे. जिल्‍हयात सध्‍या मतदार संख्‍या 23 लाख 84 हजार 666 इतकी असून त्‍यापैकी पुरुष 12 लाख 43 हजार 586, स्त्री- 11 लाख 41 हजार 26 व  इतर- 54 मतदार आहेत.  
येत्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका
निवडणुकीस हीच यादी वापरण्‍याची शक्‍यता
            सन 2017 मध्‍ये जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका प्रस्‍तावित आहेत. जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी विधानसभेची मतदार यादी वापरली जाते. त्‍यामुळे येत्‍या जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकासाठी दि. 1.1.2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरली जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सर्व मतदारांनी आपली नावे यादीत असल्‍याची खात्री करावी तसेच यादीत नावेही नोंदवावीत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केलेले आहे.
फोटो जमा करावेत
ज्‍या मतदारांचे यादीमध्‍ये फोटो नाहीत अशा मतदारांनी संबंधित बीएलओकडे फोटो जमा करावेत जेणे करुन त्‍यांना ओळखपत्र देण्‍यात येतील.
दुबार नावे वगळणे
मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नाव नोंदविणे बेकायदेशिर आहे. त्‍यामुळे ज्‍या मतदारांना यापुर्वी एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नोंदविली असतील त्‍यांनी एका ठिकाणावरुन नांव वगळण्‍यासाठी नमुना 7 मध्‍ये अर्ज सादर करावेत.

00000
अल्‍पसंख्‍याक विभागाच्या शाळा अनुदान योजनेत
प्रस्ताव सादर करण्‍यास 30 सप्टेंबर मुदत
नांदेड, दि. 16 "जिल्‍हयातील धार्मीक अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजनेसाठी इच्‍छुक शाळांकडून अर्ज शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील. प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी शासन निर्णय व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्‍यात येणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग नांदेड यांनी केले आहे.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्‍त प्रस्‍तावांची छाननी, त्रुटींची पुर्तता करून अंतिमरित्‍या पात्र प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यापासून ते शनिवार 15 ऑक्टोंबर 2016 शासनास सादर करण्यात येणार आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी इच्‍छूक शाळांकडून अर्ज मागविण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्‍ताव सादर करण्‍याची यापुर्वी 8 ऑगस्ट व जिल्‍हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पात्र प्रस्‍ताव सादर करावयाची 31 ऑगस्ट पर्यंत मुदत विहित करण्‍यात आली होती.

000000
दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या
परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 16 – दिपावली उत्सव शनिवार 29 ऑक्टोंबर ते सोमवार 31 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत साजरा होणार आहे. या कालावधीतील तात्पुरती फटाका विक्रीची दुकाने सुरु करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना जि‍ल्‍हादंडाधिकारी तर जिल्‍हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने केले आहे.
नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍या मार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार सोमवार 26 सप्टेंबर ते बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.
तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील नमुद कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या  कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत.   नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावेत. The Explosive Rules 2008 मधील नियम 86(3) अन्‍वये सदर व इतर दुकान यात किमान 15 मीटरचे अंतर असणे आवश्‍यक  आहे. नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा. नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र. परवाना शुल्कासाठी 500 रुपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिकरित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड किंवा संबंधीत नगरपरिषद, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालय यांचे  नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र. जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इ.. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनाद्वारे शुल्क शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने गुरुवार 13 ऑक्टोंबर ते शनिवार 15 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या मार्फत तसेच उ‍पविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍यामार्फत दिले जातील.
       या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल. याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

00000000
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
आज राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंद
नांदेड, दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. तत्पुर्वी सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानंवदना व पुष्पचक्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.   
या समारंभासाठी निमंत्रीतांनी राष्ट्रीय, समारंभीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्यादृष्टिने बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान , या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.15 पूर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000
पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
नांदेड, दि. 16 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
शुक्रवार 16 सप्टेंबर 2016 रोजी जालना येथून मोटारीने रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8.20 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आगमन. सकाळी 8.30 ते 8.56 वाजेपर्यंत हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण व मानवंदना कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9 वा. राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम. सकाळी 9.02 वा. शुभेच्छा संदेश. सकाळी 9.10 वा. सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांशी व मान्यवरांशी हितगुज. सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.25 वा. शासकीय विश्रागृह नांदेड येथे आगमन व राखीव. सोईनुसार नांदेड येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील.
000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...