Monday, July 4, 2022

 मुलीस पळवून नेल्याची तक्रार दाखल

 

·        माहिती मिळाल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कुमारी विद्या अनिल कांबळे वय वर्षे 17 हिला दिनांक 13 जून 2022 रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार तिच्या आजोबाने शिवजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. वय वर्षे 70 असलेले बालाजी कोडिंबा दुधमल यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनने तपासाला गती दिली आहे.

 

सदर कु. विद्या अनिल कांबळे हिचा रंग गोरा, बांधा मध्यम, उंची 5 फूट अंगात फिकट काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात निळ्या रंगाची चप्पल आहे. तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. ही मुलगी कोणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे 02462-256520 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी 9970073425 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनने केले आहे.

00000



नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  23 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीत नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 1 बाधित आढळला आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 16, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणातील 2 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 920 एवढी झाली असून यातील 1 लाख 192 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.    

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 25, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणात 9 असे एकुण 36 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 8 हजार 694

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 88 हजार 420

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 920

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 192

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-36

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 0000

 सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीसाठी

बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि.4 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व श्री हजूर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 6 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. श्री हजूर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या रोजगार मेळाव्यात नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462) -251674 किंवा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर सपंर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या मेळाव्यात नामांकित कंपनीच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, कोणत्याही शाखेची पदवी / आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

0000

 लाभार्थ्यांना रहिवासी व जात प्रमाणपत्राचे वितरण,

वन धन केंद्रामार्फत मोहफुले खरेदीची सुरवात

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  किनवट तालुक्यातील बेल्लोरी धानोरा येथे देवगिरी कल्याण आश्रम आणि बेल्लोरी धानोरा वन धन विकास केंद्रामार्फत जात व रहिवासी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात आदिवासी विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी गावचे प्रमुख शामराव हुरदुके, संस्थेचे सचिव प्रकाशजी टारपे, संतोष मरस्कोले, रामकिशन टारपे तसेच गावातील प्रमुख व जेष्ठ भगवानराव हुरदुके , आदिवासी विकास प्रकल्पाचे किशन गारोळे, उपसरंपच भाऊराव डवरे, देवराव गारोळे, शाम आर केंद्रे, पोलीस पाटील देविदास चव्हाण, वन धन विकास योजनेचे अध्यक्ष  सुभाष हुरदुके, सचिव शंकर डवरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विमलताई दुरदुके तसेच परिसरातील महिलाची उपस्थिती होती.

 

सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती व वन धन विकास केंद्रामार्फत शासकीय अधिकृत परवानगीने उपजिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते गौण वनोपज मोहफुले खरेदीची सुरवात करण्यात आली. गावातील नागरिकांना गावातच रहिवासी आणि जातीचे दाखले देण्यात आले. गावात गौण वनोपज खरेदी होत असल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले. वन धन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल व वन धन केंद्राचा प्रस्ताव मंजूर करुन बीज भांडवल मिळून देणार असल्याचे उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच वन हक्क व्यवस्थापनासाठी आराखडे बनविण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. यावेळी वनांचल फौडेशनतर्फे पाऊस कसा मोजावा याचे तंत्र समजावून सांगण्यात आले. जेणेकरुन शेतीचे कामे व पाणलोट क्षेत्राचे काम करणे सोपे होईल. त्याचबरोबर मागील 17 मे ते 19 मे कालावधीत आदिवासी विकास कौशल्य प्रशिक्षण वर्ग किनवट येथे देवगिरी कल्याण आश्रम आणि तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे यांच्या मार्फत घेण्यात आला असता त्या वर्गाच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. शेतातील पिकांची काळजी कशी घ्यावी, पिकाला आवश्यक जीवन सत्व कोणत्या प्रकारे दिले पाहीजे यावर कृषि तज्ञ सुहास आजगावकर यांचे मार्गदर्शन झाले. तसेच शेतीसाठी पाण्याची बचत कशी करता येईल व गौण वनोपज साठी विक्री व्यवस्थापन कसे करावे यावर जल व्यवस्थापनाचे रणजीत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेती उत्पादन कंपनीचे अधिकारी आणि इतर प्रशिक्षणार्थ्यांची मनोगत झाली.

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 37.60 मि.मी. पाऊस 


नांदेड (जिमाका) दि. 4:- जिल्ह्यात सोमवार 4 जुलै  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 37.60  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 199.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यात सोमवार 4 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 37.20 (179.90), बिलोली- 41.10 (155.80), मुखेड- 25.80 (250.60), कंधार-51.60 (286.70), लोहा-68.40 (206.20), हदगाव-32.30 (161.10), भोकर- 36.40 (134.10), देगलूर-24.70 (254.50), किनवट- 34.50 (220.90), मुदखेड- 32.20 (232.40), हिमायतनगर-78.90 (282.40), माहूर- 11.60 (144.80), धर्माबाद- 19.10(156.80), उमरी- 37.10 (186.90), अर्धापूर- 40.80 (139.90), नायगाव- 41 (131.40) मिलीमीटर आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...