Wednesday, April 5, 2023

कोविडचे रुग्ण पुन्‍हा आढळून येत आहेत

घाबरु नका, काळजी घ्‍या

- जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- देशभरात कोरोना संसर्ग फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. नांदेड जिल्‍ह्यात मागील महिण्‍यापासून आजपर्यंत कोविडचे एकुण 30 रुग्‍ण आढळून आले आहेत. जिल्‍ह्यात कोविड व इन्‍फ्यूएंझा रोग प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सर्व स्‍तरावर सुरु करण्‍यात आलेल्‍या आहेत.   यामुळे जनतेने घाबरुन न जाता काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

जिल्‍ह्यात मागील महिण्‍यापासून आजपर्यंत कोविडचे एकुण 30 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 19 रुग्‍ण आजारातून बरे झाले आहेत. 3 रुग्‍णांवर डॉ.शं.च.वै.म.व रुग्‍णालय विष्‍णुपूरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. 8 रुग्‍ण हे गृहविलगीकरणात ठेवण्‍यात आले आहेत.

 

नागरीकांनी अशी घ्यावी दक्षता  

गर्दीच्‍या आणि बंदिस्‍त ठिकाणी विशेषतः सह व्‍याधी असणाऱ्या व्‍यक्‍ती आणि वृध्‍द यांनी जाणे टाळावे. डॉक्‍टर, पॅरामेडीकल आणि रुग्‍ण व त्‍यांचे नातेवाईक यांनी आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये / रुग्‍णालयात मास्‍कचा वापर करावा. गर्दीच्‍या आणि बंदीस्‍त ठिकाणी मास्‍क वापरावा. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्‍यासाठी रुमाल / टिश्‍यू वापरावा. हाताची स्‍वच्‍छता राखावीवारंवार हात धुवावेतसार्वजनिक ठिकाणी थुं‍कू नये. सर्दीखोकलातापअंगदुखीघशामध्‍ये खवखवणेश्‍वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्‍यास त्‍वरीत डॉक्‍टरांचा सल्‍ला घेवून लवकर कोवीड चाचणी करावी.  श्‍वसनाच्‍या आजाराने ग्रस्‍त असल्‍यास वैयक्तिक संपर्क मर्यादीत करावा. कोविड उपचार व निदानाची सोय सर्व शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध आहे. सर्व व्‍यक्‍तींनी कोविड बुस्‍टर डोस लसीकरण उपलब्‍ध झाल्‍यावर करावे. सौम्‍य लक्षणे असल्‍यास स्‍वतः खात्री करुन डॉक्‍टरांच्‍या सल्‍यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी. पुर्ण बरे होईपर्यंत स्‍वतः घरी अलगीकरण करण्‍याचे आवाहन आरोग्‍य प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

 

इन्‍फ्यूएंझा ( फ्यू ) रुग्‍णांच्‍या प्रमाणात देखील वाढ

इन्‍फ्यूएंझा एच 3 एन 2 ( फ्यू ) या हंगामी तापाच्‍या रुग्‍णांच्‍या प्रमाणात देखील वाढ होताना दिसून येत आहे. आजपर्यत जिल्‍ह्यातील नांदेड तालुक्‍यात इन्‍फ्यूएंझा एच 3 एन 2 ( फ्यू ) एक रुग्‍ण आढळून आला आहे व तो बरा झालेला आहे. इन्‍फ्यूएंझा ( फ्यू ) हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. यामध्‍ये रुग्‍णाला ताप, खोकला, घशात खवखवधाप लागणेअंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. इन्‍फ्यूएंझाची लागण टाळण्‍यासाठी वारंवार साबण व स्‍वच्‍छ पाण्‍याने हात धुवावेतपौष्टिक आहार घ्‍यावाधुम्रपान टाळावेपुरेशी झोप आणि विश्रांती घ्‍यावीभरपूर पाणी प्‍यावेलिंबूआवळामोसंबीसंत्री, हिरव्‍या पालेभाज्‍या यासारख्या आरोग्‍यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा. हस्‍तांदोलन टाळावेसार्वजनिक ठिकाणी थुंकू नयेफ्यू सदृश्‍य लक्षणे असतील तर गर्दीच्‍या ठिकाणी जाऊ नये असे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.

0000

 एकापेक्षा जास्त परवाने घेतलेल्या ऑटोरिक्षा

धारकांनी परवाने जमा करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :-  प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने एका पेक्षा जास्त परवाने घेतलेल्या व्यक्तीविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.  ज्या ऑटोरिक्षा धारकांनी अटी व शर्तीचा आणि मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 86 चा भंग केलेला आहे. अशा ऑटोरिक्षा परवाना धारका विरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार पोलीस व परिेवहन विभागामार्फत कायदेशिर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशा ऑटोरिक्षा परवाना धारकांनी स्वत: 1 एप्रिल 2023 पासून 7 दिवसाच्या आत कार्यालयामध्ये परवाने जमा करावेत अन्यथा त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात येईलअसे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले आहे.

0000

 जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह

पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता

 

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 6 एप्रिल 2023 या दिवसासाठी यलो अलर्ट व 7 एप्रिल 2023 या दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. 6 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. 7 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

 

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

 प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकामार्फत

11 हजार 105 दोषी वाहनधारकांविरुध्द कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत मार्च 2023 मध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुध्द विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात प्रामुख्याने सिग्नल जंप करणे 394 प्रकरणेट्रिपल सिट 215 प्रकरणेअनुज्ञप्ती सादर न केलेली वाहनधारक 137, विना रिफ्लेक्टर वाहन 98, विना सिटबेल्ट वाहनधारक 145, विना परवाना वाहतुक 82, ओव्हरलोड वाहतुक 62, भरधाव वेगाने वाहन चालविणे 412 व इतर दोषी वाहनांवर कारवाई करुन 47.17 लाख रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

 

तसेच सन 2022-23 साठी शासनाने एकुण 5.50 कोटी रुपये इतके उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार या कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत एकूण 11 हजार 105 दोषी वाहनधारकांवर कारवाई करुन 6.42 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याअन्वये दिलेल्या लक्षांकानुसार 117 टक्के लक्षांक पूर्तता झाली आहे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000 

 समता पर्वानिमित्त अनु.जातीच्या मुला-मुलींना जात प्रमाणपत्राचे वितरण

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतापर्व अभियान एप्रिल ते मे 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विविध योजनेच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

यात अनु.जाती मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील व शासकीय वसतिगृहा 16 असे जवळपास 535 जात प्रमाणपत्र प्राप्त करुन मुख्याध्यापक व गृहपाल यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे आयोजन करुन जात प्रमाणपत्राचे नुकतेच वाटप केले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...