Sunday, August 8, 2021

 

कोविड-19 लसीकरण जनजागृतीसाठी नांदेड ते कंधार सायकल रॅलीचे आयोजन 

·         जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांचा पुढाकार 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या  जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज नांदेड ते कंधार व परत अशी सायकल रॅली आयोजित केली होती. यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला. नांदेड सायकल असोसिएशनच्या सदस्यांनी यात सहभाग घेतला.   

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः सपत्नीक ही सायकल रॅली पूर्ण केली. नांदेड ते कंधार या मार्गावर येणाऱ्या गावात थोडा वेळ थांबून नागरिकांना कोविड-19 लसीकरणात सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याच्या समवेत के. कार्तिकेयन, कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे, अझीम पंजवाणी, गिरीश येवते, पालिवाल व युवक सहभागी झाले होते. 

00000





 

जिल्ह्यातील 75 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 75 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. सोमवार 9 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 18 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे कोविशील्ड लसीचे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, . शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 17 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर शहरी दवाखाना सिडको व रेल्वे हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 70 डोस उपलब्ध आहेत.  

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार, लोहा या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.   

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय मुखेड व ग्रामीण रुग्णालय कंधार येथे कोव्हॅक्सनीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर ग्रामीण भागातील 26 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 14 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 7 ऑगस्ट पर्यंत एकुण 8 लाख 63 हजार 313 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 8 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 70 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 29 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 99 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 753 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 217 एवढी झाली असून यातील 87 हजार 518 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 42 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नायगाव तालुक्यांतर्गत 1 व मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 3 व्यक्तींला सुट्टी देण्यात आली. 

आज 42 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 34, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 131, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 75 हजार 832

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 73 हजार 507

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 217

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 518

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 657

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-27

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-42

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

00000

 

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश

अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2021-22 मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेत प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्याकडून अर्ज येत्या मंगळवारी 31 ऑगस्ट पर्यंत कार्यालयीन वेळेत मागविण्यात आली आहेत. या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत निर्णय राज्य शासनाच्यावतीने घेतला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्यासाठी हे अर्ज मागविण्यात येत आहेत. या शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य शैक्षणिक साहित्य शालेय गणवेश आदी सुविधा राज्य शासनाकडून मोफत दिल्या जाणार आहेत. 

योजनेच्या अटी व शर्ती

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी धनगर समाजाचा असावा. विद्यार्थ्याच्या पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न मर्यादा 1 लाख इतकी असावी. सन 2021-22 या वर्षात विद्यार्थी पहिली इयत्ता किंवा दुसरी इयत्तेत प्रवेशित असावा. नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्यासाठी निवड झालेल्या शाळेची यादी ही पुढील प्रमाणे आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी  विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल. 

शिवबा एज्यूकेशन सोसायटी नांदेड या संस्थेची शाळा जिनियस पब्लिक स्कूल वसंतनगर ता. जि.  नांदेड शासनाकडून मंजूर विद्यार्थी संख्या 300. कै. व्यंकटराव पाटील ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान डोंगरगाव ता. लोहा या संस्थेची शाळा श्री शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल स्कूल दत्तनगर नांदेड शासनाकडून मंजूर विद्यार्थी संख्या 50. गोदावरी मनार चॅरीटेबल ट्रस्ट शंकरनगर ता. बिलोली या संस्थेची शाळा गोदावरी मनार पब्लिक स्कूल शंकरनगर ता. बिलोली जि. नांदेड शासनाकडून मंजूर विद्यार्थी संख्या 100 एवढी आहे. 

प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज 9 ते 31 ऑगस्ट 2021 कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या नावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नमस्कार चौक नांदेड या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावीत. या योजनेचा विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे अवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...