Wednesday, May 22, 2024

 वृत्त क्र. 441 

गोणेगाव अंतर्गत लेंडी प्रकल्प धरण परीसर

व धरणालगत गावांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 22 मे :- लेंडी प्रधान प्रकल्प मुखेड तालुक्यातील मौ. गोणेगाव अंतर्गत लेंडी प्रकल्प धरण परीसर व धरण लगत असलेली मौ. गोणेगावरावणगावमारजवाडीहसनाळभाटापुर व इटग्याळ (प.दे) मुखेड तालुक्यातील या गावाच्या हद्दीमध्ये त्यासाठी लेंडी प्रधान प्रकल्पाची होत असलेली कामेये-जा करणारी यंत्रणासाहित्य व अधिकारी-कर्मचारी यांना विरोध करणारी सर्व गतीविधीसमोर्चेधरणेउपोषणेआत्मदहन व त्या अनुषंगाने इतर जमाव करण्यास 23 मे 2024 रोजी सकाळी वाजेपासून ते 21 जुलै 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधीतास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्यानेआणिबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश 22 मे 2024 रोजी निर्गमीत केले आहेत.

0000

वृत्त क्र. 438 दि. 21 मे 2024

 जिल्हयात टंचाई निवारण्याच्या आवश्यक सुविधा बहाल : जिल्हाधिकारी

·         टंचाईग्रस्त नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड दि. २१ : नांदेड जिल्ह्यामध्ये टंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अनेक गावांना पिण्याची पाणी टंचाई जाणवणार नाही. यासाठी आवश्यक सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकार दिले असून कुठेही टंचाई असेल तर नागरिकांनी थेट संपर्क साधण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 ९८ नळ योजनांची दुरुस्ती

नांदेड जिल्‍हयातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून या वर्षी एकूण ९८ - नळ योजना विशेष दुरुस्‍तींच्‍या प्रस्‍तावांना३१ - तात्‍पुरती पूरक नळ योजनेच्‍या प्रस्‍तावांना व ५७३ - नविन विंधण विहीरींच्‍या प्रस्‍तावांना प्रशासकीय मंजूरी देण्‍यात आली असून त्‍यापैकी बहुतांश कामे पूर्ण होवून सदर गावामध्‍ये टंचाई कालावधीमध्‍ये पाण्‍याचा पुरवठा सुरु झालेला आहे.

टॅंकरचे प्रस्ताव निकाली

तसेच उर्वरित टंचाई निवारण योजनांची कामे युध्‍दपातळीवर पूर्ण करण्‍यात येत आहेत. टंचाई कालावधीमध्‍ये विहीर,बोअर अधिग्रहण तसेच टॅंकरचे प्रस्‍ताव तातडीने निकाली काढून सदर गावामध्‍ये तात्‍काळ पाणी पुरवठा सुरु कर ण्यात आला आहे.

२१ खासगी टॅंकर मदतीला

विहीर व बोअर अधिग्रहण व टॅंकर मंजूर करण्‍याचे अधिकार नांदेड जिल्‍हयातील सर्व उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्‍यात आले आहेत. ग्रामीण भागातील २१ गावे,/वाडी,तांडयामध्‍ये २१ खाजगी टॅंकरव्‍दारे व २७५ खाजगी विहीर,बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. टॅंकरची संख्‍या साधारणपणे मुखेड तालुक्‍यात - १४कंधार – ५ माहूर – १ व भोकर तालुक्‍यात १ टॅंकरव्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. तसेच टॅंकर व विहीर,बोअर अधिग्रहणाचे प्रस्‍ताव कुठल्‍याही स्‍तरावर प्रलंबित राहणार नाहीत याबाबत सर्व उप विभागीय अधिकारीसर्व तहसीलदार व सर्व गट विकास अधिकारी यांना जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडून सक्‍त निर्देश देण्‍यात आले आहेत.

चारा मुबलक प्रमाणात

नांदेड जिल्‍हयामध्‍ये जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असून कुठल्‍याही प्रकारची चारा टंचाई नाही. टंचाईग्रस्‍त गावातील टंचाई निवारणासाठी जिल्‍हाधिकारी श्री. अभिजित राऊत हे तालुक्‍याच्‍या ठिकाणी आढावा बैठका घेत आहेत.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

तसेच तालुक्‍यातील टंचाईग्रस्‍त गावामध्‍ये टंचाई निवारण संदर्भात इतर संबंधित अधिकारी आढावा बैठका घेवून प्रत्‍येक बाबींबर लक्ष ठेवून आहेत.जिल्‍हयातील नागरिकांची पाणी टंचाईच्‍या अनुषंगाने कुठल्‍याही प्रकारची तक्रार असल्‍यास त्‍यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षामधील दुरध्‍वनी क्रमांक ०२४६२-२३५०७७ व टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. सदर दुरध्‍वनी क्रमांक हे २४x७ चालू राहतील.

00000

वृत्त क्र. 440

                                                          बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी

राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त

 

नांदेड दि. 22 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत पुणे, नागपूर,  छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.  

 

या परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना राज्यमंडळ स्तरावरुन नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

7387400970, 9011184242, 8421150528, 8263876896, 8369021944, 8828426722, 9881418236, 9359978315,7387647902, 9011302997 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

 

वृत्त क्र. 439

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छूक संस्थानी 31 मेपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

नांदेड दि. 22 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेद्वारे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे अशा संस्थानी आपले प्रस्ताव दोन प्रतीत 31 मे 2024 पर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टि.आर. शिंदे यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा कार्यालयात सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण 500 प्रशिक्षणार्थीचे कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटूंबाची सामाजिक , आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत म्हणून समाजातील गरजुंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्थाचालकाची राहील. त्याशिवाय संस्थेची फी दिली जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार टप्याटप्याने प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल. तसेच नांदेड जिल्ह्यातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. त्या संस्था आपले प्रस्ताव दाखल करु शकतील. तसेच 31 मे 2024 नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत यांची संबंधित संस्थानी नोंद घ्यावी, असेही आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाने केले आहे.

प्रशिक्षणार्थी साठी नियम व अटी

अर्जदार मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदारास आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा लागेल.

0000 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...